◆ Present Continuous Tense चालू वर्तमानकाळ
● या काळाचा उपयोग तसा नावावरूनच स्पष्ट आहे. एखादी क्रिया चालू आहे असा अर्थ व्यक्त करण्यासाठी हा काळ वापरला जातो.
• ‘क्रिया चालू आहे’ चा अर्थ क्रिया वाक्य सांगताक्षणी सुरू आहे असा होतो (जसे, तो १३ वर्तमानपत्र वाचत आहे – म्हणजे आता वाचत आहे) किंवा ‘क्रिया वाक्य सांगताक्षणी सुरू नसली तरी वर्तमानकाळात मात्र सुरू आहे’ असाही अर्थ होतो (जसे, तो आजकाल इंग्रजी शिकत आहे). जवळचे भविष्य दर्शविण्यासाठी सुद्धा हा काळ वापरला जाऊ शकतो. जसे, त्याचे
नवीन पुस्तक लवकरच येत आहे.
या काळाची ओळख :- क्रियापदाच्या शेवटी ‘त’ आणि नंतर आहे, आहेत, आहेस’ असे शब्द (म्हणजे वाक्याच्या शेवटी ‘त आहे’ जसे, मी येत आहे/जात आहे/लिहित आहे).
● या काळाची रचना :- कर्ता + am / is / are + क्रियापदाला ing….
आता उदाहरणे पाहण्यापूर्वी am / is / are चा फरक पाहून घ्या : I सोबत am वापरतात.
I सोडून दुसऱ्या कोणत्याही एकवचनी शब्दासोबत is वापरतात.अनेकवचनी शब्दासोबत आणि you सोबत नेहमी are वापरतात.
उदाहरणे :१) मी जात आहे.
I am going.
(कर्ता+ am/is/are + क्रि ing…)
२) तो जात आहे.
He is going.
(कर्ता + am/is/are + क्रि ing…)
३) ते जात आहेत.
They are going.
(कर्ता + am/is/are + क्रि ing…)
● चालू वर्तमानकाळाचा उपयोग जेव्हा आपण भविष्यकाळ व्यक्त करण्यासाठी करतो तेव्हा वाक्यात भविष्यकाळ दर्शवणाऱ्या शब्दाचा उल्लेख असायला पाहिजे किंवा आधी उल्लेख झालेला असला पाहिजे (जेणेकरून क्रिया वर्तमानकाळाची की भविष्यकाळाची याबद्दल ऐकणाऱ्याला गोंधळ होणार नाही) जसे, I am going to Mumbai tomorrow.
◆ BE चा उपयोग
● BE : Be हे क्रियापद चालू वर्तमानकाळात एखाद्या वेळेस वापरले जाऊ शकते. तेव्हा be सोबत विशेषण असते आणि वाक्यातून कर्त्याची तात्पुरती वागण्याची पद्धत किंवा गुण दर्शवले जाते. ‘तात्पुरती’ म्हणजे त्या विशिष्ट वेळेवरची – नेहमीची नसलेली. जसे:१) l am being serious.
मी (सध्या) गंभीरपणे बोलत आहे.
२) He is being foolish.
तो (सध्या) मूर्खपणे वागत/बोलत आहे.
३) He is being funny.
तो गंमत करत आहे.
४) You are being very irresponsible.
तू खूप बेजबाबदारपणे वागत आहेस.
• अशा प्रकारे (चालू वर्तमानकाळात be सोबत) वापरली जाणारी आणखी काही विशेषणे :Optimistic – आशावादी, pessimistic- निराशावादी, selfish – स्वार्थी, economical – काटकसरी, extravagant – उधळ्या, stupid – मूर्ख, annoying – चीड
आणणारा, polite – सभ्य, formal – औपचारिक, mean – क्षुद्र, नीच.
◆ Past Continuous Tense – चालू भूतकाळ
● या काळाचा उपयोग लक्षात घेण्यासाठी पुढील एक वाक्य पुरेसे आहे: मी काल यावेळेस हे पुस्तक वाचत होतो.(= म्हणजे भूतकाळात पुस्तक वाचण्याची क्रिया चालू होती).
उपयोग :- भूतकाळातील एखाद्या वेळेवर क्रिया चालू होती असे दर्शवण्यासाठी चालू भूतकाळ वापरतात.
चालू भूतकाळाची ओळख :- क्रियापदाच्या शेवटी त आणि नंतर होता, होते, होती असे भूतकाळ दर्शवणारे शब्द (म्हणजे वाक्याच्या शेवटी – त होता. जसे, तो येत होता,
जात होता, इ.)
• रचना:कर्ता + was / were + क्रियापदाला ing….
● was/were चा फरक
• was/were चा फरक:एकवचनी शब्दासोबत was वापरतात.अनेकवचनी शब्द आणि you
सोबत were वापरतात.
वाक्ये :१) मी जात होतो.
I was going. २) आम्ही जात होतो.
We were going ३) मी लिहित होतो.
I was writing.
● क्रियापदाच्या शेवटी ‘त’ नसले तरी वाक्यात ‘क्रिया चालू होती’ असा अर्थ असल्यास वाक्य चालू भूतकाळाचेच होईल. जसे,
१) तो उभा होता.
He was standing.
२) मी रांगेत उभा होतो.
I was standing in a queue.
३) तो बसलेला होता.
He was sitting.
४) ती स्वयंपाकघरात बसलेली होती. She was sitting in the kitchen.
५) त्याने नवा ड्रेस घातलेला होता. He was wearing a new dress.
◆ Future Continuous Tense (चालू भविष्यकाळ)
● Future Continuous Tense (चालू भविष्यकाळ) : मी उद्या या वेळेस या पुस्तकाचा अभ्यास करत असेन या चालू भविष्यकाळाच्या
वाक्यावरून चालू भविष्यकाळाचा उपयोग असा लक्षात येतो :. • भविष्यातील एखाद्या वेळेवर क्रिया सुरू असेल असे दर्शवण्यासाठी हा काळ वापरला जातो.
क्रिया सुरू असण्याची शक्यता व्यक्त करण्यासाठी सुद्धा हा काळ वापरला जाऊbशकतो. जसे, तो तुझी वाटत पाहत असेल.
– चालू भविष्यकाळाची ओळख:- वाक्याच्या शेवटी’त असेल’ (म्हणजे क्रियापदाच्या
शेवटी -त आणि नंतर ‘असेल, असाल, असेन, असतील’ असे शब्द).
–रचना : कर्ता + will be + क्रियापदाला ing +
:उदाहरणे :१) तो येत असेल.
He will be coming.
● एखादी क्रिया भविष्यात होईल असे सांगण्यासाठी सुद्धा चालू भविष्यकाळ वापरला जाऊ शकतो. जसे,
I will be meeting him tomorrow.
मी त्याला उद्या भेटेन.
पण या वाक्यातून फक्त ‘क्रिया होईल’ असा साधा अर्थ व्यक्त होतो. म्हणजे I will meet him tomorrow या साध्या भविष्यकाळाच्या वाक्यासारखा कर्त्याचा निश्चय किंवा निर्णय वरील वाक्यातून व्यक्त होत नाही. फक्त नेहमीप्रमाणे क्रिया होईल आणि त्यात विशेष काही नाही असं चालू भविष्यकाळाच्या वाक्यातून सूचित होतं. परत पहा :1) Rahul will not sit here.
2) Rahul will not be sitting here.
यापैकी पहिल्या वाक्यातून असे सूचित होते की इथे न बसण्याचा कर्त्याचा निर्णय आहे.तसं कर्त्याने ठरवलेलं आहे. दुसऱ्या वाक्यात मात्र कर्त्याने तसं ठरवलंय असा भाव नाही. दुसरं वाक्य फक्त एक माहिती सांगणारं विधान आहे. त्यातून असा अर्थ व्यक्त होतो की राहूल तिथे बसणार नाही कारण तो तिथे बसत नाही – ती त्याची जागा नाही इतकंच.
◆ आणखी काही उदाहरणे :
१) He will not be attending the meeting.
तो मीटिंगला हजर असणार नाही.
२) we will be leaving tonight.
आम्ही आज रात्री निघू.
३) He won’t be coming to the class today.
तो आज क्लासला येणार नाही.
४I
) I will be going to Mumbai tomorrow.
मी उद्या मुंबईला जाईन.
I will be wearing this dress to the party.
मी पार्टीत हा ड्रेस घालणार आहे.
६) Will you be taking part in this competition?
तू या स्पर्धेत भाग घेणार आहेस का?
७) Which dress will you be wearing to the party?
तू पार्टीत कोणता ड्रेस घालणार आहेस?
वरील दोन प्रश्न दुसऱ्या पद्धतीनेही विचारले जाऊ शकतात – चालू वर्तमानकाळ
वापरून किंवा be going to वापरून. जसे,
Which dress are you wearing to the party? feral
Which dress are you going to wear to the party?
पण तुलनेने चालू भविष्यकाळाचे वाक्य अधिक नम्र समजले जाते.