IBPS Recruitment 2024: आयबीपीएस मार्फत देशातील ग्रामीण बँकामध्ये मोठ्या संख्येत 6128 पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली असून पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. .इतर भरती प्रक्रिया व पात्रता खालील प्रमाणे
भारतीय बँकिंग कर्मचारी निवड संस्था (IBPS) संपूर्ण भारतातील विविध सरकारी बँकांसाठी भरती परीक्षा घेते. यंदा, IBPS ने 6128 क्लर्क पदांची भरती जाहीर केली आहे, ज्यामुळे बँकिंग क्षेत्रात स्थिर आणि फायदेशीर कारकीर्द शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे.
IBPS Clerk Recruitment 2024 Notification in Marathi
पदाचे नाव – लिपिक
एकूण पदे : 6128 [जागा वाढतील अनेक बँकांनी अजून संख्या टाकली नाही]
महाराष्ट्रातील बँकेत एकूण रिक्त जागा : 590+
नोकरी ठिकाण : भारतात कुठेही
पात्रता निकष:
IBPS क्लर्क परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी, उमेदवारांनी खालील निकष पूर्ण केले पाहिजेत:
- शैक्षणिक अर्हता: एखाद्या मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा बोर्डाकडून कमीतकमी कोणतेही पदवीधर असणे आवश्यक आहे.
- भाषा कौशल्ये: इंग्रजी तसेच प्रादेशिक भाषेवर चांगले प्रभुत्व असणे आवश्यक आहे.
- वय मर्यादा: विशिष्ट वय मर्यादा बँकेनुसार वेगळी असू शकते. तथापि, ती साधारणपणे 20 ते 28 वर्षांच्या दरम्यान असते. इतर नियमांनुसार सूट, कृपया अधिकृत अधिसूचना पहा.
- कंप्युटर साक्षरता: मूलभूत संगणक साक्षरता आणि संगणक कार्यक्षमतेने चालवण्याची क्षमता आवश्यक आहे.
- राष्ट्रीयत्व: तुम्ही भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा – 18 ते 28 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट] पदानुसार बघण्यासाठी जाहिरात डाउनलोड करा
वेतन : नियमानुसार
निवड प्रक्रिया : प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा (Prelims+ Mains)
परीक्षा भाषा : इंग्लिश, हिंदी, मराठी, कोंकणी {महारष्ट्राकरिता}
ऑफलाईन अर्ज सादर करण्याची कालावधी : 01 जुलै 2024 ते 21 जुलै 2024
अर्ज कसा करावा:
- IBPS च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या: https://www.ibps.in/
- “Online Application for CWE Clerk 2024” या लिंकवर क्लिक करा.
- आवश्यक माहिती प्रविष्ट करा आणि ऑनलाइन नोंदणी पूर्ण करा.
- आवश्यक ती माहिती भरा व कागदपत्रे माहिती जतन करा
- नोंदणी शुल्क ऑनलाइन भरा.
- माहिती तपासून ऑनलाईन अर्जाची प्रिंट काढून ठेवा..
इतर माहिती व ऑनलाईन अर्ज लिंक साठी जाहिरात डाउनलोड करा : येथे क्लिक करा
Post