क्रियापदाचे -ing रूप | having + | क्रियापदाचे -ing रूप

क्रियापदाचे -ing रूप | having + | क्रियापदाचे -ing रूप in marathi – English grammer in marathi

● इंग्रजीमधे जवळपास क्रियापदांची ing रूपे होतात. या रूपाचा एक मुख्य उपयोग जसं
तुम्हाला माहीत आहे चालू काळात होतो. जसे, I am writing. He is reading. She was working. अशा प्रकारे वापरल्या जाणाऱ्या -ing रूपाला व्याकरणात present participle किंवा -ing participle म्हणतात.

● पण क्रियापदाच्या -ing रूपाचा हा एकच उपयोग नाही. या रूपाचा आणखी एक महत्त्वाचा उपयोग म्हणजे हे रूप वाक्यात ‘नामा’ सारखे वापरले जाते. जसे,
Reading is a good habit. वाचन चांगली सवय आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

● या वाक्यात reading हा शब्द नामाप्रमाणे वापरलेला आहे – नामाचे कार्य करत आहे. अशा प्रकारे वापरलेल्या -ing रूपाला व्याकरणात gerund म्हणतात. पण कधीकधी gerund आणि present participle मध्ये स्पष्टपणे फरक करण कठीण होतं. म्हणून gerund a present participle या दोघांसाठीही क्रियापदाचे -ing रूप हा एकच सोपा शब्द आजकाल जास्त रूढ होत आहे. आणि या क्रियापदाच्या -ing रूपाबद्दल सविस्तर माहिती घेताना gerund व present participle हे वेगवेगळे शब्द वापरण्याऐवजी आपणही क्रियापदाचे -ing रूप ह्याच सोप्या शब्दाचा उपयोग करू.

● ज्याप्रमाणे infinitive प्रकरणात आपण to + क्रियापदाच्या पहिल्या रूपा’चे अर्थ लक्षात घेतले, त्याप्रमाणे सध्या आपल्याला पहिल्यांदा क्रियापदाच्या -ing रूपाचे वेगवेगळे अर्थलक्षात घ्यायचे आहेत.
या -ing रूपाचे प्रामुख्याने तीन शब्दश: अर्थ होतात:–त/-ला/-णे. म्हणजे उदाहरणार्थ
| teaching चे अर्थ ‘शिकवत/शिकवायला/शिकवणे’ असे होतील. writing चे अर्थ लिहित/
लिहायला/लिहिणे’ असे होतील. हेच अर्थ आता उदाहरणांद्वारे व्यवस्थित लक्षात घ्या.

खालील वाक्यांमध्ये -ing रूपाचा अर्थ ‘-णं’ असा होतो.

१) मी रविवारी बाहेर जाणं टाळतो.
I avoid going out on Sunday.
२) मी वाचणं बंद केलं आणि लिहायला सुरुवात केली. I stopped reading and started writing.
३) भांडण बंद करा, तुम्ही दोघं!
Stop quarrelling, you two! !
४) मी आता काळजी करणं सोडून दिलं आहे.
I have stopped worrying now.
५) आम्ही पेपर घेणं बंद केलं आहे.
We have stopped taking a paper.
६) त्याचा सल्ला घेणं मला महागात पडलं.
Taking his advice cost me dear.
७) त्याच्याशी लग्न करणं माझ्या जीवनातील सर्वात मोठी चूक होती.
Marrying him was the biggest mistake in my life.
८) अडचणीबद्दल बोलणं एक गोष्ट आहे आणि त्यांना सोडवणं पूर्णपणे दुसरी गोष्ट आहे.
Talking about the problems is one thing and solving them is another thing altogether.
९) तू चहासोबत प्रत्येक वेळेस बिस्किट घेणं टाळायला पाहिजे.
You should avoid taking biscuits with your tea every time.
१०) दुसऱ्यांचे दोष काढणे सोपे असते.
It is easy finding others’ faults.
११) अशा अडचणींना हाताळणं कठीण असतं.
It is difficult dealing with such problems.
१२) लक्षाधीश होणं सोपं नाही.
It is not easy becoming a millionaire.१३) त्याची वाट पाहणं आता निरर्थक आहे.
It is useless / pointless waiting for him now.
१४) वर्गात शिस्त ठेवणे शिक्षकाचे पहिले काम आहे.
Keeping discipline in the classroom is the first task of a teacher.
१५) इंग्रजीत बोलणं सोपं आहे. तुम्ही फक्त सुरुवात करण्याची गरज आहे.
Speaking English is easy – you only need to start.
१६) त्याचा सल्ला घेणं फायद्याचं ठरलं.
Taking his advice proved to be useful.

खालील वाक्यांमध्ये -ing रूपाचा अर्थ -त’ असा होतो.

१) तो पुस्तक वाचत खुर्चीवर बसलेला होता.
He was sitting in a chair, reading a book.
२) आमचा कुत्रा नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने भुंकत असलेला आम्हाला दिसला.
We noticed our dog, barking unusually.
३) एकसारखी चिवचिव करत पक्षी झाडावर बसलेले होते.
Birds were sitting on the tree, chirping continuously.
४) माझ्याकडे प्रत्येक वेळेस धावत येऊ नकोस.
Don’t come running to me every time.
५) हे औषध एक महिना घेत रहा.
Keep (on) taking this medicine for a month.
६) मुलं जमीनीवर खेळत बसली.
Children sat playing on the floor.
७) मी झाडाच्या सावलीत पुस्तक वाचत बसलो.
I sat in the shade of a tree reading a book.
८) आम्ही बसची वाट पाहत एक तास घालवला.
We spent an hour waiting for the bus.
९) आमच्यावर चिखल उडवत एक कार वेगाने निघून गेली.
A car raced by spattering mud over us.

खालील वाक्यांमधे -ing रूपाचा अर्थ ‘-ला’ असा होतो.

१) तो दररोज पोहायला जातो.
He goes swimming every day.
२) मला एकटं राहायला आवडत नाही.
I don’t like living alone. ३) सकाळी पाच वाजता कोबडे आरवायला लागतात.
At 5 a.m. cocks start crowing.
४) मला चालायला आवडतं.
Tlike walking.
५) मला चालायला खूप आवडतं.
I love walking
६) मला चालायला अजिबात आवडत नाही.
I hate walking
७) आम्ही दर शनिवारी खरेदी करायला जातो.
We go shopping every Saturday.
८) मला असले कपडे घालायला अजिबात आवडत नाही.
I hate wearing such clothes.
९) मी रोज सकाळी धावायला जातो.
go running every day.
१०) त्याला रांगेत उभं राहायला अजिबात आवडत नाही.
He hates standing in a queue.
११) आम्ही जुलैमधे घर बांधायला सुरुवात केली.
We started building the house in July.

● इथवर क्रियापदाच्या ing रूपाचे तीन प्रमुख अर्थ आपण पाहिले. आता या ing रूपाच्या उपयोगाबद्दल जी एक महत्त्वाची माहिती शिकायची आहे ती म्हणजे शब्दयोगी अव्ययानंतर लगेच क्रियापद येत असल्यास तेव्हा क्रियापदाचे -ing रूपच येते.
(यासंबंधीच्या एका अपवादासाठी ‘शब्दयोगी अव्यय’ या प्रकरणात except पहा)

उदाहरणे:१) तू कागदं कापून कात्री बोथट केली आहे.
You have blunted the scissors by cutting papers.
२) मुलांनी टेबलावर उड्या मारून टेबल मोडून टाकलं आहे.
Children have broken the table by jumping on it.
३) त्याने बोलण्यापूर्वी क्षणभर विचार केला.
He thought for a moment before speaking.
४) जवळपास शंभर लोक जळून मेले.
About 100 people died by burning. .
५) ही समस्या संपावर जाऊन सुटणार नाही. This problem will not be solved by going on strike.
६) जोखिम घेतल्याशिवाय तुम्ही जीवनात यशस्वी होऊ शकत नाही,
You can’t succeed in life without taking a risk.
७) दुकान सोडण्यापूर्वी नेहमी सुटे पैसे तपासून पहा.
Always check the change before leaving the shop.
८) फुटबॉल खेळताना त्याचा पाय मोडला.
He broke his leg while playing football
९) वाकताना माझी पाठ दुखते.
My back hurts while bending.
१०) मुलं चुळबूळ केल्याशिवाय जास्त वेळ बसू शकत नाहीत.
Children can’t sit for a long time without fidgeting.
११) तुझा वाढदिवस विसरल्याबद्दल मला खूप वाईट वाटतंय.
I feel very sorry about forgetting your birthday.
१२) काल रात्री ते अन्न खाल्ल्यापासून मला बरं वाटत नाही आहे.
Since eating that food last night, I am not feeling well.
१३) बटन दाबण्यापूर्वी प्लग व्यवस्थित लाव.
Push in the plug properly before pressing the button.
१४) मी दुसरी कार विकत घेण्याचा विचार करत आहे.
I am thinking of buying another car.
१५) त्या दुकानात विकत घेण्यासारखं काही नव्हतं.
There was nothing worth buying in that shop.
१६) या वर्तमानपत्रात वाचण्यासारखं काही नसतं,
There is nothing worth reading in this newspaper.
१७) हा कार्यक्रम बघण्यासारखा आहे.
This programme is worth watching.
१८) वेळेवर न आल्याबद्दल मी दीलगीर आहे.
am sorry for not coming on time.
१९) आम्हाला पत्ता शोधण्यात काही त्रास झाला नाही.
We had no difficulty in finding the address.
२०) तिथे जाण्यात मला रस नाही.
I am not interested in going there.
२१) आता निघण्याबद्दल तुझा काय विचार आहे?
What about leaving now?

◆ आता पुढील वाक्ये वाचा :

१) मी हे पुस्तक १९९० मधे लिहायला सुरुवात केली.
I started writing / I started to write this book in 1990.
२) त्याने लिहिणं संपवलं.
He finished writing.

हे दुसरं वाक्य to write वापरून करता येत नाही. पहिल्या वाक्यात क्रियापदानंतर to + क्रियापदाचे पहिले रूप किंवा क्रियापदाचे ing रूप यापैकी कोणतेही रूप वापरता आले. पण दुसऱ्या वाक्यात फक्त क्रियापदाचे ing रूप वापरता येते. पहिल्या वाक्यातील क्रियापद start आहे व दुसऱ्या वाक्यातील क्रियापद finish आहे. start या क्रियापदानंतर क्रियापदाचे ing रूप किंवा to + क्रियापदाचे पहिले रूप यापैकी काहीही वापरता येते. पण finish नंतर क्रियापदाचे ing रूपच वापरता येते. पुढे start सारखे आणि finish सारखे काही क्रियापद दिले आहेत.

ज्यांच्यानंतर क्रियापदाचे ing रूप किंवा to + क्रियापदाचे पहिले रूप यापैकी कोणतेही रूप वापरले जाऊ शकते अशी काही क्रियापदे :start (सुरुवात करणे), begin (सुरुवात करणे), prefer (पसंत करणे), like (आवडणे), love (खूप आवडणे), hate (अजिबात न आवडणे), continue,(सुरू ठेवणे).

ज्यांच्यानंतर क्रियापदाचे ing रूपच वापरले जाते अशी काही क्रियापदे :finish (संपवणे), enjoy (मधे आनंद घेणे/मजा येणे), practise (सराव करणे), avoid (टाळणे), consider (विचार करणे), suggest (सुचविणे), dislike (न आवडणे), detest (तिरस्कार करणे), mind (हरकत असणे, विरोध असणे), imagine (कल्पना करणे), delay (विलंब करणे).

क्रियापदाच्या ing रूपाचा उपयोग his, my, our, their, your अशा शब्दांसोबतही केला जाऊ शकतो. जसे,
१) त्यांनी माझ्या तिथे बसण्याला आक्षेप घेतला.
They objected to my sitting there.
२) त्याच्या इथे येण्याला माझा आक्षेप आहे.
I object to his coming here.
३) तुझं त्याला भेटणं मला आवडत नाही.
I don’t like your meeting him. ४) मला उशीर होण्याची शक्यता आहे.
There is a possibility of my getting late.
५) माझं तिथे जाणं त्याला आवडत नाही.
He doesn’t like my going there.
६) आम्ही इथे थांबलेलं तुम्हाला चालेल का?
Do you mind our staying here?
• या वाक्यांमध्ये my, your, his, our, their या षष्ठी विभक्तीतील शब्दाऐवजी द्वितीया विभक्तीचे शब्द (me, you, him, वगैरे) सुद्धा वापरले जाऊ शकतात.

Having + क्रियापदाचे तिसरे रूप

● भूतकाळातील क्रियेबद्दल बोलताना Having + क्रियापदाचे तिसरे रूप वापरले जाते.जसे,
१) I have a dim memory of having met him once before.
त्याला आधी एकदा भेटल्याची मला पुसटशी आठवण आहे.
२) He was accused of having stolen the money.
त्याच्यावर पैसे चोरल्याचा आरोप करण्यात आला.
3) I am sorry for having made a mistake.
चूक केली असल्याबद्दल मी दीलगीर आहे.
● पण अशी क्रिया व्यक्त करण्यासाठी सुद्धा सहसा क्रियापदाचे ing रूपच जास्त वापरले जाते. जसे, I have a dim memory of meeting him.
•Deny या क्रियापदानंतर having + क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाचा उपयोग बऱ्याचदा केला जातो. जसे,
He denied having attacked first.
प्रथम हल्ला केल्याचा त्याने इन्कार केला.
He denied having broken the mirror.
आरसा फोडल्याचा त्याने इन्कार केला.

क्रियापदाचे -ing रूप | having + | क्रियापदाचे -ing रूप in marathi – English grammer in marathi

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा