आज्ञार्थी वाक्ये । Imperative Sentence in Marathi

◆ आज्ञार्थी वाक्ये ( Imparative sentence ) | English Grammar

● आज्ञार्थी वाक्यांच्या अभ्यासाची सुरुवात आपण आज्ञार्थी वाक्यांच्या सर्वात साध्या परंतु सर्वात प्रमुख रचनेपासून करत आहोत.

रचना :- क्रियापदाचे पहिले रूप +…..
या रचनेचा अर्थ आहे आज्ञार्थी वाक्याची सुरुवात क्रियापदाच्या पहिल्या रूपापासून होते. आणि क्रियापदानंतर पुढे जे असेल ते येते.
• उदा:-१) जा = Go.
२) ये = Come. ३) ऐक = Listen.
४) विचार कर = Think.
५) थांब = Stop.
ही एकेका शब्दाची वाक्ये झाली. यावरून लक्षात येतं की एका शब्दाचंही वाक्य होऊ शकतं. तसं वाक्यात सहसा एकापेक्षा जास्तच शब्द असतात. पण एका शब्दातूनही पूर्ण अर्थ निघत असेल तर तो एक शब्द वाक्यच होईल. जसं, आपण एखाद्याला ‘जा’ असं म्हटलं तर ऐकणाऱ्याला त्यातून पूर्ण अर्थ समजतो आणि तो जातो (किंवा जात नाही – प्रण त्याला अर्थ
समजतो). म्हणून ‘जा’ हे वाक्य झालं.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आता पुढची उदाहरणे

६) पुन्हा विचार करा.
Think again.
+1 क्रि.१ ले रूप +………….. ७) मला सांग.
Tell me.
८) सांग मला.
Tell me.
९) मला तुझी अडचण सांग.
Tell me your difficulty.
१०) त्याला विचार
Ask him. .
११) हा कचरा फेकून दे/द्या.
Throw away this rubbish.
१२) बोर्डाकडे बघा.
Look at the board.
१३) मेणबत्ती विझव.
Blow out the candle.
१४) खिडकी बंद कर आणि खिटी लाव.
Close the window and draw the bolt
१५) हे पुस्तक टेबलावर ठेव.
Put the book on the table.
१६) पुस्तक बंद कर आणि माझं ऐक.
Close the book and listen to me.
१७) थोडं समोर ये आणि या रेषेवर उभा रहा. come forward a bit and stand on this line.
१८) रस्ता ओलांडण्यापूर्वी दोन्हीकडे पहा.
Look both ways before crossing the road.
१९) तुझी खुर्ची (थोडी) पुढे घे.
Move your chair (a bit) forward(s).
२०) खुर्चीवरून तुझा पाय काढ.
Take your foot off the chair.

आज्ञार्थी वाक्यात you हे सर्वनाम वापरण्याची सहसा गरज पडत नाही – पण एखाद्या वेळेस पुढीलप्रमाणे you वापरता येईल .

१) तू चल पुढे – मी येतच आहे.
You go on (ahead) – I am just
coming.
२) तू ढकल आणि मी ओढतो.
You push and I will pull.
३) अरे तू, इकडे ये.
Hey, you! Come over here.
४) तू इथे थांब आणि मी जाऊन टॅक्सी आणतो.
You stop here and I will go and get a taxi.
५) तू थांब जरा.
Just you wait.

आज्ञार्थी वाक्यात उद्देशून बोलल्या जात असलेल्या व्यक्तीचे नाव वापरण्याची सहसा गरज नसते. पण वापरायचेच असल्यास साधारणपणे वाक्याच्या शेवटी वापरले जाते. जसे,
Come here, Ram (राम, इथे ये).
Sit down, children. (बसा मुलांनो)
(पण Ram, come here असे सुद्धा म्हणता येईल.)

आज्ञार्थी वाक्यात क्रियापदावर जोर देण्यासाठी किंवा आग्रह व्यक्त करण्यासाठी खालीलप्रमाणे do चा उपयोग केला जाऊ शकतो.
१)Do come again.
पुन्हा अवश्य या/पुन्हा जरूर या/या ह पुन्हा.
२) Do remind me to post this letter.
हे पत्र टाकण्याची मला जरा आठवण करून दे.
3) Do shut up now.
गप्प बस (बरं) आता.
४) Do tell me what happened.
काय झालं मला सांग जरा.
५) Do ring me as soon as you get there.
तू तिथे पोहोचल्याबरोबर मला फोन कर हं.

रचना :-Don’t /Do not + क्रियापदाचे पहिले रूप +……
ही नकारार्थी आज्ञार्थी वाक्याची रचना आहे. एखादी क्रिया करू नको/करू नका/ करू नकोस असे म्हणण्यासाठी ही रचना वापरली जाते.
• उदाहरणे :१) जाऊ नकोस.
Don’t go / Do not go.
२) येऊ नकोस.
Don’t come. .
३) इथे येऊ नकोस.
Don’t come here.
४) इथे पुन्हा येऊ नकोस.
Don’t come here again.
५) ओरडू नकोस.
Don’t shout.
६) हसू नकोस.
Don’t laugh.
७) घाई करू नकोस.
Don’t hurry.
८) घाबरू नकोस.
Don’t fear. .
९) मला काहीच सांगू नकोस.
Don’t tell me anything.
१०) मला दोष देऊ नकोस.
Don’t blame me.
११) असं समजू नकोस.
Don’t think so.

◆ आज्ञार्थी वाक्यात let चा उपयोग

आज्ञार्थी वाक्यात let चा उपयोग

• प्रामुख्याने करू दे/करू द्या/करू या असा अर्थ व्यक्त करण्यासाठी इंग्रजीत वाक्याची सुरुवात let पासून केली जाते. Let नंतर कर्म येते (कर्माच्या ठिकाणी me, him, them, us असे शब्द येतील – I, he, they, we असे शब्द नाही). आणि कर्मानंतर क्रियापदाचे पहिले रूप येते.

उदाहरणे:१) मला विचार करू दे.
Let me think.
२) त्याला अभ्यास करू दे.
Let him study.
३) त्याला आत येऊ दे.
Let him come in.
४) त्याला आत येऊ देऊ नको.
Don’t let him come in.
५) त्यांना सत्य पाहू द्या.
Let them see the truth.
६) शर्ट अद्याप थोडा ओला आहे, व्यवस्थित वाळू दे.
The shirt is still a bit wet, let it dry properly.
७) आपण आता जाऊया.
Let us go now.
८) आपण निघू या आता.
Let us leave now.
९) आपण आज सायंकाळी बागेत जाऊ या.
Let us go to the park this evening
१०) आपण ही चर्चा पुन्हा कधी सुरू ठेवू.
Let us continue this discussion
at some other time.

अशा प्रकारच्या वाक्याला इंग्रजीमधे खालील प्रकारे प्रतिसाद देता येईल : Yes, let us. (= हो, करू या.)
No, let us not. (= नको, नाही करायची त्याला मदत.)

विधानार्थी वाक्याला प्रतिसाद देण्यासाठी खालीलप्रमाणे let चा उपयोग केला जाऊ शकतो.
१) लोक तुझ्यावर हसतील.
People will laugh at you. २) तो तुला मदत करणार नाही.
He will not help you.
या वाक्याला आपण मराठीत ‘नको करू दे’ असा प्रतिसाद देऊ शकतो.
इंग्रजीमधे नको करू दे= Let him not.

Let us पासून सुरू होणाऱ्या वाक्याचे नकारार्थी करण्यासाठी साधारणपणे क्रियापदाच्या आधी not वापरले जाते.
उदाहरणे :
१) Let us not quarrel with each other from now on.
आता यापुढे आपण एकदुसऱ्याशी भांडायचं नाही.
२) Let us not stop till we reach our goal.
आपल्या ध्येयावर पोहचेपर्यंत आपण थांबता कामा नये/थांबायचं नाही.
३) Let us never forget this advice of Socrates.
सॉक्रेटिसचा हा सल्ला आपण कधीच विसरायला नको/विसरता कामा नये.

‘Let me….’ चा उपयोग खालीलप्रमाणे एखाद्याला सभ्यपणे काही म्हणण्यासाठी सुद्धा केला जातो :
१) मी तुला एक गोष्ट सांगतो.
Let me tell you one thing.
२) मी तुला एक प्रश्न विचारतो.
Let me ask you one question.
३) आता मी मुख्य मुद्दयावर येतो.
Let me come to the main point now.
४) मी तुला माझा नवीन ड्रेस दाखवतो.
Let me show you my new dress.
५) मी तुला उठवून बसवतो.
Let me sit you up.
६) मी तुम्हाला आणखी एक उदाहरण देतो.
Let me give you one more example.

Let me know चा अर्थ मला कळव किंवा मला सांग असा होतो. जसे,
Let me know if there is any change.
काही बदल झाल्यास मला कळव.
Let me know how that happened.
ते कसं घडलं मला सांग. या

आज्ञार्थी वाक्ये ( Imparative sentence ) | English Grammar

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा