GET,GO,DO,WONDER,LET,POINT Words Meaning in Marathi

Some important words in English – GET,GO,DO,WONDER,LET,POINT etc. | English Grammar in marathi

GET

● 1.GET

Get हा इंग्रजीचा खूप उपयुक्त शब्द आहे. खालीलप्रमाणे वेगवेगळ्या अर्थाने get चा उपयोग होतो.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

१) तुला ही बातमी केव्हा मिळाली?
When did you get this news?

२) मी इथे तुझा सल्ला घ्यायला आलो.
I came here to get your advice.

३) तुझ्या रेडिओवर कोणकोणते स्टेशन लागतात?
Which stations do you get on your radio?

४) मला आज सकाळी माझ्या एका जुन्या मित्राचा फोन आला.
I got a (telephone) call from anवold friend of mine this morning.

५) तुझा चहा थंड होत आहे.
Your tea is getting cold.

६) तू लवकरच बरा होशील.
You will soon get better.

७) तो तुला अडचणीत अडकवण्याचा प्रयत्न करत आहे.
He is trying to get you into trouble.

८) मला मुलांना शाळेसाठी तयार करायचं आहे.
I have to get the children ready for school.

९) खुर्चीवरून तुझा पाय काढ.
Get your foot off the chair

GO

● 2.GO

१) मी शाळेत जात आहे.
I am going to school.
२) हा रस्ता मुंबईला जातो.
This road goes to Mumbai.
३) बस चालायला लागली.
The bus started going.
४) माझा पेन कुठे गेला आहे?
Where has my pen gone?
५) मला वाटतं तो वेडा झाला आहे.
I think he has gone mad.
६) खराब होण्यापूर्वी हे आंबे खाऊन घ्या.
Eat these mangoes before they go bad.
७) माझं घड्याळ पुन्हा बिघडलंय.
My watch has gone wrong again.

DO

3.DO

१) तू काय करत आहेस?
What are you doing?
२) तू भांडे घासले आहेत का?
Have you done the dishes?
३) तू हे कोडं सोडवू शकतोस का?
Can you do this riddle?
४) तू फराळासाठी काय करत/शिजवत आहेस?
What are you doing for breakfast?

● अनौपचारिक (म्हणजे बोलण्यातील) इंग्रजीमधे do चा खूप वेगवेगळ्या अर्थाने उपयोग होतो. परिस्थितीनुसार/सोबत आलेल्या दुसऱ्या शब्दावरून अर्थ स्पष्ट होतो.

५) ही फुलं कोणी लावली आहेत?
Who has done these flowers?
६) मला वाटतं तू तुझी नखं कापायला पाहिजे.
I think you need to do your nails.
७) तू अलीकडे तुझे दात घासले आहेत का?
Have you done your teeth recently?
८) ही कार ताशी २०० किमी वेगाने
This car can do 200 kms an hour.
९) तुझे पैसे मी सोमवारी परत दिले तर चालेल का?
Will it do if I repay your money on Monday?
१०) अशा प्रकारची बेशिस्त इथे चालणार नाही
This kind of indiscipline won’t do here.
११) तुला आणखी थोडा भात हवाय का?
~नको, इतकं मला पुरेसं होईल.
would you like some more rice? No, this (much) will do me.
thanks.
१२) कसं काय चाललंय तुझं?
How are you doing?

WONDER

4.WONDER
wonder चा अर्थ आश्चर्य (वाटणे) तर तुम्हाला माहीतच आहे. Wonder चा दुसराही एक प्रचलित अर्थ आहे. हा दुसरा अर्थ लक्षात घ्या.
wonder = स्वतःशीच विचारणे/विचार करणे, विचारात असणे; न कळणे, न सुचणे, सुचेनासे होणे.

उदाहरणे:

१) कुठे जायचं त्या विचारात मी होतो.
I was wondering where to go.
२) तो इतका वेळ का वाया घालवतो मला कळत नाही.
I wonder why he wastes so much time.
३) त्यांना काय हवंय मला कळत नाही.
I wonder what they want.

LET

● 5.LET
या वाक्यांमधे let चा अर्थ करू देणे असा होतो.

उदाहरणे:
१) मी तुला इथे बसू देणार नाही.
या वाक्याचं होकारार्थी बसू देईन असं होईल. ‘बसू देईन‘ म्हणजे बसण्याची क्रिया करू देईन. वाक्यात ‘करू देणे‘ हे क्रियापद आलं. आणि वाक्य साध्या भविष्यकाळाचं आहे.

LET ALONE

6.LET ALONE
Let alone चा उपयोग तर सोडा किंवा तर दूरचीच गोष्ट आहे या अर्थाने केला जातो. Let alone चा उपयोग नकारार्थी वाक्यानंतर होतो.
उदाहरणे:
१) तो सायकल विकत घेऊ शकत नाही, कार (विकत घेण) तर दूरची गोष्ट आहे.
He can’t buy a bicycle, let alone (buy) a car.
२) तो इतका पिलेला होता की तो बरोबर उभाही राहू शकत नव्हता, चालणं तर सोडाच.
He was so drunk he couldn’t even stand properly, let alone walk
३) पुस्तके तर सोडा, काही लोक वर्तमानपत्रही वाचत नाहीत.
Some people don’t even read a newspaper, let alone books
४) सिनेमा तर दूरची गोष्ट आहे, तो टीव्ही पण पाहत नाही.
He doesn’t watch TV, let alone movies.
५) माणूस डासाला मारू शकत नाही, माणसाला (मारणं) तर दूरची गोष्ट आहे.
Man can’t kill a mosquito, let alone (kill) a man.

POINT

● 7.POINT

१) मला हे सुरू ठेवण्यात काही अर्थ/उपयोग/फायदा दिसत नाही.
I see no point in continuing this.
२) मला तिथे जाण्यात काही अर्थ दिसत नाही.
I see no point in going there.
३) आता त्याची वाट पाहण्यात काही अर्थ नाही.
There is no point (in) waiting
४) त्याबद्दल वाद घालण्यात काही अर्थ नाही
There is no point (in) arguing about it.

RUN

8.RUN
१) मी तुझ्यापेक्षा जास्त वेगाने धावू शकतो.
I can run faster than you.
२) तुला ताप आहे.
You are running a fever.
३) थोडा वेळ इंजिन चालू ठेवा.
Leave the engine running for some time.
४) नदीच्या बाजूने एक रस्ता जातो.
A road runs along the river.
५) आगगाड्या आधी कोळशावर चालायच्या
Trains used to run on coal before.
६) माझी कार आता चांगली चालत आहे.
My car is running well now.
७) ही मशीन कशी चालवावी तुला माहीत आहे का?
Do you know how to run this machine?
८) ही कंपनी कोण चालवतो?
Who runs this company?
९) सर्दीमुळे त्याचं नाक वाहत आहे.
His nose is running because of a cold.
१०) पंधराव्या वर्षी तो घरातून पळून गेला.
He ran away from home at the age of 15 years.
११) माझे पैसे संपले आहेत.
I have run out of money.
१२) पाणी भरून वाहत आहे. नळ बंद कर.
The water is running over. Turn the tap off.

SET

9.SET
१) माझं घड्याळ मी टीव्हीवरील वेळेनुसार लावतो. I set my watch by the time on TV/ by the TV time.

WISH

● 10.WISH
१) तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवो!
May all your wishes come true
२) तर अशी इच्छा आहे तुझी!
So this is your wish!
३) तुझी काय होण्याची इच्छा आहे?
What do you wish to become?
४) सगळे दिवस रविवार असावेत असे मला वाटते.
I wish (that) all days were Sundays.
५) मी ती नोकरी सोडली नसती तर बरं झालं असतं.(म्हणजे सोडल्याबद्दल आता मला पश्चात्ताप आहे.)
I wish (that) I hadn’t left that job

MEAN

● 11.MEAN
Mean चा उपयोग अर्थ असणे किंवा म्हणण्याचा अर्थ असणे किंवा हेतू असणे या अर्थाने होतो आणि बहुधा साध्या काळात होतो. उदाहरणे पहा:

१) तुला काय म्हणायचंय?/तुझ्या म्हणण्याचा अर्थ काय?
What do you mean?
२) मला काय म्हणायचंय समजतंय का तुला?
Do you understand what I mean?
तुला असं म्हणायचंय का की हे हरीने केलं आहे?
Do you mean (to say) that Hari has done this?
४) या शब्दाचा अर्थ काय होतो?
What does this word mean?

Some important words in English – GET,GO,DO,WONDER,LET,POINT etc. | English Grammar in marathi

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा