Chhatrapati SambhajiNagar (Aurangabad) Mahanagarpalika Bharti 2023 : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिके मार्फत गट क पदाच्या एकूण ११४ पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. छत्रपती संभाजीनगमहानगरपालिकेने पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत.
Aurangabad Mahanagarpalika Recruitment 2023 – छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती
पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिक), कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल), लेखा परीक्षक (गट क), लेखापाल, विद्युत पर्यवेक्षक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक/अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक (गट-क), स्वच्छता निरीक्षक, पशुधन पर्यवेक्षक, प्रमुख अग्निशामक, उद्यान सहाय्यक, कनिष्ठ लेखा परीक्षक, अग्निशामक, लेखा लिपिक
नोकरी ठिकाण : छत्रपती संभाजीनगर
एकूण रिक्त जागा : ११४
शैक्षणिक पात्रता संभाजीनगर महानगरपालिका :
पदाचे नाव | रिक्त जागा | शैक्षणिक पात्रता |
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | 26 | (अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य (BE/B.Tech – Civil Engineering) अभियांत्रिकी शाखेची पदवी. ब) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. |
कनिष्ठ अभियंता (यांत्रिक) | 07 | अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी (BE/B.Tech – Mechanical Engineering ) अभियांत्रिकी शाखेची पदवी. ब) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. |
कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) | 10 | अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत (BE/B.Tech – Electrical Engineering) अभियांत्रिकी शाखेची पदवी. ब) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. |
लेखा परीक्षक (गट क) | 1 | अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी. (B.Com) ब) लेखा / लेखा परीक्षण विषयक कामाचा किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक. क) निवड झालेल्या उमेदवारास विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक. ड) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. |
लेखापाल | 2 | अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी. (B.Com) ब) लेखा/लेखा परीक्षक विषयक कामाचा किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक. क) निवड झालेल्या उमेदवारास विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक. ड) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. |
विद्युत पर्यवेक्षक | 3 | (अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत (Electrical) अभियांत्रिकी शाखेची पदविका (Diploma in Engineering) किंवा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (S.S.C.) उत्तीर्ण, शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे तारतंत्री अभ्यासक्रम पूर्ण व तदनंतर एन. सी. टी. व्ही. टी. चे प्रमाणपत्र आवश्यक. ब) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. |
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक/अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक (गट-क) | 13 | अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य (Diploma Civil) अभियांत्रिकी शाखेची पदविका किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाचा पाठ्यक्रम उत्तीर्ण. ब) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. |
स्वच्छता निरीक्षक | 07 | अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. Any Graduate ब) स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण. क) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. |
पशुधन पर्यवेक्षक | 02 | अ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (H.S.C.) उत्तीर्ण. ब) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुसंवर्धनाची पदविका उत्तीर्ण. क) शासकीय/निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था/खाजगी सणालयातील संबंधित विषयातील कामाचा किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक. ड) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. |
प्रमुख अग्निशामक | 09 | अ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा (S.S.C.) उत्तीर्ण. ब) राष्ट्रीय / राज्य अग्रिशमन प्रशिक्षण केंद्र / महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी यांचा 6 महिने कालावधीचा अग्रिशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम / प्रगत पाठ्यक्रम (Advanced Course) पूर्ण करणे आवश्यक. क) शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अग्रिशामक (Fireman) या पदावर विमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक. |
उद्यान सहाय्यक | 02 | अ) मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची बी.एस्सी. (हॉर्टिकल्चर्स) अॅग्रीकल्चर / बॉटनी/फॉरेस्ट्री पदवी / मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील पदवी. ब) शासकीय/निमशासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थेकडील कृषी उद्यान क्षेत्रातील उद्यान निरीक्षक अथवा समकक्ष पदावरील किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक. क) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक |
कनिष्ठ लेखा परीक्षक | 02 | अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी. ब) मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखनाचे किमान 40 शब्द प्रति मिनिट वेगमयदिचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे. क) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. |
अग्निशामक | 20 | अ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा (S.S.C.) उत्तीर्ण. ब) अग्निशामक कोर्से |
लेखा लिपिक | 10 | अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी. ब) मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखनाचे किमान 40 शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे. क) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. |
वयोमर्यादा: १८ ते ४० व इतर नियमानुसार सुट
वेतन श्रेणी :शासकीय नियमानुसार
निवड प्रक्रिया: ऑनलाईन परीक्षा
अर्ज स्विकारण्याची कालावधी : २३ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर २०२३
परीक्षा IBPS घेणार……
Aurangabad MNC Recruitment जाहिरात डाऊनलोड करा: डाउनलोड करा
ऑनलाईन अर्ज लिंक: https://ibpsonline.ibps.in/csmcvpaug23/
अधिक माहिती https://aurangabadmahapalika.org/ या वेबसाईटला भेट द्या .