BMC Recruitment 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिकेतील महानगरपालिका, लेखा परीक्षक, महानगरपालिका चिटणीस व महानगरपालिका आयुक्तांच्या अखत्यारितील सर्व खात्यांतील इच्छुक व प्रस्तुत परिपत्रकातील ‘कार्यकारी सहायक’ (पूर्वीचे पदनाम ‘लिपिक’) या पदाची पात्र उमेदवारांकडून असलेल्या निम्नसंवर्गातील पात्र कर्मचा-यांकडून ‘कार्यकारी सहायक’ या पदाच्या नियुक्तीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती माहिती
पदाचे नाव : कार्यकारी सहायक / Executive Assistant
नोकरी ठिकाण : मुंबई
शैक्षणिक पात्रता :
- उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा.
- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाचा वाणिज्य, विज्ञान, कला, विधि किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा.
- उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र वा तत्सम किंवा उच्च परीक्षा 100 गुणांचे मराठी व 100 गुणांचे इंग्रजी हे विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा.
- उमेदवाराकडे शासनाची इंग्रजी व मराठी टंकलेखनाची प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे.
अनुभव :
- उमेदवाराचा महानगरपालिकेच्या कोणत्याही खात्यात निम्नसंवर्गातील पदावर मासिक वेतनावरील सेवाकाल 4 वर्षापेक्षा कमी नसावा.
- गट ‘ड’ मधून ‘कार्यकारी सहाय्यक’ संवर्गात निवड करण्यासाठी वर नमूद केलेल्या अर्हतेसह महानगरपालिकेतर्फे घेण्यात येणारी विभागीय परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागेल, व लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड करण्यात येईल.
वेतनश्रेणी :
वेतनश्रेणी (सुधारित) स्तर M13 रु. 21,700 69,100
वेतनश्रेणी (असुधारित) – 5200 – 66666 + 2000
ऑनलाईन अर्ज सादर करण्याची कालावधी : १६ जून २०२३
BMC Recruitment जाहिरात व अर्ज लिंक : डाउनलोड करा
अधिक माहिती www.portal.mcgm.gov.in या वेबसाईटला भेट द्या .