मुख्यमंत्री योजनदुत (MahaYojanadoot) भरती : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील तरुणांसाठी “मुख्यमंत्री योजना दूत भरती” 2024 जाहीर केली आहे. या योजनेचा अंतर्गत 6 महिने आपल्याला सरकारच्या योजना नागरिकांपर्यंत पोहचवायचे आहेत, यासाठी तरुणांना दर महिन्याला ₹10,000 पर्यंत आर्थिक मदत मिळणार आहे.
मुख्यमंत्री योजना दूत भरती साठी अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवारांना mahayojanadoot.org या वेब साईट वर अर्ज करायचा आहे.
मुख्यमंत्री योजनादूत उद्देश
महाराष्ट्र शासन आपल्या नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी निरंतर प्रयत्नशील आहे. याच उद्देशाने शासनाने विविध कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. या योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी “शासन आपल्या दारी” हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला. या उपक्रमाद्वारे नागरिकांना एकाच छताखाली विविध शासकीय योजनांची माहिती मिळून त्यांचा लाभ घेणे सुलभ झाले आहे.
“योजनादूत” हा याच उपक्रमाचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. यातून उत्साही तरुणांना समाजसेवेची संधी मिळत असून ते आपल्या गावात, शहरात जाऊन लोकांना योजनांची माहिती देत आहेत. या तरुणांच्या माध्यमातून शासन जनतेच्या जवळ जात आहे आणि सामाजिक बदलाची नवी दिशा निर्माण करत आहे.
मुख्यमंत्री योजनादूत उद्देशः
- योजनादूत म्हणून 50,000 तरुणांना इंटर्नशिपची संधी
- सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी तरुणांचा सहभाग
- कल्याणकारी योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचणार
योजनेचे लाभ:
- प्रत्यक्ष कामाचा अनुभव.
- सामाजिक बदलाचा भाग बनण्याची संधी.
- विद्यावेतनातून युवकांना आर्थिक साहाय्य.
- शिकण्याबरोबरच कौशल्य विकास.
- सरकारी कामकाजाचा अनुभव.
मुख्यमंत्री योजनादूत पात्रता :
- वयोमर्यादा १८ ते ३५ वयोगटातील उमेदवार.
- शैक्षणिक अर्हता- कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर. (Any Graduate)
- उमेदवाराला संगणक ज्ञान आवश्यक.
- उमेदवाराकडे अदययावत मोबाईल असणे आवश्यक.
- उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक.
- उमेदवारांचे आधार कार्ड असावे व त्याच्या नावाचे बँक खाते आधार संलग्न असावे.
लागणारे कागदपत्रे :-
- शैक्षणिक कागदपत्रे – पदवीपर्यंत
- अर्जदाराचे रहिवाशी प्रमाणपत्र. (Domicile/Nationality Certificate)
- आधार कार्ड / Aadhar Card
- बँक खाते आधार कार्डशी सलग्नित असावे.
- याचबरोबर मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी, पासपोर्ट आकाराचे फोटो
अर्ज करण्याची प्रक्रिया कशी आहे?
- योजनादूत पोर्टलवर ‘उमेदवार नोंदणी’ वर क्लिक करा.
- पात्रतेशी संबंधित आवश्यक कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.
- नोंदणीकृत आधार क्रमांक एंटर करा आणि OTP पाठवलेल्या फोनची पडताळणी करा.
- सत्यापनानंतर तुमचा आधारभूत तपशील प्रविष्ट करा आणि तुमच्या ईमेल आणि मोबाईल बरोबर असल्याची खात्री करा.
- तुमचा पासवर्ड बनवा आणि पुन्हा लॉगिन करिता नोंद करुन ठेवा. तुम्ही आपोआप लॉग इन व्हाल. प्रत्येक वेळी लॉग इन करण्यासाठी तुम्हाला तोच ईमेल आयडी वापरावा लागेल.
- तुमची शैक्षणिक पात्रता प्रविष्ट करा आणि संबंधित कागदपत्रे संलग्न करा.
- रिक्त जागा तुम्हाला दाखवल्या जातील. तुम्ही ते फिल्टर करू शकता आणि त्यासाठी अर्ज करू शकता.
महत्वाचे तारखा:
- अर्ज स्वीकारण्याची सुरुवात: ० ७ सप्टेंबर २ ० २ ४
- अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख: 13 सप्टेंबर २ ० २ ४
ऑनलाईन अर्ज https://mahayojanadoot.org/ या वेबसाईट वर करण्यात येणार आहे,
ऑनलाईन अर्ज करा | येथे क्लीक करा |
व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा | टेलिग्राम ग्रुप जॉईन करा |