युरोपीय व्यापाराची सुरूवात (Beginning of European
Commerce) – आधुनिक भारताचा इतिहास | MPSC Notes in marathi

युरोपीय व्यापाराची सुरूवात (Beginning of European Commerce) – आधुनिक भारताचा इतिहास | MPSC Notes in marathi

पार्श्वभूमी

● भारताचे युरोपशी प्राचीन ग्रीक काळापासून व्यापारी संबंध होते. मध्ययुगात युरोपचा भारत आणि आग्नेय आशियाशी विविध मार्गाहून व्यापार चालत असे. या व्यापाराच्या आशियाई भागात सहकाऱ्यांनी अरब व्यापाऱ्यांचे वर्चस्व होते, तर भूमध्यसागरीय व युरोपीय भागात इटालियन व्यापाऱ्यांचे (व्हेनिस व जिनोआच्या व्यापाऱ्यांचे) वर्चस्व होते. आशियापासून युरोपपर्यंत जातांना वस्तू अनेक देशांमधून व अनेक व्यक्तींच्या हातातून जात असत तरीही व्यापार खूप किफायतशीर असे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

● मात्र १५ व्या शतकाच्या मध्यावर या व्यापारी मार्गांमध्ये अडथळा निर्माण झाला, कारण इ.स. १४५३ मध्ये ऑटोमन तुर्कानी कॉन्स्टॅन्टिनोपल (सध्याचे इस्तंबूल शहर) जिंकून घेतले.

● हे शहर म्हणजे बायझन्टाइन साम्राज्याची (पूर्वेकडील रोमन साम्राज्याची) राजधानी होती. तुर्कानी त्यांच्या साम्राज्यातून जाणारे खुष्कीचे व्यापाराला मार्ग म्हणजेच भूमार्ग रोखून धरले. त्यामुळे पूर्वेकडील देशांकडे जाण्यासाठी युरोपीय देशांना आता नवे मार्ग शोधणे आवश्यक झाले.

● असे मार्ग शोधण्यात स्पेन व पोर्तुगाल हे पश्चिम युरोपीय देश वस्तू अग्रेसर होते. त्यांना व्हेनेशियन व्यापाऱ्यांची मक्तेदारी मोडायची होती, तुर्काच्या संपर्कात न येता पूर्वेशी प्रत्यक्ष व्यापारी संबंध निर्माण करावयाचे होते.

● जहाज-बांधणी व सागरी वाहतूक आणि विज्ञानातील प्रगतीमळे त्यांना हे शक्यही होते. तसेच ‘प्रबोधनकाळा’मुळे (Rennaissance) पश्चिम युरोपीय देशामध्ये निर्माण झालेल्या साहसी भावनेमुळे सागरी भौगोलिक शोधांना चालना मिळाली.

वार्थोलोम्यू डायस हा पोर्तुगीज खलाशी भारताच्या शोधात आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत पोहोचला. या टोकाला ‘आशेचे भूशिर’ (Cape ofGood Hope) हे नाव मिळाले.

पोर्तुगीज (Portuguese)

नवीन सागरी मार्गाचा शोधः

● युरोपपासून भारतापर्यंत नवीन सागरी मार्ग पोर्तुगीज खलाशी वास्को-द-गामा याने शोधून काढला. तो आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला (केप ऑफ गुड होप) वळसा घालून भारताच्या पश्चिम सत्ता किनाऱ्यावरील कालिकत बंदरात २० मे, १४९८ रोजी उतरला.
कालिकतचा हिंदू राजा झामोरिनने त्याचे स्वागत केले. (झामोरिन हे कालिकतच्या हिंदू राजाची पदवी होती. त्याचा अर्थ ‘समुद्राचे राजे’ (Sea kings) असा होतो.)

● इ.स.१४९९ मध्ये वास्को-द-गामा पोर्तुगालला परत गेला. त्याने नेलेला माल त्याच्या सागरी सफरीच्या ६० पटीने अधिक किंमतीला विकला गेला.

● इ.स. १५०० मध्ये पेड्रो अल्वरेज कॅब्रल हा पोर्तुगीज खलाशी भारतात आला. इ.स. १५०२ मध्ये वास्को-द-गामा दुसऱ्यांदा भारतात आला. यावेळी तो अधिक जहाजे घेऊन आला होता. त्याने कालिकत, कोचीन आणि कननोर येथे व्यापारी केंद्रे स्थापन केली. गोव्याच्या आधी कोचीन ही पोर्तुगिजांची पहिली राजधानी होती.

● इ.स. १५०५ ते १५०९ दरम्यान फ्रान्सिस्को डी अल्मिडा याला भारतातील पहिला पोर्तुगीज गर्व्हनर म्हणून नेमण्यात आले. भारतात प्रदेश मिळविणे आणि हिंदी महासागरातील अरबांची व्यापारी मक्तेदारी संपुष्टात आणणे, ही त्याची उद्दिष्टे होती. त्याने १५०९ मध्ये दीवजवळ एका सागरी लढाईत इजिप्त, तुर्कस्तान व गुजराथच्या एकत्रित मुस्लिम आरमाराचा पराभव केला. त्यामुळे १६ व्या शतकात हिंदी महासागरावर पोर्तुगिजांचे वर्चस्व निर्माण होण्याचा मार्ग सुकर झाला.

● पोर्तुगालच्या राजाने लवकरच मसाल्यांचा, विशेषतः काळ्या मिरीचा व्यापार, राजसत्तेची मक्तेदारी (Royal monopoly) असल्याचे घोषित केले.

अल्बुकर्कचे आगमनः

● अल्फान्सो डी अल्बुकर्क (Algonso de Albuquerque) हा १५०३ मध्ये स्कॉड्रन कमांडर म्हणून भारतात आला होता. १५०९ मध्ये त्याला दुसरा पोर्तुगीज गव्हर्नर म्हणून नेमण्यात आले. .

अल्बुकर्कची तीन उद्दिष्टे होतीः १.पर्शियाचे आखात व तांबड्या समुद्रावर नियंत्रण प्राप्त करणे, २.भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर एखाद्या मध्यवर्ती ठिकाणी पोर्तुगिजांचे मुख्यालय स्थापन करणे,
आणि ३.मलय-इंडोनेशियातील अरबांचा व्यापार उद्धस्त करणे.

● त्यानुसार अल्बुकर्कने फेब्रुवारी १५१० मध्ये विजापूरच्या आदिलशाहाकडून गोवा जिंकून घेतले. तसेच किनाऱ्यावर इतर प्रदेश मिळविला, आपला व्यापार वाढविला आणि इतर युरोपीय स्पर्धकापासून आपल्या व्यापारी मक्तेदारीचे संरक्षण केले. खलाशी त्यासाठी प्रसंगी चाचेगीरी व लुटालूटीबरोबरच अमानवीय क्रूर कृत्ये सुद्धा केली. त्याच्या नेतृत्वाखाली पोर्तुगिजांची व्यापारी सत्ता पर्शियाच्या आखातातील होर्मूझपासून मलयातील मलक्का व इंडोनेशिया बेटांपर्यंत प्रस्थापित झाली.

● कार्टझ् (cartazes): पोर्तुगिजांनी हिंदी महासागरात व्युहात्मक ठिकाणी कस्टम स्टेशन्स स्थापन केली. आशियाई व्यापाऱ्यांना तेथून ‘कार्टझ्’ म्हणून ओळखले जाणारे कागदपत्र घ्यावे लागे.ते एक प्रकारचे संरक्षणाचे पत्र (letter ofprotection) असे,ज्यामुळे आशियाई व्यापाऱ्यांच्या जहाजांना पोर्तुगिजांच्या हल्ल्यापासून संरक्षण मिळत असे.

● अल्बुकर्कने मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे भारतात स्थायिक दुसऱ्यांदा झालेल्या कनिष्ठ वर्गीय पोर्तुगीज व्यापाऱ्यांना भारतीय महिलांशी विवाह करण्यास प्रोत्साहित केले. त्याने विजयनगरच्या राज्याशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित करून त्यांना उमद्या अरबी घोड्यांचा
पुरवठा केला. तसेच त्याने भारतीय व्यक्तींना घेऊन प्रशिक्षित सैनिकांचे नियमित लष्करही निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने मुस्लिमांचा छळ घडवून आणला.

इतर महत्वाचे गव्हर्नर्सः

● १)निनो द कुन्हा (१५२९-३८): त्याने १५३० मध्ये राजधानी कोचीनहून गोव्याला हलविली. त्याने १५३४ मध्ये गुजराथच्या बहादूर शाहाकडून दीव, साष्टी व वसई जिंकून घेतले.

२)मार्टीन अल्फान्सो डिसूझा (१५४२-४५): प्रसिद्ध जेस्यूट सेंट फ्रान्सिस झेवियर त्याच्याबरोबर भारतात आले.

पोर्तुगीजांच्या महत्वाच्या वसाहती:

● पोर्तुगिजांच्या पश्चिम किनाऱ्यावर पुढील प्रमुख वसाहती होत्याः कोचीन, गोवा, दीव, दमण, चौल, साष्टी इत्यादी.

● पोर्तुगिजांच्या पूर्व किनाऱ्यांवर मद्रासजवळ सेंट थोम आणि बंगालमध्ये हुगळी, चितगाव येथे वसाहती होत्या.

◆ पोर्तुगिजांचा ऱ्हास (Decline)

● १६ व्या शतकाच्या अखेरिस पोर्तुगीज सत्तेचा -हास होण्यास सुरूवात झाली. सुरूवातीला हॉलंड आणि इंग्लंड, तर नंतर फ्रान्स या वेगाने विकसित होत असलेल्या व्यापारी व सागरी शक्ती होत्या. त्यांनी जागतिक व्यापारावरील पोर्तुगीज व स्पॅनिश मक्तेदारी मोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोर्तुगीज व्यापारी
स्पर्धेत मागे पडले. त्यांनी हळहळ आपल्या बऱ्याच वसाहती गमावल्या.

पोर्तुगिजांचे भारतावरील परिणाम

● i) पोर्तुगिजांनी भारतात तिंबाखूची लागवड सुरू केली.
● ii)पोर्तुगिजांमुळे भारतातील जहाजबांधणी उद्योग धोक्यात आला. गुजराथ व कालिकत यांना जहाजबांधणी थांबविणे भाग पडले.
● iii)पोर्तुगिजांनी भारताच्या पश्चिम व पूर्व किनाऱ्यांवर कॅथॉलिक धर्माचा प्रसार केला. ● iv)१५५६ मध्ये पोर्तुगिजांनी भारतात गोवा येथे पहिली प्रिटिंग प्रेस स्थापन केली.
● v)१५५६ मध्ये भारतीय औषधी वनस्पतींवरील पहिले युरोपीय पुस्तक द गार्सिया द ओर्ता या पोर्तुगीज लेखकाने प्रकाशित केले.

● डच (Dutch)

कंपनीची स्थापना

● मार्च १६०२ मध्ये हॉलंडमधील काही व्यापाऱ्यांनी डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. डच संसदेने कंपनीला सनद देऊन कंपनीला युद्ध करणे, तह करणे, प्रदेश संपादित करणे आणि तटबंदी बांधणे, असे अधिकार प्रदान केले.

वसाहतींची स्थापना

● डचांनी आपली पहिली व्यापारी वसाहत १६०५ मध्ये मसुलीपट्टणम येथे स्थापन केली. त्यानंतर त्यांनी पुलिकत (१६१०), सुरत (१६१६), बिम्लीपटम (१६४१), कारिकल राजे (१६४५), चिनसुरा (१६५३), कासिमबझार, बारानागोर, पाटणा, बालासोर, नागपट्टम (सर्व १६५८ मध्ये), आणि कोचीन (१६६३) येथे आपल्या व्यापारी वसाहती स्थापन केल्या.१६९० च्या आधी पुलिकत हे त्यांचे भारतीय प्रमुख केंद्र होते,
तर त्यानंतर नागपट्टणमने त्याची जागा घेतली.

पोर्तुगिजांचा पाडाव

● डचांचे प्रमुख लक्ष भारतावर नव्हते, तर जावा, सुमात्रा या इंडोनेशियाच्या बेटांवर व इतर मसाले पिकविणाऱ्या मसाले बेटांवर (Spice Islands) होते. त्यांनी मलय सामुद्रधुनी आणि इंडोनेशियन बेटांवरून पोर्तुगिजांची हाकालपट्टी केली. तसेच १६२३ मध्ये ब्रिटिशांचा तेथे प्रस्थापित होण्याचा प्रयत्न हाणून पाडला. पुढे १६५८ मध्ये पोर्तुगिजांकडून श्रीलंका जिंकून घेतले. अशा रीतीने १७ व्या शतकात डचांनी युरोपीय पूर्वीय व्यापारात सर्वात प्रबळ शक्ती म्हणून पोर्तुगिजांची जागा घेतली.

इंग्रज-डच स्पर्धा

● १७ व्या शतकाच्या मध्यावर इंग्रज एक प्रबळ वसाहतवादी शक्ती म्हणून उदयास आले. इंग्रज व डचांमध्ये ६०-७० वर्षांच्या व्यापारी स्पर्धेनंतर, १८ व्या शतकाच्या सुरूवातीला डचांची भारतातील सत्ता घसरू लागली. ब्रिटिशांनी १७५९ मध्ये ‘वेदेराच्या लढाईत (Battle of Bedera) डचांचा पराभव
केल्यानंतर त्यांचा पाडाव घडून आला.

◆ वसाहतींचा हानी

● एका मागे एक डचांनी त्यांच्या वसाहती ब्रिटिशांना गमावल्या. १७९५ मध्ये ब्रिटिशांनी त्यांना भारतातून पूर्णपणे हद्दपार केले.

ब्रिटिश (English) )

जॉन मिल्डनहॉलचे आगमन (Arrival of John Mildenhall)

● ईस्ट इंडिया कंपनीचे भारतात आगमन होण्यापूर्वी जॉन मिल्डनहॉल हा साहसी व्यापारी १५९९ मध्ये भूमार्गाने भारतात आला. भारतीय व्यापाऱ्यांकडून काही वस्तू विकत घेणे हा त्याचा उद्देश होता.

ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना (Formation ofEICO)

● १५९९ मध्ये लंडनच्या काही साहसी व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन ‘इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनी’ या नावाने एक व्यापारी कंपनी स्थापन केली. इंग्लंडची राणी एलिझाबेथ हीने या कंपनीला ३१ डिसेंबर, १६०० रोजी सनद देऊन पुढील १५ वर्षांसाठी भारतासहित पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा मक्ताधिकार दिला.

● ही १५ वर्षे संपण्याच्या आतच पुढील राजा जेम्स पहिला याने १६०९ मध्ये कंपनीला नवीन सनद देऊन अमर्यादित कालावधीसाठी व्यापाराचा मक्ताधिकार दिला.

सुरतला वखार/वसाहत स्थापन करण्याचा निर्णय (De- cision to open factory at Surat)

● ईस्ट इंडिया कंपनीने १६०८ मध्ये सुरतला वखार (factory) स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्याची संमती घेण्यासाठी १६०९ मध्ये कॅप्टन हॉकिन्स मुघल बादशाह जहांगीरच्या दरबारात आला. सुरूवातीला अशी संमती देण्याची जहांगीरची इच्छा होती, मात्र पोर्तुगिजांच्या दबावामुळे त्याने संमती नाकारली.

युरोपीय व्यापाराची सुरूवात (Beginning of European Commerce) – आधुनिक भारताचा इतिहास | MPSC Notes in marathi

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा