Agniveer Recruitment 2023 : अग्निवीर भरती ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

Agniveer Recruitment 2023 : भारतीय सैन्य मार्फत होणाऱ्या अग्निवीर भरती 2023 – 2024 साठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसाठी अर्ज सुरु असून आता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 20 मार्च 2023 मुदतवाढ [Application Date Extended] करण्यात आली आहे .

भारतीय सैन्य दलामार्फत महाराष्ट्रातील विविध ARO युनिट द्वारे २०२३-२०२४ सालच्या अग्निवीर भरतीसाठी अर्जांची मागणी केली जात आहे. या भरतीची दोन टप्प्यांची प्रक्रिया असून पहिल्या पाठवड्यात लेखी परीक्षा [First Written Test] घेण्यात येणार आणि नंतर शारीरिक चाचणी [Second Physical Test ]घेण्यात येईल.

Agniveer Recruitment Maharashtra Overview 2023

पदांची नावे : जनरल ड्युटी, अग्निवीर टेक्निकल, अग्निवीर क्लर्क, स्टोअर कीपर टेक्निकल, अग्निवीर ट्रेड्समॅन

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पात्रता : – Eligibility Criteria

  • अग्निवीर जनरल ड्युटी [GD]– विद्यार्थ्याने 45 टक्क्यांसह 10 वी पास असणं आवश्यक आहे. प्रत्येक विषयात कमीत कमी 35 टक्के गुण असणं आवश्यक आहे. ज्या उमेदवारांकडे लाइट मोटार व्हेईकल परवाना आहे, त्यानं प्राधान्य दिलं जाईल.
  • अग्निवीर टेक्निकल [Technical]– फिजिक्स, केमिस्ट्री, गणित आणि इंग्रजी विषयात 50 टक्के गुणांसह 12 वी पास आवश्यक आहे. प्रत्येक विषयात कमीत कमी 40 टक्के गुण आवश्यक आहेत.
  • अग्निवीर क्लर्क/स्टोअरकीपर [Clerk/Storekeeper]– कमीत कमी 60 टक्के गुणांसह 12 वी पास असणं आवश्यक आहे. इंग्रजी आणि गणित/अकाउंट्स/बुक कीपिंगमध्ये कमीत कमी 50 टक्के गुण आवश्यक आहेत.
  • अग्निवीर ट्रेड्समॅन [Tradesman]– या पदासाठी उमेदवार कमीत कमी 8 वी ते 10 वी पास असणं आवश्यक आहे. सर्व विषयांमध्ये किमान 35 टक्के गुण आवश्यक आहे.

वयोमर्यादा : साडे 17 वर्षे ते 21 वर्षे  जन्म 01 ऑक्टोबर 2002 ते 01 एप्रिल 2006 दरम्यान.

अर्ज फी : 250 /-

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 मार्च 2023 – Date Extended

लेखी परीक्षा दिनांक : 17 एप्रिल 2023 पुढे – Written Exam

ऑनलाईन अर्ज व जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा