सिडको Recruitment 2024: 101 पदांसाठी भरती जाहीर

Cidco Recruitment 2024 : शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (सिडको) ने सहाय्यक अभियंता (स्थापत्य) संवर्गातील एकूण 101 रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार दिनांक 19 जानेवारी 2024 ते 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

CIDCO Bharti 2024 : शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ भरती

पदाचे नाव : सहाय्यक अभियंता – Assistant Engineer – Civil

रिक्त जागा : 101

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

वेतनमान : S-15 :41800-132300

नोकरी ठिकाण : राज्यात कोठेही

शैक्षणिक पात्रता:

  • पदवीधर अभियांत्रिकी (सिव्हिल) / BE/B.Tech in Civil Engineering
  • सॅप इआरपी (टीइआरपी-10) प्रमाणपत्र / SAP ERP TERP – 10

उमेदवाराकडे सॅप प्रमाणपत्र नसल्यास रुजू दिनांकापासून १ वर्षाच्या आत सॅप प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे अन्यथा त्यांच्या सेवा समाप्त करण्यात येतील. तथापि, काही उमेदवारांच्या बाबतीत (व्यवस्थापनाने मान्यता दिल्यास) सॅप प्रमाणपत्र सादर करण्याचा कालावधी परिविक्षा कालावधीच्या अंतिम दिनांकापासून 06 महिन्यापर्यंत वाढवून देण्याची मुभा आहे, सदर वाढीव कालावधीमध्ये उमेदवारांनी सॅप प्रमाणपत्र सादर न केल्यास त्यांच्या सेवा समाप्त करण्यात येतील.

वयाची अट:

  • 18 जानेवारी 2024 रोजी 38 वर्षांपेक्षा जास्त नसावे. [इतर नियमांनुसार सूट]

अर्ज शुल्क:

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ₹ 1180 /-
  • SC/ST/PWD/OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी ₹ 1062 /-

अर्ज करण्याची पद्धत:

  • उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागतील.
  • अर्जाची लिंक सिडकोच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2024 आहे.

निवड प्रक्रिया:

  • उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखत या आधारे केली जाईल.

अधिक माहितीसाठी:

  • सिडकोच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • सिडकोच्या संपर्क कार्यालयाशी संपर्क साधा.

सिडको भरती 2024 ही महाराष्ट्रातील सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक चांगली संधी आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी लवकरच अर्ज करा.

जाहिरात डाउनलोड करा / Cidco Notificationयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा / Cidco Appln Linkयेथे क्लिक करा

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा