Maharashtra Homeguard Bharti 2024 : राज्यात होमगार्ड जवानांची भरती करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे! आपल्या राज्याची सुरक्षा राखण्याची आणि आपत्कालीन परिस्थितींमध्ये मदत करण्याची इच्छा असणाऱ्या युवकांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. ही भरती जवळजवळ 9700 रिक्त पदांसाठी होणार आहे. या पदांवर ऑनलाईन अर्ज भरवून आपण होमगार्ड जवान बनण्याची प्रक्रिया सुरु करू शकता.
या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाईन आहे. इच्छुक उमेदवारांनी संबंधित विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज भरावे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2024 (जिल्यानुसार वेगळी असू शकते) आहे.
होमगार्ड भरती 2024 माहिती :
- पदाचे नाव : होमगार्ड
- एकूण जागा : —
- नोकरी ठिकाण : संबंधित जिल्हा
- वेतनमान : 680 /- Per Day
- वयोमर्यादा : 20 ते 50 वर्ष
- निवड प्रक्रिया : शारीरिक चाचणी
- अर्ज फी : निःशुल्क
होमगार्ड पात्रता :
- शैक्षणिक पात्रता – कमीत कमी 10 वी उत्तीर्ण (SSC Pass)
- शारिरीक पात्रता –
- वय – 20 वर्षे पुर्ण ते 50 वर्षांच्या आत. (दि. ३४/०७/२०२४ रोजी )
- उंची – पुरुषांकरीता – 162 से. मी. महिलांकरीता – 150 से. मी.
- छाती – ( फक्त पुरुष उमेदवारांकरीता ) (न फुगविता किमान 76 से.मी. कमीत कमी 5 सेमी फुगविणे आवश्यक )
महत्वाचे : उमेदवार ज्या भागातील रहीवासी आहे तो भाग ज्या पोलीस ठाणेच्या अंतर्गत येतो त्यांना त्याच पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस ठाणे आणि पथकामध्ये त्याच जिल्हयात अर्ज दाखल करता येईल. इतर जिल्हयातील अर्ज बाद ठरतील.
आवश्यक कागदपत्रे –
- रहीवासी पुरावा – आधारकार्ड , मतदान ओळखपत्र (दोन्ही अनिवार्य)
- शैक्षणीक अहर्ता प्रमाणपत्र
- जन्मदिनांक पुराव्याकरीता SSC बोर्ड प्रमाणपत्र /शाळा सोडल्याचा दाखला.
- तांत्रिक अहर्ता धारण करीता असल्यास तत्सम प्रमाणपत्र.
- खाजगी नौकरी करीत असल्यास मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र.
- 3 महीन्याचे आतील पोलीस चारीत्र्य पडताळणी प्रमाणपत्र
इतर माहितीसाठी संबंधित जाहिरात बघावी….
होमगार्ड सदस्यत्व : महाराष्ट्रातील होमगार्ड संघटना ही शासन संचलित पुर्णत: मानसेवीतत्वावर आधारीत आहे. या संघटनेचे सदस्य होणे म्हणजे कोणत्याही प्रकारची नोकरी अथवा रोजगार नाही.
हे सदस्यत्व तीन वर्षांकरीता दिले जात असून आपण संघटनेसाठी दिलेल्या सेवेच्या गुणवत्तेवर पुढे ३-३ टप्प्याने वयाच्या 58 वर्षांपर्यंत पुन:नांदणीकृत करता येते.
जाहिरात डाउनलोड करा | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | येथे क्लीक करा (सातारा जिल्हा सुरु) इतर २५ तारखेपासून सुरु होणार (ज्या जिल्हाचे रहिवासी आहे त्यातच फॉर्म भरता येणार ) |
टेलिग्राम वर माहिती | व्हाट्सअप वर माहिती |
अर्ज कसा भरावा :
पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र राज्य होमगार्ड चे अधिकृत संकेतस्थळ (https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login१.php) आहे त्यावर अर्ज करू शकतात.
अर्ज करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:
1. अधिकृत वेबसाइटला भेट द्या:
- सर्वप्रथम, उमेदवारांनी महाराष्ट्र होमगार्ड विभागाची अधिकृत वेबसाइट [https://maharashtracdhg.gov.in]ा भेट द्यावी.
2. “ऑनलाईन अर्ज” बटणावर क्लिक करा:
- मुख्यपृष्ठावर, “होमगार्ड भरती 2024” साठी “ऑनलाईन अर्ज” बटणावर क्लिक करा.
3. आवश्यक माहिती द्या:
- उमेदवारांना नाव, लिंग, जन्मतारीख, संपर्क क्रमांक, ईमेल पत्ता आणि इतर आवश्यक माहिती प्रविष्ट करून नोंदणी करावी लागेल.
4. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा:
- उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे स्कॅन केलेल्या स्वरूपात अपलोड करावी लागतील, जसे की शैक्षणिक प्रमाणपत्रे, जात प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि इतर आवश्यक कागदपत्रे.
5. अर्ज सबमिट करा:
- सर्व माहिती भरल्यानंतर आणि शुल्क भरल्यानंतर, उमेदवारांनी अर्ज सबमिट करावा.
6. प्रिंट आउट घ्या:
- अर्ज यशस्वीरित्या सबमिट झाल्यावर, उमेदवारांनी भविष्यातील संदर्भासाठी त्याचा प्रिंट आउट घ्यावा.