जाहिरात लेखन Jahirat Lekhan in Marathi – या पोस्ट मध्ये आपण बघणार आहोत मराठी मध्ये जाहिरात लेखन Advertisement Writing कसे करावे . जाहिरात लेखन हे वर्ग ९ वि व १० वि च्या अभ्यासक्रमामध्ये विचारले जाते.
जाहिरात लेखन – Jahirat Lekhan in Marathi
जाहिरात लेखन म्हणजे एखादी वस्तू , साधन, सेवा यांची माहिती आकर्षक पणे लोकांपर्यंत पोहचवणे . जाहिरात बनविण्याचा प्रमुख उद्देश आपली वस्तू लोकांच्या नजरेत आणून तिची जास्तीत जास्त विक्री करणे हा असतो. तुम्ही रस्त्यावरील बॅनर, वर्तमानपत्र, मोबाईल फोन व टीव्ही मध्ये वेगवेगळ्या वस्तूंच्या जाहिराती पाहिल्या असतील. या जाहिरात खाण्याच्या वस्तू पासून तर परिधान करण्याच्या कपड्यांपर्यंतच्या असतात.
जाहिरातीची माध्यमे – Jahirat Lekhan Medium
- इंटरनेट – Internet – Digital Marketing
- चित्रपट – Movie
- वृत्तपत्रे – Newspaper
- मासिके –
- आकाशवाणी Radio
- दूरदर्शन – Television
- चौकांमधील फलक – Banners
- गर्दीच्या ठिकाणी वाटली जाणारी पत्रके
जाहिरात तयार करताना घ्यायची काळजी – Tips to Write
- जाहिरात तयार करताना प्रथम मथळा, उपमथळा तयार करावा.
- जाहिरात नेहमी कमीत कमी शब्दांत असावी.
- जाहिरातीची भाषा साधी, सोपी, पण वेधक असावी.
- जाहिरातीत व्यवहारातील भाषा वापरली तरी चालेल.
- जाहिरातीची भाषा क्लिष्ट, किचकट, बुद्धीला ताण दयायला लावणारी नसावी.
- जाहिरातीतील तपशिलामध्ये सुभाषिते, सुवचने, सुप्रसिद्ध गाण्याच्या ओळी, कवितेतल्या ओळी, काव्यमयतेचा आभास निर्माण करणाऱ्या ओळी, लोकांमध्ये विशेष लोकप्रिय असलेले शब्दप्रयोग इत्यादींचा उपयोग करावा.
- समाजातील प्रचलित संकेत, लोकभावना यांना धक्का देणारी भाषा नसावी.
- जाहिरात ही वेचक, अर्थपूर्ण आणि प्रसन्नता निर्माण करणारी असावी.
- जाहिरात ही परिणामकारक आणि सुसंवाद साधणारी असावी.
- जाहिरातीत विनोदाची पखरण करता आल्यास उत्तम.
- जाहिरातीला चित्राची जोड देता आल्यास जाहिरात अधिक प्रभावी होते, हे खरे. मात्र जाहिरातलेखनात चित्रे काढणे किंवा चित्रकलात्मक सजावट करणे परीक्षेत अनिवार्य नाही.
- जाहिरातीचे भाषिक रूप महत्त्वाचे आहे. साध्या चौकटीमध्ये योग्य ओळींत केलेली मांडणीही पुरेशी असते.
- जाहिरातीमध्ये शक्य झाल्यास कंपनीची मुद्रा तयार करावी.
- जाहिरातीमध्ये कंपनीचे नाव व पत्ता ठळकपणे लिहावा.
पत्र लेखन मराठी मधे बघण्यासाठी येथे क्लिक करा
Jahirat Lekhan Examples
खालील दिलेल्या जाहिरात लेखन वाचून कृती सोडवा
- जाहिरातीतून मिळणारा संदेश – योगा शिबिराचे आयोजन केले आहे.
- जाहिरातीचे वैशिष्ट्य – जाहिराती मध्ये योग्य तज्ञाकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे
- जाहिरातीतील ठळक वैशिष्ट्ये – मोफत आरोग्य तपासणी
तुम्ही वाचले आहेत जाहिरात लेखन – Jahirat lekhan in Marathi . आवडले असल्यास कंमेंट करून नक्की कळवा .