Infinitive Type, Examples | Infinitive ची रूपे,उपयोग/अर्थ

◆ INFINITIVE | Infinitive Type, Examples | I nfinitive ची रूपे,उपयोग/अर्थ – English grammer in marathi

INFINITIVE

पुढील दोन वाक्ये पहा :

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

१) we help each other. २) we try to help each other.
– पहिल्या वाक्यात help या क्रियापदाचा we हा कर्ता आहे. म्हणजे इथे help हे क्रियापद we या कर्त्याने मर्यादित झालेले आहे. अशा क्रियापदाला व्याकरणात Finite verb म्हणतात.

● पण दुसऱ्या वाक्यात to help फक्त क्रियेचे नाव आहे आणि ते कने मर्यादित झालेले नाही. अशा क्रियापदाला Infinite Verb किंवा Infinitive म्हणतात.
– Infinitive हे महत्त्वाचं प्रकरण आहे. पुढील वाक्ये पहा.
१) We eat to live.
२) He eats to live.
३) He ate to live.
● या वाक्यांवरून असं लक्षात येतं की दुसऱ्या वाक्यात कर्ता बदलल्यामुळे क्रियापद बदललं,
तिसऱ्या वाक्यात काळ बदलल्यामुळे क्रियापद बदललं. पण त्याचा to live या infinitive वर
काही परिणाम झाला नाही. यावरून असं समजतं की infinitive वर कर्त्यांचा आणि काळाचा काही परिणाम होत नाही.

Infinitive ची रूपे

Infinitive ची रूपे
Infinitive ची एकूण सहा रूपे आहेत. चार रूपे active voice ची आहेत व दोन passive voice ची आहेत.

◆ Active voice ची रूपे

Active voice ची रूपे :-
१) Simple infinitive (to + क्रियापदाचे पहिले रूप)
उदा. to help (= मदत करणे), to do, to teach, to wash. to write, इ.

२) Continuous infinitive (to be + क्रियापदाला ing)
उदा. to be helping (= मदत करत असणे), to be doing, to be teaching, इ.

३) Perfect infinitive (to have + क्रियापदाचे तिसरे रूप)
उदा. to have helped (= मदत केलेली असणे), to have done, to have taught, इ.

४) Perfect continuous infinitive (to have been + क्रियापदाला ing)
उदा. to have been helping (= मदत करत आलेला असणे), to have been doing, to have been teaching, इ.

Passive voice ची रूपे

Passive voice ची रूपे :

१) Simple infinitive (to be + क्रियापदाचे तिसरे रूप)
उदा. to be helped (= मदत केली जाणे), to be done, to be taught, इ.

२) Perfect infinitive (to have been + क्रियापदाचे तिसरे रूप)
उदा. to have been helped (मदत केली गेलेली असणे), to have been done, to have been taught, इ.

Infinitive चे उपयोग/अर्थ

Infinitive चे उपयोग/अर्थ

● Simple Infinitive (to + क्रियापदाचे पहिले रूप)

१) Simple Infinitive (to + क्रियापदाचे पहिले रूप)
हे infinitive चे सर्वात जास्त वापरले जाणारे व म्हणून सर्वात महत्त्वाचे रूप आहे. याचा उपयोग वाक्याच्या सुरुवातीला, क्रियापदानंतर, नामानंतर, विशेषणानंतर अशा वेगवेगळ्या ठिकाणी होतो.
या रूपाचे (म्हणजे to+ क्रियापदाचे पहिले रूप’चे) अर्थ आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. दुसऱ्या शब्दात आपल्याला ‘to+ क्रियापदाचे पहिले रूप’ यातल्या to चे अर्थ पहायचे आहेत. मराठीत या toचे प्रामुख्याने ला, साठी, णे, चे, वे असे अर्थ होतात.

खालील वाक्यांमधे to चा अर्थ ‘चा/ची/चे/च्या/चं’ असा होतो.

१) मी त्याला तिथे जाण्याचा सल्ला दिला.
I advised him to go there.
२) मी त्याच्या येण्याची वाट पाहत आहे.
I am waiting for him to come.
३) मी वेळेवर येण्याचा प्रयत्न करेन.
I will try to come on time.
४) तू मोठा होशील तेव्हा काय होण्याची इच्छा आहे तुझी?
What do you want to be when you grow up?
५) त्याने मला लाच देण्याचा प्रयत्न केला.
He tried to bribe me.
६) मी इंग्रजी शिकायचं ठरवलं आहे.
I have decided to learn English.
७) मी छत्री सोबत आणायचं विसरलो.
I forgot to bring my umbrella with me.
८) मी या क्षेत्रात तज्ञ असण्याचा दावा करत नाही.
I don’t claim to be an expert in this field.
९) मी त्याला मीटिंगला येण्याचं आमंत्रण दिलं होतं.
I had invited him to come to the meeting.
१०) आज रात्री ९ वाजता त्याला फोन करण्याची मला आठवण करून दे.
Remind me to phone him at 9 tonight.

खालील वाक्यांमधे to चा अर्थ ‘साठी/ला/स’ असा होतो

१) तो सायकल चालवायला शिकत आहे.
He is learning to ride a bicycle.
२) मला मराठी बोलायला आवडते.
I like to speak Marathi.
३) त्याला आरशात स्वत:कडे पहायला खूप आवडतं.
He loves to look at himself in the mirror
४) लोक त्याचं स्वागत करण्यासाठी उभे राहिले.
People stood up to welcome him.
५) चाकं फिरायला लागली.
The wheels started to turn (round).
६) मला मुंबईत राहायला खूप आवडेल.
I would love to live in Mumbai
७) मी त्याला वाट पहायला सांगितलं.
I told him to wait.
८) आपण आपल्या मुलांना मोठ्यांचा आदर करायला शिकवायला पाठिजे.
We should teach our children to respect our elders.
९) त्यांनी आम्हाला घर सोडायला भाग पाडलं. They compelled us to leave the house.
१०) परिणाम भोगायला तयार रहा.
Stay ready to suffer the consequences.

खालील वाक्यांमधे to चा अर्थ ‘णे/ण’ असा होतो.

१) त्याला नवीन कार विकत घेणं कसं परवडू शकतं?

How can he afford to buy a new car?
२) आमच्या ग्राहकांना समाधानी ठेवणं आमचं ध्येय आहे.
Our aim is to keep our customers happy.
३) आपल्याला या शहरात राहणं आता परवडू शकत नाही.
We can’t afford to live in this city any longer.
४) किमती वाढणं निश्चित आहे.
Prices are certain to rise.
५) यावेळेस त्याचं शर्यत जिंकणं निश्चित आहे.
He is sure to win the race this time.
६) टीका करणं सोपं असतं.
To criticise is easy / It is easy to criticise.

INFINITIVE चे साधे रूप (म्हणजे to + क्रियापदाचे पहिले रूप) यातल्या to चे प्रमुख अर्थ आपण पाहिले. वर पाहिलेल्या अर्थांना सोडून परिस्थितीनुसार to चे दुसरेही अर्थ कसे निघू शकतात ते खालच्या उदाहरणांवरून तुम्हाला पाहता येईल.

१) येणाऱ्या वर्षासाठी तुझ्या काय योजना आहेत?
What are your plans for the year to come?
२) तुला झोपेतून उठवल्याबद्दल मी दीलगीर आहे.
I am sorry to wake you up.
३) बातमी ऐकून तो दुःखी झाला.
He was sad to hear the news.
४) मी तुला काही त्रास देऊ इच्छित नाही.
I don’t want to put you to any trouble
५) तो हे वाचून रागात येईल.
He will be angry to read this.
६) तो दर तासाला त्याचा ड्रेस बदलतो असं दिसतं.
He seems to change his dress every hour.

Continuous Infinitive (to be + क्रियापदाला ing)

Continuous Infinitive (to be + क्रियापदाला ing)
– Infinitive चे हे चालू रूप खालीलप्रमाणे चालू क्रिया व्यक्त करण्यासाठी वापरले जाते. हाच अर्थ आपली नेहमीची चालू काळाची रचना वापरून सुद्धा साध्या पद्धतीने व्यक्त करता येतो. तेही खाली प्रत्येक ठिकाणी दाखवलेले आहे.
१) या गोळ्या मला काही फायदा देत आहेत असं दिसत नाही.
These pills don’t seem to be doing me any good. /It doesn’t seem that these pills are doing me any good.
२) देश क्रांतीच्या दिशेने जात आहे असं दिसतं.
The country seems to be heading towards revolution./It seems that the country is heading towards revolution.
३) कुत्रा तुझ्याकडे येत आहे असं दिसतं.
The dog seems to be coming towards you. / It seems that the dog is coming towards you.
४) जेव्हाही मी त्याच्या घरी जातो तो काम करत असल्याचं नाटक करतो.
He pretends to be working whenever I go to his house./ He pretends that he is working whenever I go to his house.
५) लवकरच काही पैसे कमवत असण्याची त्याला आशा आहे.
He hopes to be earning some money very soon. / He hopes that he will be earning some money very soon.
६) तो सध्या लंडनमधे राहत आहे असं समजलं जातं.
He is thought to be living in London at present. / It is thought that he is living in London at present.
७) तो हेरगिरी करत होता असं दिसलं.
He seemed to be spying. / It seemed that he was spying

Perfect Infinitive (to have+ क्रियापदाचे तिसरे रूप)

● Infinitive चे हे पूर्ण रूप खालीलप्रमाणे पूर्ण क्रिया व्यक्त करण्यासाठी वापरले जाते .हाच अर्थ आपली नेहमीची पूर्ण काळाची रचना वापरून सुद्धा साध्या पद्धतीने व्यक्त करता येतो. तेही खाली प्रत्येक ठिकाणी दाखवलेले आहे.

• १) प्रवासाला एक महिना लागला असण्याची शक्यता आहे.
The journey is likely to have taken a month. /
It is likely that the journey has taken a month.
• फरक पहा :- प्रवासाला एक महिना लागण्याची शक्यता आहे. The journey is likely to
take one month. / It is likely that the journey will take one month.

• २) पाऊस संध्याकाळपर्यंत थांबला असण्याची शक्यता आहे.
The rain is likely to have stopped by the evening. / It is likely that the rain will have stopped by the evening.

• ३) तो देशातून पळून गेला असण्याची शक्यता आहे.
He is likely to have fled the country. I
It is likely that he has fled the country.

• ४) तू खूप सुदैवी आहेस तुला इतकी चांगली पत्नी मिळाली आहे.
You are very fortunate to have found such a good wife./ It is very fortunate that you have found such a good wife.

• ५) वक्त्याने भाषणाची काही तयारी केलेली दिसली नाही.
The speaker didn’t seem to have done any preparation for the speech. / It didn’t seem that the speaker had done anypreparation for the speech.

• ६) त्याने माझं नाव विसरलं असल्याचं नाटक केलं.
He pretended to have forgotten my name./ He pretended that he had forgotten my name.

• ७) त्याला आशा आहे की त्याने या वर्षाच्या शेवटपर्यंत १०,००० रुपयांची बचत केलेली
असेल.
He hopes to have saved 10,000 rupees by the end of this year./ He hopes that he will have saved Rs 10,000 by the end of this year.

८) तो कुटुंबासह मुंबई सोडून गेला आहे असं दिसतं.
He seems to have left Mumbai with his family. / It seems that he has left Mumbai with his family.

Perfect Continuous Infinitive (to have been+क्रियापदाला ing)

Perfect Continuous Infinitive (to have been+क्रियापदाला ing)
Infinitive च्या या पूर्ण चालू रूपाचा अर्थ करत आलेला असणे असा होतो.
उदा. १) तो आपल्याला मूर्ख बनवत आलेला आहे असं दिसतं. He seems to have been fooling us.
दुसऱ्या प्रकारे:– It seems that he has been fooling us.

२) तो आपल्याला मूर्ख बनवत आलेला होता असं दिसलं.
He seemed to have been fooling us.
दुसऱ्या प्रकारे:- It seemed that he had been fooling us.

३) तो हेरगिरी करत आलेला आहे असं दिसतं.
He appears to have been spying.
दुसऱ्या प्रकारे:- It appears that he has been spying.

INFINITIVE | Infinitive Type, Examples | I nfinitive ची रूपे,उपयोग/अर्थ – English grammer in marathi

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा