मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना 2024 – ऑनलाईन पोर्टल सुरू @ladakibahin.maharashtra.gov.in

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महाराष्ट्रातील 21 ते 60 वर्षे वयोगटातील गरजू महिलांसाठी आर्थिक सहाय्य आणि सशक्तीकरण प्रदान करण्यासाठी राबवण्यात आलेली महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत, पात्र महिलांना दर महिन्याला ₹1500 आर्थिक मदत दिली जाणार आहे.

मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना 2024 अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पोर्टल सुरू @ladakibahin.maharashtra.gov.in झाले आहेत. ज्यांनी आतापर्यंत ऑनलाईन अर्ज केला नसेल ते ऑनलाईन वेबसाइट वर अर्ज करू शकतात…

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील  त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची “मुख्यमंत्री- Majhi Ladki Bahin Yojna” योजना सुरू करण्यात येत आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

माझी बहीण लाडकी योजनेचा उद्देश :- Objective

  • राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालनादेणे.
  • त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे.
  • राज्यातील महिला स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे.
  • राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे.
  • महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा.

माझी बहीण लाडकी योजनेचे स्वरुप :- Benifits

पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंककेलेल्या थेट लाभ हस्तांतरण (Direct Benifits Transfer) सक्षम बँक खात्यात दरमहा रु.1500/-इतकी रक्‍कम दिली जाईल. 

या योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून करण्यात येणार आहे.

माझी बहीण लाडकी पात्रता:-

  • लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवइयक आहे.
  • राज्यातील विवाहित, अविवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला
  • किमान वयाची 21 वर्षे पूर्ण व कमाल वयाची 60 वर्ष 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत.
  • सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यकआहे.
  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्‍कम रु.2.50 (अडीच) लाखापेक्षा जास्त नसावे.

नवीन बदल

या योजनेच्या पात्रतेच्या निकषांमध्ये आधी रहिवाशी प्रमाणपत्र आवश्यक करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलेकडे रहिवाशी प्रमाणपत्र उपलब्ध नसेल, तर इतर पर्याय देण्यात आले आहेत. 

रहिवाशी प्रमाणपत्र नसेल, तर

  • १५ वर्षापूर्वीचे राशन कार्ड / मतदान कार्ड / शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र / जन्म दाखला यापैकी एक
  • सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे.
  • त्याचप्रमाणे आता या योजनेत लाभार्थी महिलांची वयोमर्यादा 21 ते 60 वर्ष होती. ती 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात आली आहे.
  • परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्राचा रहिवाशी असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल, तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. 
  • २.५० लाखांच्या उत्पन्नाची अट आहे. मात्र, उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल, तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात आली आहे. 
  • योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

माझी बहीण लाडकी योजनेसाठी लागणारे कागदपत्रे :-

  • योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज. / Online Application Form
  • लाभार्थ्याचे आधार कार्ड. / Aadhar Card
  • महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र/महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला. / Domicile or Birth Certificate/TC/Voter ID/ Ration Card
  • सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला(वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाखापर्यंत असणे अनिवायी. / Income Certificate
  • बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत. / Bank Passbook
  • पासपोर्ट आकाराचा फोटो. / Passport size photo
  • रेशनकार्ड./ Ration Card
  • सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र. / Assurance Deed

अर्ज करण्याची प्रक्रिया कशी आहे?

योजनेचे अर्ज पोर्टल/Mobile App/सेतू सुविधा केंद्राव्दारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया करावी लागेल :

  • पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल.
  • ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल, त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात/बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी/ग्रामीण/आदिवासी)/ग्रामपंचायत/वार्ड/सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील.
  • वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात/बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी/ग्रामीण/आदिवासी)/सेतू सुविधा केंद्र मध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोच पावती दिली जाईल.
  • अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल.
  • अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि E-KYC करता येईल.
  • यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे.
    • कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र (रेशनकार्ड)
    • स्वतःचे आधार कार्ड

महत्वाचे तारखा:

  • अर्ज स्वीकारण्याची सुरुवात: 1 जुलै 2024
  • अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख: 31 ऑगस्ट 2024

ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत (Narishakti Doot) या वेबसाईट/ Mobile App किंवा ladakibahin.maharashtra.gov.in वर करण्यात येणार आहे, त्याचप्रमाणे ऑफलाईन/ऑनलाईन अर्ज आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविका /पर्यवेक्षिका/ वॉर्ड अधिकारी/ सेतू सुविधाकेंद्र/ग्रामपंचायत/ग्रामसेवक यांच्याकडे करता येतील.

लाडकी बहिण ऑनलाईन पोर्टलladakibahin.maharashtra.gov.in
नारी शक्ती दूत (Narishakti Doot) App Link / अर्ज करा डाउनलोड करा
माझी बहीण लाडकी योजना GR (12 July)डाऊनलोड करा
अधिकृत Majhi Bahin Yojna GR डाउनलोड करा येथे क्लीक करा (3 July)
अधिक माहिती येथे क्लीक करा

12 thoughts on “मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना 2024 – ऑनलाईन पोर्टल सुरू @ladakibahin.maharashtra.gov.in”

  1. Mazi bahin ladki yojne mdhe Jr aai la second peyment midt asel tr mulila ya yojne cha labh midu shktoy kay

    Reply

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा