भारतातील नद्यांची संपूर्ण माहिती : Bhartatil Nadyanchi Sampurn Mahiti

भारतातील नद्यांची संपूर्ण माहिती : Bhartatil Nadyanchi Sampurn Mahiti

भारतातील नद्यांची संपूर्ण माहिती : भारतात वाहणाऱ्या नद्यांचे दोन प्रकारात विभाजन झालेले आहे.एक म्हणजे हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या आणि दुसरे म्हणजे भारतीय पठारावरील (द्वीपकल्पीय) नद्या,आज आपण सविस्तर भारतातील नद्यांची संपूर्ण माहिती (Bhartatil Nadyanchi Sampurn Mahiti) बगणार आहोत ती खालीलप्रमाणे आहे .

भारतातील नद्यांची संपूर्ण माहिती : Bhartatil Nadyanchi Sampurn Mahiti

भारतीय नदीप्रणाली प्रामुख्याने दोन गटांत विभागली जाते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

१) हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या

२) भारतीय पठारावरील (द्वीपकल्पीय) नद्या

हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या : सिंधु, सतलज, गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा इत्यादी.

हिमालयीन नद्या बारमाही व युवावस्थेतील नद्या आहेत. यांच्या अपक्षरण कार्यामुळे ‘V’ आकाराची दरी, खोल घळई, धबधबे, द्रूतप्रवाह ही भूरूपे तयार होतात.

हिमालयात उगम पावणाऱ्या नद्यांचे

अ) अरबी समुद्राला मिळणाऱ्या आणि

ब) बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या असे दोन प्रकार पडतात.

भूगर्भ संशोधकांच्या मते हिमालयीन नद्या हिमालयाहूनही जुन्या आहेत.

अ) अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या

  • सिंधू नदी (Indus River): सिंधू नदी चा उगम मानस सरोवराच्या उत्तरेस. (तिबेटमध्ये-कैलास पर्वतावर) होतो .सिंधू नदी भारतात जम्मू-काश्मीर राज्यात प्रवेश करते ही नदी चीन, भारत व पाकिस्तान या तीन देशांतून वाहते काश्मीरमधून वाहत जाऊन गिलगिट येथे पाकिस्तानात प्रवेश करते. (सिंधूची लांबी पाकिस्तानात सर्वाधिक आहे.) एकूण लांबी : २८८० कि.मी.

सिंधूच्या उपनद्या : झेलम, सतलज, रावी, चिनाब, बियास, श्योंक, झास्कर, गिलगिट, सतलज १९ सप्टेंबर १९६० च्या सिंधू पाणी वाटप करारानुसार सिंधू खोऱ्यातील फक्त २०% पाणी भारत वापरू शकतो. हे पाणी पंजाब, हरियाणा ही राज्ये तसेच दक्षिण व पश्चिम राजस्थानमध्ये सिंचनासाठी वापरले जाते. सियाचीन (लांबी ७० किमी), बल्तोरो, हिस्पार या हिमालयाच्या काराकोरम भागातील प्रमुख हिमनद्यांमुळे सिंधू नदीला वर्षभर पाणी असते.

सतलज नदी : सतलज नदी चा उगम मानस सरोवराजवळील राकस सरोवरात होतो.सतलज नदीचे मूळ नाव शतद्रू, शताद्री सतलज आहे .सतलज नदी शिप्किला खिंडीतून भारतात हिमाचल प्रदेशात प्रवेश करते. (लांबी : १४५० किमी) हिमाचल प्रदेश व पंजाबमधून वाहत पाकिस्तानात सिंधूला मिळते. (सतलजची भारतातील लांबी : १०५० किमी) पंजाब म्हणजे झेलम, सतलज, रावी, चिनाब व बियास या पाच नद्यांचा प्रदेश.

ब) बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या नद्या

  • गंगा नदी : भ गंगा ही भारतातील पाच राज्यांतून व बांगला देशातून वाहणारी आंतरराष्ट्रीय नदी आहे. गंगा नदीचा उगम कुमाऊँ हिमालयातील गंगोत्री येथे हिमनदीपासून होतो .गंगा नदी हि भारतातील सर्वाधिक लांबीची नदी आहे.अलकनंदा (उगम : अलकापुरी, उत्तराखंड) व भागिरथी (उगम : गंगोत्री) या दोन नद्या ‘देवप्रयाग’ येथे एकत्र येऊन त्यांच्या संयुक्त प्रवाहास ‘गंगा’ असे नामाभिधान आहे.उत्तराखंड व उत्तर प्रदेश या दोन राज्यांतच गंगेची लांबी सुमारे १२०० कि.मी. आहे.उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल या पाच राज्यांतून गंगा नदी वाहते. राजमहल टेकड्यांना वळसा घालून गंगा दक्षिणेकडे वळते तेव्हा फराक्का धरणाजवळ हुगळी ही गंगेची पहिली व सर्वात मोठी वितरिका तयार होते व ती प्रामुख्याने पश्चिम बंगालमध्ये वाहते (हुगळीची लांबी : २६० किमी) भागीरथी व जालंगी नद्यांच्या प्रवाहातून हुगळी हा प्रवाह तयार होतो.

गंगेच्या प्रमुख उपनद्या :रामगंगा, गोमती, घागरा, गंडक, कोसी, महानदी,यमुना, शोण (गंगेच्या सुमारे ११५ उपनद्या आहेत.)

डिसेंबर २००८ मध्ये भारत सरकारने गंगा नदीस ‘राष्ट्रीय नदी’ म्हणून घोषित केले.

गंगा खोऱ्याचा विस्तार देशातील १० राज्यांत झालेला आहे. सतत पात्र बदलणाऱ्या गंगेच्या उपनद्या : घागरा, गंडक, कोसी, शोण (कोसी नदीस बिहारचे दुःखाश्रू’ म्हणतात)

  • यमुना नदी : (उगम : यम्नोत्री; हिमालय, लांबी : १३७६ कि.मी.) यमुना नदी ही गंगेची सर्वांत मोठी उपनदी अलाहाबाद येथे गंगेला मिळते. सरस्वती ही गुप्त नदी गंगेला येथेच मिळते. उपनद्या : चंबळ, सिंद, बेटवा, धसान, केन या नद्या माळवा पठारावर उगम पावतात व पुढे यमुनेला मिळतात.. चंबळ नदी ही राजस्थान व मध्य प्रदेशातून वाहणारी सर्वांत मोठी नदी आहे.
  • ब्रह्मपुत्रा : उगम : मानस सरोवर (तिबेट) . लांबी : २९०० कि.मी., भारतातील लांबी : ८८५ कि.मी. ‘त्सांगपो’ या नावाने तिबेटमधून वाहणाऱ्या नदीस भारतात अरुणाचल प्रदेशात दिहांग म्हणतात.दिहांग नदीस दिबांग व लोहित या नद्या मिळतात. त्यांच्या एकत्रित प्रवाहास ‘ब्रह्मपुत्रा’ म्हणून ओळखले जाते.(त्सांगपो म्हणजे शुद्धीकारक : Purifier): ब्रह्मपुत्रा नदी चीन, भारत व बांग्ला देश या तीन देशांतून वाहते.ब्रह्मपुत्रा ही गंगेची उपनदी मानली जाते. ब्रह्मपुत्रा भारतात अरुणाचल प्रदेश, आसाम या ईशान्येकडील राज्यांमधून व बांगला देशातून वाहणारी आंतरराष्ट्रीय नदी आहे. ब्रह्मपुत्रा बांगलादेशात बंगालच्या उपसागरास मिळते. बांगलादेशात ब्रह्मपुत्रा ही ‘जमुना’ नावे प्रसिद्ध.ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रात गाळाच्या निक्षेपणामुळे निर्माण झालेले ‘माजुली’ हे जगातील सर्वात मोठे नदीय बेट आहे. ब्राझीलमधील अॅमेझॉन नदीतील ‘माराजो’ हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नदीय बेट आहे.

भारतीय पठारावरील (द्वीपकल्पीय) नद्या

हिमालयीन नद्यांच्या तुलनेत या नद्या कमी लांबीच्या आहेत. वाहण्याच्या दिशेनुसार या नद्यांचे ४ प्रकार पडतात.

अ) दक्षिण वाहिनी नद्या : लुनी, साबरमती व मही.

लुनी व साबरमती : या नद्या वायव्येकडील अरवली पर्वतात उगम पावतात.अरवली पर्वतात पुष्कर दरीत उगम पावणारी ‘लुनी’ ही राजस्थानच्या वाळवंटातील एकमेव नदी आहे. लुनी नदी ‘लवणावरी’ किंवा ‘मिठाची नदी’ म्हणून ओळखली जाते.घग्गर नदीच्या व वाऱ्याच्या अपक्षरणामुळे राजस्थानचा मैदानी प्रदेश तयार झाला आहे. घग्गर नदी येथेच लुप्त झाली आहे.

मही नदी : (उगम : विंध्य पर्वत) मध्य प्रदेश, राजस्थान व गुजरातमधून वाहते. या सर्व नद्या दक्षिणेकडे वाहत जाऊन अरबी समुद्रास मिळतात.

ब) उत्तर वाहिनी नद्या : उत्तर भारतीय पठारावरून वाहणाऱ्या चंबळ, शोण, बेटवा, केन या उत्तरवाहिनी नद्या असून त्या बंगालच्या सागरास मिळतात.

क) पश्चिम वाहिनी नद्या : (नर्मदा, तापी, वैतरणा, उल्हास, वशिष्ठी, तेरेखोल, मांडवी, शरावती, पेरियार)

नर्मदा : लांबी : १३१० कि.मी. नर्मदा खोऱ्याचे देशातील क्षेत्रफळ : ९८,७९५ चौकिमी. आहे नर्मदा खोऱ्याचा देशात पाचवा क्रमांक लागतो. (द्वीपकल्पीय पठारात – चौथा क्रमांक) उगम : मैकल टेकड्यांतील अमरकंटक (मध्यप्रदेश) नर्मदा ही सर्वात जास्त लांबीची पश्चिमवाहिनी नदी आहे .नर्मदा नदी मध्य प्रदेश, महाराष्ट्र व गुजरात या तीन राज्यांतून वाहते. नर्मदा पश्चिमेकडे वाहत जाऊन भरूच (भडोच) येथे अरबी समुद्रास मिळते. जबलपूरजवळ भेडाघाट येथे नर्मदेची ‘खोल घळई व धुवांधार धबधबा प्रसिद्ध आहे.

प्रमुख उपनद्या : शक्कर, दुधी, तवा, बाहनेरा, बंजार, कोलार, हिरण, ओरसांग, शार, कुंडी, मंचक

३ मे २०१७ रोजी मध्य प्रदेश विधानसभेने नर्मदा नदीस मानवी दर्जा देण्यासंबंधी विधेयक संमत केले होते!

शरावती : पश्चिमवाहिनी नदी. उगम : तीर्थहळ्ळी (जि. शिमोगा, कर्नाटक). लांबी : १२८ किमी. संपूर्ण कर्नाटकात वाहते व अरबी समुद्रास मिळते. ‘जोग’चा धबधबा (गिरसप्पा धबधबा) शरावती नदीवर आहे.

तापी : लांबी : ७३० कि.मी. तापी खोऱ्याचे देशातील क्षेत्रफळ : ६५,१४५ चौकिमी.आहे.उगम : मध्य प्रदेशात बैतूल जिल्ह्यात मुलताई येथे. मध्यप्रदेश, महाराष्ट्र व गुजरात या राज्यातून वाहते. तापी नदी पश्चिमेकडे वाहत जाऊन सुरतजवळ अरबी समुद्रास मिळते.
उपनद्या : उत्तर पूर्णा, गिरणा, पांझरा, वाघूर, अंभोरा, बोरी, खुरसी, गोगाई, बोकड, अणेर, अमरावती, अरुणावती, बेतूल, गंजाल.

इ) पूर्व वाहिनी नद्या : दक्षिण भारतीय पठारावरील गोदावरी, कृष्णा, महानदी, पेन्नेरू, कावेरी. पूर्व वाहिनी नद्या त्यांच्या एखाद्या मुख्य नदीस व मुख्य नद्या बंगालच्या उपसागरास मिळतात.

गोदावरी खोऱ्याचा संपूर्ण भारतात गंगाखोऱ्याखालोखाल दुसरा क्रमांक.गोदावरी खोऱ्याने संपूर्ण भारताच्या क्षेत्रफळाच्या सुमारे ९.५१ टक्के तर द्वीपकल्पीय पठारी प्रदेशाच्या क्षेत्राच्या सुमारे ४९% क्षेत्र व्यापलेले आहे. गोदावरी नदीचा उगम : त्र्यंबकेश्वर ‘ब्रह्मगिरी’ (जि. नाशिक) गोदावरी खोऱ्याचे देशातील क्षेत्रफळ : ३,१२,८१२ चौकिमी. यापैकी महाराष्ट्रातील क्षेत्र : १,५२,१९९ चौकिमी. द्वीपकल्पीय पठारी प्रदेशातील सर्वाधिक लांबीची नदी (प्रथम क्रमांक) गोदावरीची भारतातील एकूण लांबी : १४६५ कि.मी. (विश्वकोशानुसार १४९८ किमी).गोदावरीची महाराष्ट्रातील लांबी : ६६८ किमी. (काही संदर्भग्रंथात महाराष्ट्रातील लांबी ७३२ किमी आढळते)
गोदावरी महाराष्ट्र, तेलंगणा व आंध्र प्रदेश या तीन राज्यातून व पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशातून वाहते. गोदावरी खोरे भारतातील महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़, ओडिशा व कर्नाटक ही ७ घटकराज्ये व पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशात विस्तारले आहे. (सर्वाधिक विस्तार : महाराष्ट्र, सर्वात कमी : कर्नाटक) आंध्र प्रदेशात राजमहेंद्री येथे बंगालच्या उपसागरास मिळते. इतर नावे : ‘वृद्धगंगा’, ‘दक्षिण गंगा’
• प्रमुख उपनद्या : दारणा, प्रवरा, मुळा, सिंधफणा, बिंदूसरा, मांजरा, प्राणहिता, इंद्रावती, शबरी. गोदावरी-कृष्णा नदीजो

ड प्रकल्प यशस्वी: १६ सप्टेंबर २०१५ रोजी आंध्र प्रदेशात गोदावरीच्या पोलावरम उजव्या बायद्यातून कृष्णा नदीस ८०TMC पाणी सोडण्यात आले.

कृष्णा :(कृष्णा खोरे : संपूर्ण भारतात तिसरा क्रमांक, द्वीपकल्पीय पठारावर दुसरा क्रमांक)
उगम : महाराष्ट्रातील ‘महाबळेश्वर’ (जि. सातारा) • एकूण लांबी : १४०० कि.मी.
महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा व आंध्र प्रदेश या चार राज्यांतून वाहते. कृष्णेचे देशातील क्षेत्रफळ : २,५८,९४८ चौकिमी. आंध्र प्रदेशात बंगालच्या उपसागरास मिळते.
प्रमुख उपनद्या : कोयना, वारणा, वेण्णा, वेरळा, पंचगंगा, घटप्रभा, मलप्रभा, भीमा, तुंगभद्रा, मुशी, मुन्नेरू

महानदी : देशातील चौथ्या क्रमांकाचे व द्वीपकल्पीय पठारी प्रदेशातील तिसऱ्या क्रमांकाचे खोरे.
उगम : छत्तीसगढमधील रायपूर जिल्ह्यात. एकूण लांबी : ८५८ कि.मी. (ओडिशा राज्यातील सर्वांत मोठी नदी)
पूर्व घाटात महानदी पात्रात ‘सत्कोसिया’ घळई निर्माण झाली आहे. महानदी खोऱ्याचे क्षेत्र : १४१६०० चौकिमी.ओडिशातील कटक येथे बंगालच्या उपसागरास मिळते.
उपनद्या : हिराकूड, ईब, ओंग, मांद, तेल, शिवनाथ.

कावेरी : पश्चिम घाटात कर्नाटकातील कूर्ग (कोडूगू) जिल्ह्यात ‘ब्रह्मगिरी’ येथे उगम होतो.नर्मदा खोऱ्याप्रमाणेच कावेरी खोऱ्याचा देशात पाचवा क्रमांक व द्वीपकल्पीय पठारी प्रदेशात चौथा क्रमांक लागतो.
विस्तार : लांबी ७६५ कि.मी. (कर्नाटक, तामिळनाडू या दोन राज्यांतून वाहते.)तामिळनाडूमध्ये बंगालच्या उपसागरास मिळते. कावेरी खोऱ्याचे देशातील क्षेत्रफळ : ८७,९०० चौकिमी. गोदावरीप्रमाणेच कावेरी नदीलादेखील ‘दक्षिण गंगा’ म्हणून ओळखले जाते.
‘शिवसमुद्रम’ (कर्नाटक) हा प्रसिद्ध धबधबा कावेरी नदीमुळे तयार झाला आहे.
प्रमुख उपनद्या : हेमवती, हेरांगी, शिमसा, लक्ष्मणतीर्थ, काबनी, भवानी, लोकपावनी, अर्कावती, सुवर्णावती, अमरावती इ.
कावेरी नदीची ९०% क्षमता जलसिंचन व विद्युतनिर्मितीसाठी वापरली जाते.

1 thought on “भारतातील नद्यांची संपूर्ण माहिती : Bhartatil Nadyanchi Sampurn Mahiti”

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा