Annapurna Yojana GR: राज्य सरकारने महिलांना सक्षम करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने अंतर्गत आता महिलांना वर्षातून 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत. राज्य सरकारच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आता उज्ज्वला आणि माझी लाडकी बहीण योजनांच्या लाभार्थ्यांना वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहेत. या निर्णयामुळे लाखो महिलांना स्वयंपाकाचे इंधन स्वस्तपणे उपलब्ध होणार आहे.
CM Annapurna Yojana GR शासन निर्णय :
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला (PM Ujjwala) योजनेच्या राज्यातील सुमारे 52.16 लक्ष लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण (Refill) मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना पात्रता :
- सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे.
- सद्यःस्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत पात्र असलेले सुमारे 52.16 लक्ष लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असतील.
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटूंब सदर योजनेसपात्र असेल.
- एका कुटूंबात (रेशन कार्डनुसार) केवळ एक लाभार्थी सदर योजनेस पात्र असेल.
- सदर लाभ केवळ 14.2 कि. ग्रॅ. वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांना अनुज्ञेय असेल.
हे पण बघा : लाडका भाऊ योजनेसाठी अर्ज सुरु, असा करा अर्ज ….
काय असणार कार्यपद्धती :
- पीएम उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्यांमार्फत करण्यात येते. राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेंतर्गत रद्यावयाच्या 3 मोफत सिलेंडरचे वितरणही तेल कंपन्यांमार्फत करण्यात येईल.
- सद्यःस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत वितरीत होणाऱ्या गॅस सिलेंडरची बाजारभावाची संपूर्ण रक्कम (सरासरी रु.830/-) ग्राहकांकडून घेतली जाते. तद्नंतर केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत देण्यात येणारी (रु.300/-) सबसिडी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.
- त्याच धर्तीवर तेल कंपन्यांनी राज्य शासनाकडून द्यावयाची अंदाजे रू.530/- प्रति सिलेंडर, इतकी रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतील.
- तसेच सदर योजनेत ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी रदेण्यात येणार नाही.
दि.1 जुलै 2024 रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांनाच योजनेचा लाभ देण्यात येईल. दि.1 जुलै 2024 नंतर विभक्त केलेल्या शिधापत्रिका या योजनेस पात्र ठरणार नाहीत.
सदर योजनेच्या साठी जिल्हास्तरीय समिती तयार करण्यात येईल, ते PM उज्वला पात्र व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना धारकांना DBT द्वारे पात्र पैसे जमा करण्यात येतील.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना GR (30 July 2024) | डाउनलोड करा |
लाडकी बहीण योजना अपडेट्स | येथे बघा |