MAHAJYOTI MPSC UPSC Free Coaching 2023 : महाज्योती नागपूर संस्थे द्वारे स्पर्धा परीक्षा MPSC व UPSC ची तयारी करण्याऱ्या विद्यार्थांसाठी मोफत प्रशिक्षण साठी अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवार १० एप्रिल २०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकता.
Mahajyoti Free Coaching MPSC/UPSC
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, नागपूर संस्थेकडून महाराष्ट्र लोकसेवा (MPSC) व UPSC परीक्षापूर्व प्रशिक्षण वर्ष २०२३ -२०२४ करीता OBC/SBC/VJNT या संवर्गातील पात्र विद्याथ्याकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत.
केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) व महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC परीक्षेकरीता इतर मार्गसवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्याथ्र्यांना 2023-24 या वर्षामध्ये UPSC/MPSC परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑफलाईन व अनिवासी पद्धतीने महाज्योती मार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याकरीता इच्छुक विद्यार्थ्याकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.
परीक्षा | UPSC – English | UPSC – Marathi | MPSC |
---|---|---|---|
प्रशिक्षणासाठी एकूण मंजूर विद्यार्थी संख्या | 1500 | 1000 | 1500 |
प्रशिक्षणाचा कालावधी | 11 महिने | 11 महिने | 11 महिने |
विद्यावेतन | 13,000/- (75% उपस्थिती असल्यास) | 10,000/- (75% उपस्थिती असल्यास) | 10,000/- (75% उपस्थिती असल्यास) |
आकस्मिक निधी | 18,000/- | 12,000/- | 12,000/- |
प्रशिक्षणाचे ठिकाण | दिल्ली (माध्यम- इंग्रजी) | पुणे (माध्यम – मराठी ) | पुणे |
महाज्योती योजनेच्या लाभासाठी पात्रता :
- विद्यार्थी हा ही महाराष्ट्राचा रहिवासी असावा/ असावी.
- विद्यार्थी हा ही इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा/असावी,
- विद्याथ्यों हाही नॉन-क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा/ असावी
- विद्याथ्यों ही पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे किंवा पदवीच्या अंतिम वर्षाला असणारे विद्यार्थी सुद्धा या प्रशिक्षणाकरीता अर्ज करु शकतात.
- महाज्योतीच्या कोणत्याही योजनांचा कोणत्याही स्वरुपात लाभ घेतलेल्या विद्यार्थ्याने चालु योजनेसाठी पुन्हा अर्ज करू नये, त्यांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाही,
- विद्यार्थ्याची अंतिम निवड छाननी परिक्षेद्वारे करण्यात येईल.
- विद्यार्थ्यांचे किमान वय (MPSC – 19) (UPSC – 21) वर्ष व कमाल वय (MPSC – 43 ) (UPSC – 35) वर्ष पेक्षा जास्त असू नये. दिव्यांग व्यक्तीकरीता वय37 वर्षापेक्षा अधिक असू नये.
अर्ज कसा करावा :
खाली दिलेल्या महाज्योती च्या लिंक वर जाऊन सूचना फलक निवडावे व ओनलाईन अर्ज सबमिट करून कागदपत्रे अपलोड करावे . अर्ज करण्याची शेवटची तारीख १० एप्रिल २०२३ आहे.
महाज्योती अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.