Adverbs in English क्रियाविशेषणे

Kriyavisheshan|क्रियाविशेषणे – adverbs | English Grammar in Marathi

1 AFTERWARDS = नंतर

1.AFTERWARDS = नंतर
१) You left at 4.00 and soon afterwards we left.
तू चार वाजता निघालास आणि लगेच नंतर आम्ही निघालो.
२) I will come afterwards if you are busy now.
तू आता व्यस्त असशील तर मी नंतर येईन.

2. AGAIN = पुन्हा

2. AGAIN = पुन्हा
१) I will think once again. मी पुन्हा एकदा विचार करेन.
2) You are doing the same mistake again and again. तू तीच चूक पुन्हा-पुन्हा करत आहेस,
3) Will you read the letter over again? तू हे पत्र पुन्हा एकदा वाचशील का?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

3. AGO = पूर्वी

3.AGO = पूर्वी
१) They left just a minute ago.
ते आत्ता एका मिनिटापूर्वी निघाले.
२) He had come here about two years ago.
तो जवळपास दोन वर्षांपूर्वी इथे आला होता.

4.AHEAD = पुढे, समोर

4.AHEAD = पुढे, समोर
१) We reached an hour ahead of our time. आम्ही वेळेच्या एक तास आधी पोहोचलो.
२) You go on ahead, we will leave in half an hour.
तू पुढे चल, आम्ही अर्ध्या तासात निघतो.

5.ALMOST = जवळपास

5. ALMOST = जवळपास
१) Almost everyone gave the same answer.
जवळपास प्रत्येकाने सारखंच उत्तर दिलं.
२) We are almost ready. .
आम्ही जवळजवळ तयार आहोत.

6.ALREADY= आधीच

6.ALREADY = आधीच
१) It is 9.30 already.
आधीच ९.३० वाजून गेले आहेत.
२) I have already told him about this. मी त्याला याबद्दल आधीच सांगितलंय.
३)I have already heard all about it.
मी त्याबद्दल सगळं आधीच ऐकलंय.

7.ALSO = सुद्धा

7.ALSO = सुद्धा
१)He is a teacher and also runs his own gym.
तो शिक्षक आहे आणि स्वत:ची व्यायामशाळाही चालवतो.
२) He also writes poems.
तो कविता सुद्धा लिहितो.

8.ALWAYS = नेहमी

8.ALWAYS = नेहमी
१) He is always sad.
तो नेहमी उदास असतो.
२) He almost always comes late.
तो जवळपास नेहमीच उशिरा येतो.
३) He always comes on time.
तो नेहमी वेळेवर येतो.

9.ASIDE = बाजूला

9.ASIDE = बाजूला
१) Stand aside.
बाजूला उभा राह.
२) Leave this problem aside for the moment .
तात्पुरतं ही अडचण बाजूला ठेव.

10.AT ALL

10.AT ALL
जोर देण्यासाठी बहुधा प्रश्नार्थी व नकारार्थी वाक्यात at all चा उपयोग होतो
१) Why should I go there at all?
मी तिथे जायला तरी का पाहिजे?
२) There is no doubt at all about it.
त्याबद्दल कसलीच/अजिबात/मुळीच शंका नाही. (= शंकाच नाही.)

11.AWAY = दूर

11.AWAY = दूर
१) The station is 7 kms away from our house.
स्टेशन आमच्या घरापासून सात किलोमीटर दूर आहे.
२) Stay away from these wires.
या तारांपासून दूर रहा.

12.BARELY

12.BARELY १) She was barely 14 when she had her first baby.
तिला पहिलं मूल झालं तेव्हा ती कशीबशी/केवळ/जेमतेम चौदा वर्षांची होती.
२) There were barely 15 people at the meeting.
मीटिंगमधे जेमतेम १५ जण होते.
तुलना करा: There were hardly / scarcely 15 people at the meetमीटिंगमधे जास्तीत जास्त १५ जण होते – म्हणजे कमी सुद्धा असू शकतात.

13.DOWN = खाली

13.DOWN = खाली
१) Get down off that table.
त्या टेबलावरून खाली उतर.
२) Put that bag down.
ती पिशवी खाली ठेव.

14.EARLY = लवकर

14.EARLY = लवकर
१) I think you got up early today.
मला वाटतं तू आज लवकर उठलास.
२) We had to go on foot so we left early.
आम्हाला पायी जायचं होतं म्हणून आम्ही लवकर निघालो.
3) The early days of marriage are over now.
लग्नाचे सुरुवातीचे दिवस आता संपले आहेत.

15.ELSE

15.ELSE
any-levery-/no-/some- पासून सुरू होणाऱ्या शब्दानंतर आणि how, what, where, who आणि why नंतर else हा शब्द बऱ्याचदा वापरला जातो.
२) Everything else is okay.
बाकी सगळं ठीक आहे.
२) He wants something else.
त्याला आणखी/दुसरं काहीतरी पाहिजे.
३) Do you want anything else?
तुला आणखी काही पाहिजे का?
४) I want nothing else.
मला आणखी काही नको. ५) Who else can be? ?
दुसरा कोण असू शकतो?
६)What else do you want?
तुला आणखी काय पाहिजे?
७) What else can Ido?
मी दुसरं काय करू शकतो?
८) I think you are wearing someone else’s shirt.
मला वाटतं तू दुसऱ्या कोणाचा तरी शर्ट घातलेला आहे.

16.ENOUGH = पुरेशा, पुरेशी, पुरेसे

16 ENOUGH = पुरेशा, पुरेशी, पुरेसे
2) I don’t have enough clothes.
माझ्याकडे पुरेसे कपडे नाहीत.
२) have caused you enough trouble already.
मी तुम्हाला आधीच पुरेसा त्रास दिलेला आहे.
३) This room doesn’t get enough light.
या खोलीत पुरेसा प्रकाश येत नाही.
४) This rope is not strong enough,
ही दोरी पुरेशी मजबूत नाही.
५) They are not working hard enough.
ते पुरेशा मेहनतीने काम करत नाही आहेत.
६) She is clever enough to understand your trick.
ती तुझी युक्ती समजण्याइतकी हुशार आहे.

17.EVEN

17.EVEN
१) Everyone came on time – even Hari, who never comes on time
प्रत्येकजण वेळेवर आला – हरी सुद्धा, जो कधी वेळेवर येत नाही.
२) This job can even take one month to finish.
हे काम संपायला एक महिना सुद्धा लागू शकतो.
३)Tomorrow will be even colder than today.
उद्याचा दिवस आजपेक्षाही जास्त थंड असेल.
४) Even if you go by plane, you will not get there on time,
तू विमानाने गेलास तरी तू तिथे वेळेवर पोहोचणार नाहीस. ५) You must go there even if you don’t want to meet him.
तुला त्याला भेटायचं नसलं तरी तू तिथे जायलाच पाहिजे.
६) Even though he never went to school, he got everything he wanted in his life.
तो शाळेत कधी गेला नाही तरी जीवनात हवी असलेली प्रत्येक गोष्ट त्याला मिळाली.

18.EVER

18 EVER
१) Have you ever thought about this?
तू याबद्दल कधी विचार केला आहे का?
२) Do you ever go there?
तू तिथे कधी जातोस का?
३) If you ever happen to go there again, I will come with you.
तुझं तिथे पुन्हा कधी जाणं झालं तर मी तुझ्यासोबत येईन.
४) He never ever forgets to ring his mother once a week.
तो त्याच्या आईला आठवड्यात एकदा फोन करायला कधी विसरत नाही.
५) This is the best book I have ever read.
मी आत्तापर्यंत वाचलेलं हे सर्वोत्तम पुस्तक आहे.
६) This the worst experience I have ever had.
मी आत्तापर्यंत घेतलेला हा सगळ्यात वाईट अनुभव आहे.
७) He is my best ever friend.
तो माझा सगळ्यात चांगला मित्र आहे.
(इथे ever चा उपयोग best या विशेषणावर जोर देण्यासाठी झालेला आहे.)
● प्रश्नावर जोर देण्यासाठी प्रश्नार्थी शब्दासोबत everचा उपयोग केला जाऊ शकतो. तेव्हा वाक्यातून सहसा आश्चर्य, राग किंवा चीड व्यक्त होते.
उदाहरणे:
१) Why ever should anyone want to read such a book?
असं पुस्तक वाचण्याची का बरं कोणाची इच्छा होईल?
येत नाही
२) what ever are you doing in the cupboard?
काय करत आहेस तू कपाटात? ३) who ever threw these banana skins here?
या केळीच्या साली कोणी फेकल्या इथे? ४) saw what you were doing last evening”.
काल संध्याकाळी तू काय करत होतास ते पाहिलं मी. “What ever do you mean?” काय म्हणायचय तुला?
५)”Always keep some sugar and salt with you”.
थोडी साखर आणि मीठ नेहमी सोबत ठेवत जा. “Why ever? / What ever for7″ का बरं?
6) “I will never go to France again”.
मी पुन्हा कधी फ्रान्सला जाणार नाही.
~”Why ever not?” का बरं नाही?

19.FAIRLY/RATHER

19 FAIRLY/RATHER
● या दोन्ही क्रियाविशेषणांचा उपयोग मध्यम प्रमाणात’ या अर्थाने केला जाऊ शकतो. पण fairly मुख्यतः अनुकूलतादर्शक शब्दांसोबत (जसे, good, beautiful, clean इ.सोबत) वापरले जाते. आणि rather साधारणपणे प्रतिकूलतादर्शक शब्द (जसे, bad, ugly dirty इ.) सोबत वापरले जाते.
उदाहरणे:१) This room is fairly clean – that one is rather dirty.
ही खोली बऱ्यापैकी स्वच्छ आहे – ती खोली थोडी घाणेरडी आहे.
2) His previous book was rather boring but his new one is fairly
readable.
त्याचं आधीचं पुस्तक थोडं कंटाळवाणं होतं पण त्याचं नवीन पुस्तक बऱ्यापैकी वाचनीय आहे.
● पण काही शब्द (जसे, थंड, गरम, वगैरे) जे प्रतिकूलतादर्शक की अनुकूलतादर्शकले
परिस्थितीनुसार ठरतं अशा शब्दांसोबत fairly / rather वापरून आपण पसंती/नापसंती
व्यक्त करू शकतो. जसे,
१) The tea is rather hot.
या वाक्यातून असे सूचित होते की चहा हवा त्यापेक्षा जास्त गरम आहे.
२) The tea is fairly hot.
म्हणजे ‘चहा बऱ्यापैकी गरम आहे’. या वाक्यातून असे सूचित होते की बोलणाऱ्याला तेवढा गरम चहा चालतो/आवडतो.

20.FAR

20.FAR
१) He is far more experienced than you.
तो तुझ्यापेक्षा खूप जास्त अनुभवी आहे.
२) He swims far better than you do.
तो तुझ्यापेक्षा खूप जास्त चांगला पोहतो.
३) As / so far as I know (माझ्या माहितीप्रमाणे), he will not attend
the meeting. (तो मीटिंगला येणार नाही).
४) How far can you see?
तू किती दूर पाहू शकतोस?
५) He lives far away.
तो खूप दूर राहतो.
६) You drive far too fast.
तू खूपच वेगाने गाडी चालवतोस.
७) He was far from satisfied.
तो समाधानी नव्हता.
८) So far, the progress is satisfactory.
इथपर्यंत, प्रगती समाधानकारक आहे.
IAs/so far as + नाम / सर्वनाम + be + concerned = च्या पुरतं/च्या
बद्दल बोलायचं तर.
उदा. So far as /As far as | am concerned, I won’t help in such a plan.
माझ्याबद्दल बोलायचं तर मी या योजनेत मदत करणार नाही.

21.HARDLY

21.HARDLY
१) He hardly ever comes here.
(Hardly मधून जवळजवळ नकारात्मक अर्थ व्यक्त होतो.) हे वाक्य Hardly ever does he come here असेही म्हणता येईल
२) We could hardly hear speaker’s voice. .
आम्हाला वक्त्याचा आवाज जवळपास ऐकू येत नव्हता.
३) I can hardly lift this box.
मी ही पेटी मोठ्या मुश्किलीने उचलू शकतो.
४) He hardly ate anything yesterday.
त्याने काल जवळपास काही खाल्लंच नाही.
५) There were hardly 10 students in the classroom.
वर्गात फार फार तर १० विद्यार्थी होते.

22.JUST

22.JUST
१)I am just coming.
मी येतच आहे.
2) I am just about to leave.
मी अगदी निघण्याच्या मार्गावर आहे.
3) I will just come in 5 minutes.
मी बस पाच मिनिटात येतो.
४) I have just recently met him.
मी त्याला अगदी अलीकडेच भेटलोय.
५) The bus has just left.
बस आत्ताच सुटली आहे.
६) He is talking on the phone just now.
तो या वेळेस/या क्षणी/सध्या फोनवर बोलतोय.
७) Hari was here just now.
हरी अगदी थोड्याच वेळापूर्वी/आत्ताच तर इथे होता.
८) This is just a beginning.
ही तर फक्त/नुसती सुरुवात आहे.
९) He is just seven years old now.
तो आता केवळ सात वर्षाचा आहे.

Kriyavisheshan|क्रियाविशेषणे – adverbs | English Grammar in Marathi

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा