Teacher Recruitment Maharashtra : शालेय शिक्षण विभागाने राज्यात नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी ३० हजार शिक्षकांची भरती करण्याची घोषणा केली आहे आणि त्यांची नावे पवित्र पोर्टलवर येणार आहेत. याबाबत शाळेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी विधानसभेत माहिती दिली.
त्याच बरोबर शिक्षकांच्या पदभरतीसाठी टेट (TAIT) परीक्षा एका वर्षात दोन वेळा घेतली जाईल. आत्ताच ३० हजारपैकी ८० टक्के पदे भरण्याची परवानगी दिली गेली आहे. उर्वरित पदांची भरती त्यानंतर होईल.
येणाऱ्या एप्रिल महिन्यामध्ये सर्व ३०,००० शिक्षक पदांची भरती पूर्ण केली जाईल.
संपूर्ण जाहिरात लवकरच उपलब्ध होईल.