भारतीय किनारी मैदानी (Indian Coastal Plains)
भारतीय किनारी मैदानी (Indian Coastal Plains)
- भारतीय सागर किनारपट्टीची लांबी ५६७६ कि.मी. आहे. भारतास पूर्व किनारपट्टी आणि पश्चिम किनारपट्टी अशा दोन किनारपट्या आहे भारताच्या पश्चिम किनारपट्टी जवळ अरबी समुद्र आणि पूर्व किनारपट्टी जवळ बगालचे उपसागर आहे.
- भारतीय किनारी मैदानी प्रदेशाची निर्मिती (Origin of Indian coast) : भारतीय किनारपट्टीची निर्मिती इओसीन कल्पाच्या अंतिम काळात अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या भ्रंश आणि निम्मजनामुळे (Suhmergence) झालेली आहे. प्लायोसीन आणि क्वार्टनरी (Quaterinary) काळात किनारपट्टीवर निक्षेपण झाले. किनारपट्टीवर निमज्जन आणि उन्मज्जनाचे पुरावे पाहावयास मिळतात.
- भारतीय किनारी मैदानी प्रदेशाची प्राकृतिक विभागणी
- पश्चिम किनारी मैदानी प्रदेश
- पूर्व किनारी मैदानी प्रदेश
१) पश्चिम किनारी मैदानी प्रदेश :
– अरबी समुद्र आणि सह्याद्री यांच्या दरम्यान पश्चिम किनारी मैदानी प्रदेश आहे.
– या मैदानाची लांबी १५०० कि.मी. व दी १० ते ८० किमी. मैदानाची उंची १५० मी पर्यंत आहे.
– किनारपट्टीच्या मैदानी प्रदेशात गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाट केरळ राज्यांचा किनारपट्टीचा भाग व तमिळनाडू राज्याच्या कन्याकुमारी जिल्ह्याचा समावेश होतो.
– पश्चिम किनारपट्टी जवळजवळ सरळ असून कन्याकुमारी पासून उत्तरेस २२ उत्तर अक्षावृत्त पर्यंत.
• पश्चिम किनारी मैदानी प्रदेशातील विभाग
- गुजरातचा किनारा
- कोकण किनारा
- केरळचा किनारा (मलबार)
• १) गुजरातचा किनारा : गुजरात राज्याला सर्वात लांब किनारा लाभला आहे. (१६०० कि.मी.)
– गुजरातच्या किनारी मैदानी प्रदेशात कच्छ द्वीपकल्प, काठेवाड द्वीपकल्प आणि गुजरात मैदानाचा समावेश होतो.
– कच्छ द्वीपकल्प : कच्छच्या उत्तरेस बराच मोठा क्षारयुक्त सपाट मैदानी प्रदेश असून त्यास कच्छचे रण असे म्हणतात. कच्छच्या रणाचे दोन भाग पडतात, मोठे कच्छचे रण आणि छोटे कच्छचे रण
– मोठे कच्छचे रण वाळूयुक्त आहे, कच्छाच्या रणात काही उंचवट्याचे प्रदेश एखादया बेटासारखे दिसतात. त्यामधील पच्चम, खदीर, बेला हे उंचवट्याचे भाग आहे, पच्चम बेटाच्या दक्षिणेस बन्नी येथे मोठा गवताळ प्रदेश आहे. कच्छ च्या रणामध्ये लुनी नदी लुप्त होते, तसेच रणात समुद्राचे पाणी पसरून दलदलीचा प्रदेश निर्माण होतो.
– छोटे कच्छाचे रण : मोठ्या कच्छाच्या रणाच्या दक्षिणेकडे छोटे कच्छचे रण आहे.कच्छ चे द्विपकल्प हे वाळूचा मैदानी प्रदेश, वनस्पतीविरहित आहे. हा प्रदेश निमओसाड असून किनारपट्टीजवळ वाळूच्या टेकड्या आढळतात.
२) काठेवाड द्वीपकल्प : कच्छच्या दक्षिण भागात काठेवाड द्वीपकल्प आहे. याची पश्चिम भाग दलदलयुक्त आहे. काठेवाड मध्ये सर्वात उंच पर्वत गिरनार पर्वत (१११७ मी.) आहे, त्याची निर्मिती ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे झालेली आहे. गिरनार पर्वताच्या भागात घनदाट गीरचे जंगल आहे. काठेवाड द्वीपकल्प चे मध्य भाग उंच असून तेथे मांडव, औसम टेकड्या आहे.
३) गुजरात मैदान : काठेवाडच्या पूर्वेस गुजरात मैदान आहे. गुजरात मैदानातून मही, नर्मदा, तापी, साबरमती नदया चाहतात, आणि शेवटी खंबायतच्या आखातमधून अरबी समुद्रास मिळतात. गुजरात मैदानाचा पश्चिम भागात खाया दलदलीचे प्रदेश आहे.
– कर्नाटक किनारपट्टीची सर्वसाधारण रूंदी २४ किमी. असून सर्वात जास्त रूंदी नेत्रावती दरीत मंगलोर शहराजवळ आहे.
– गुजरात किनारी मैदानी प्रदेशात दोन आखाती प्रदेशाचा समावेश होतो. (कच्छ चे अखात, खंबायत चे अखात)
२) कोकण किनारा : कोकण किनारपट्टीचा विस्तार उत्तरेस दमणगंगा नदीपासून दक्षिणेस तेरेखोल नदीपर्यंत आहे.
– या किनारपट्टीची लांबी ७२० किमी. असून, रूंदी सुमारे ५० कि.मी. से १०० कि.मी. च्या दरम्यान आहे, या किनारी प्रदेशात पश्चिम घाटापासून किनाऱ्यापर्यंत विसतारलेल्या भूशिरांची मालिकाच पसरलेली आहे.
– कोकण किनारा हा खडकाळ किनारा आहे.
३) कर्नाटक किनारपट्टी (कारवार) : कर्नाटक किनारपट्टीची उत्तर दक्षिण लांबी २२५ कि.मी.
– या भागात उंच वाळूच्या टेकड्या आहेत.
४) केरळचा किनारा (मलबार) : केरळ किनारा चा विस्तार कन्नोरपासून कन्याकुमारीपर्यथत ५५० कि.मी. लांबीचा आहे.
– हा प्रदेश सपाट आहे, यांची उंची १० ते ३० मी. आहे, केरळ किनारपट्टीमध्ये वाळूच्या टेकड्या सर्वत्र आहे. ज्यांना स्थानिक स्तरावर थेरीस (Theriy) असे म्हणतात.
– वाळूच्या टेकड्यामुळे अनेक उथळ खाजण (Lagoons) आणि भरतीच्या पाण्याचे प्रदेश (Bnck wiater) तयार झालेले आहे. त्यांना स्थानिक स्तरावर कायल (Kayal) असे म्हणतात. हे या किनाऱ्याचे वैशिष्ट्य आहे. बेंबनाड हे केरळमधील सर्वात मोठे कायल आहे.
– अरबी समुद्रामध्ये १०० मी. पाण्याची खोली असणाऱ्या प्रदेशापर्यंत पश्चिम किनारपट्टीची समुद्रबूड (continen- tal Shelf) जमीन पसरली आहे. समुद्रबुड जमिनीची जास्तीत जास्त रूंदी मुंबई किनारपट्टीजवळ ३५० कि.मी. समुद्रात आहे. सध्याच्या सागरात असणाऱ्या समुद्रातुन जमिनीचा भाग पूर्वी भूप्रदेशाचा असावा.
२) पूर्व किनारी मैदानी प्रदेश : अंगाल चे उपसागर आणि पूर्व घाट यांच्या दरम्यान पूर्व किनारी मैदानी प्रदेश आहे.पूर्व किनारी मैदानी प्रदेश कन्याकुमारीपासून ते संदरवन पर्यंत पसरलेली आहे.
– पूर्व किनारी मैदानाचे वैशिष्ट्य म्हणजे पठारावरून नद्यांनी निर्माण केले. त्रिभूज प्रदेश येथे कावेरी, कृष्णा, गोदावरी आणि महानदी नदयाचे त्रिभुज प्रदेश आहे, पूर्व किनारपट्टी, पश्चिम किनारपट्टी पेक्षा रूंद आहे. आंध्रप्रदेश आणि तमिळनाडू राज्यांत पूर्व किनारपट्टीस पयन घाट (Payan Ghat) असे म्हणतात.
– अनेक वाळूचे दांडे किनाऱ्यालगत आहे, यांचे उदाहरण म्हणजे रामेश्वर बेट.
• पूर्व किनारी मैदानी प्रदेशाचे तीन विभाग. १) ओरिसा किनारा (उत्कल मैदान),२) आंध्र किनारा,३) तमिळनाडू किनारा (कोरोमंडल)
१) ओरिसा किनारा (उत्कल मैदान)
– सुवर्णरेखा नदीपासून दक्षिणेस ऋषीकुल या नदीपर्यंत उत्कल मैदान असून त्याची लांबी ४०० कि.मी. आहे. महानदीच्या त्रिभुज प्रदेशाचा समावेश ओरिसा किनारपट्टीमध्ये होतो. ओरिसा किनारपट्टीमध्ये चिलका सरोवर आहे.
– त्रिभूज प्रदेशाच्या दक्षिणेस चिल्का सरोवर आहे. चिल्का सरोवराच्या ईशान्य भागात दया आणि भार्गवी या नदयांचे मुख आहे.
– ओरिसा किनारपट्टीस समांतर वाळूच्या टेकड्या आहे, वाळूच्या टेकड्यांची निर्मिती समुद्रकिनान्याच्या उंचवण्यामुळे
२) आंध्र मैदान
– उत्कल मैदानच्या दक्षिणेपासून पुलिकत सरोबर पर्यंत आंध्र मैदानाचा विस्तार आहे.
– आंध्र मैदानात गोदावरी आणि कृष्णा या दोन त्रिभुज प्रदेशाचा समावेश होतो. कृष्णा आणि गोदावरी नद्यांच्या त्रिभूज प्रदेशाच्या दरम्यान कोलेरू सरोवर आहे. कोलेरू गोड्या पाण्याचे सरोवर आहे.
– आंध्रमैदान आणि तमिळनाडू मैदानाच्या सरहदीवर पुलिकत सरोवर आहे.
३) तमिळनाडू किनारा (कोरोमंडल किनारा)
– कन्याकुमारीपासून कृष्णा नदीच्या त्रिभूज प्रदेशापर्यंत मैदानाचा विस्तार आहे, मैदानाची लांबी ६७५ कि.मी.
– मैदानात कावेरी नदीचे त्रिभूज प्रदेश आहे.
– कन्याकुमारी आणि रामेश्वरम मधला किनारा हा मन्नारच्या आखाताला लागून आहे. आखाती प्रदेशात प्रवाळ संचयन आहे.
– मन्नारचे अखात मोत्यांच्या साठ्यासाठी प्रसिध्द आहे. किनार्या लगत अनेक खाऱ्या पाण्याचे सरोवर आहेत, त्यातील पुलिकत सरोवर उल्लेखनिय आहे.
– अरबी समुद्राच्या समुद्रबुड जमिनीशी तुलना करता बंगालच्या उपसागराच्या समुद्रयुडाची रूंदी बरीच कमी आहे. पूर्व किनारी मैदानी प्रदेश महानदी ते कृष्णा नदी दरम्यान Northem Crears म्हणून ओळखला जातो, तर कृष्णा ते कावेरी दरम्यान Cumatic म्हणून ओळखला जातो.