Viram Chinh in Marathi | विराम चिन्हे मराठी

Viram Chinh in Marathi : आपण या लेखात मराठी मधील विरामचिन्हे व त्यांचे प्रकार ( Viram chinh meaning in English is Punctuation Marks ) बघणार आहोत. मराठी व्याकरणात विरामचिन्हे महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. ते वाक्याचे अर्थ स्पष्ट करण्यासाठी आणि वाक्ये सुसंगत बनवण्यासाठी वापरले जातात. मराठीत सहा महत्वाचे विरामचिन्हे आहेत: पूर्णविराम (.), अल्पविराम (,), अर्धविराम (;), प्रश्नचिन्ह (?), उद्गारचिन्ह (!), उद्धरण चिन्ह (” “).

विराम चिन्हे म्हणजे काय :

वाक्य वाचतांना कोठे संपते, वाक्यामध्ये प्रश्न कोठे आहे , त्यामध्ये उद्गार कोणता, वाक्यात कोठे किती थांबावे हे समजण्यासाठी जी वाक्यात चिन्हे वापरली जातात, त्यांना विरामचिन्हे ( Punctuation Marks ) म्हणतात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

विराम चिन्हांचे प्रकार : Marathi Viram Chinh Types

मराठी व्याकरणा मध्ये विराम चिन्हांचे खालील प्रकार पडतात,

  1. पुर्णविराम ( . ) / Full stop
  2. अर्धविराम ( ; ) / Semi-colon
  3. स्वल्पविराम ( , ) / Comma
  4. अपूर्णविराम ( : ) / Colon
  5. प्रश्नचिन्ह ( ? ) / Question mark
  6. उद्गारवाचक चिन्ह ( ! ) / Exclamation point
  7. अवतरणचिन्ह ( ” ”     ‘ ‘ ) / Quotation marks
  8. संयोगचिन्ह ( – ) / Conjunction sign
  9. अपसरण चिन्ह (—) / Divergence sign
  10. विकल्प चिन्ह (/) / option symbol

त्यांचे प्रकार व उदारणार्थ ( Examples ) खालीलप्रमाणे

पुर्णविराम ( . ) – Purn Viram Chinh

वाक्य पूर्ण झाले हे दर्शविण्यासाठी ( . ) हे चिन्ह वापरतात त्याला पूर्ण विराम असे म्हणतात किंवा शब्दांचा संक्षेप दाखविण्यासाठी अक्षरांपूढे –

पूर्णविराम वाक्ये पूर्ण करण्यासाठी वापरला जातो. उदाहरणार्थ, “मी आज शाळेत जाईन.”

पूर्णविराम उदाहरणार्थ / :

  • मुले परत निघाली.
  • आई एकदम चकित झाली.
  •  पु. ल. देशपांडे 
  • वि.स.खांडेकर

अर्धविराम ( ; ) Ardh Viram Chinh

जेव्हा दोन छोटी वाक्ये जोडतांना उभयान्वीयी अव्ययाच्या आधी ( ; ) असे चिन्ह दिले जाते, त्याला अर्धविराम म्हणतात.

अर्धविराम उदाहरणार्थ . 

  • हे खरे अवघड काम होते; पण वैभव कल्पक होता.
  • मी बस स्टॅन्ड गेलो होतो; पण बस मिळाली नाही.

स्वल्पविराम ( , ) किंवा अल्पविराम – Swalp Viram Chinh

वाक्यामध्ये एकाच जातीचे अनेक शब्द लोगोपाठ लिहिण्यासाठी स्वल्पविराम या चिन्हाचा उपयोग होतो. एखाद्याला नामाने हाक देऊन संबोधल्या नंतर ही स्वल्पविराम वापरतात. स्वल्पविराम ( , ) या चिन्हाने दर्शविला जातो.

स्वल्पविराम उदाहरणार्थ :

  • माझ्याकडे इतिहास, भूगोल, गणित, विज्ञान या सर्व विषयांचे पुस्तके आहेत.
  • आनंद , इकडे ये.

अपूर्णविराम ( : ) Apurn Viram Chinh

वाक्यातील गोष्टी वाक्यानंतर सांगायच्या असतील किवा एखाद्या गोष्टीचा तपशील द्यायचा असल्यास त्या तपशिला अगोदर अपूर्णविराम वापरतात. अपूर्णविराम ( : ) या चिन्हाने दर्शविला जातो.

अपूर्णविराम उदाहरणार्थ :

  • पुढील क्रमांकाचे विधार्थी उत्तीर्ण झाले : 5,7,9,12,15,18

प्रश्नचिन्ह ( ? ) – Prashn Chinh

एखाद्या वाक्यात प्रश्न विचारायच्या असल्यास तो प्रश्न दर्शवण्यासाठी प्रश्नचिन्ह (?) वापरले जाते.

प्रश्नचिन्ह उदाहरणार्थ

  • तुझे नाव काय आहे?
  • भारतात एकूण किती राज्ये आहेत?

उद्गारवाचक चिन्ह ( ! ) – Udgarvachak Chinh

उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखविणार्‍या शब्दाच्या शेवटी  उद्गारवाचक चिन्ह ( ! ) वापरले जाते. 

उद्गारवाचक चिन्ह उदाहरणार्थ :

  • बापरे! केवडा मोठा साप!
  • आहाहा! किती सुरेख देखावा.

अवतरणचिन्ह ( ” ”     ‘ ‘ )

दुहेरी अवतरणचिन्ह (” “) बोलणार्‍याला तोंडाचे शब्द दाखवण्याकरिता व एकेरी अवतरणचिन्ह (‘ ‘) एखाधा शब्दावर जोर लावायचा असल्यास किंवा दुसर्‍याचे मत अप्रत्येक्षपणे सांगतांना.

अवतरणचिन्ह उदाहरणार्थ :

  • ‘श्यामची आई’ हे साने गुरुजींनी लिहिलेले पुस्तक आहे.
  • तो म्हणाला, “मी घरी येईन.”

संयोगचिन्ह ( – ) – Sanyog Chinh

वाक्यातील दोन शब्द जोडतांना किंवा परस्पर संबंधी शब्द लिहितांना संयोगचिन्ह (-) याचा वापर केला जातो.

संयोगचिन्ह उदाहरणार्थ :

  • दोन – तीन 
  • स्त्री – पुरुष

अपसरणचिन्ह (—) Apsaran Chinh

वाक्यात जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टी बाबतीत स्पष्टीकरण द्यायचे असेल तेव्हा आपण तिथे अपसारण चिन्हाचा ( — ) वापर करत असतो .

अपसरणचिन्ह उदाहरणार्थ :

  • प्रभू श्री राम चंद्राचे पुत्र दोन — लव व कुश

विकल्प चिन्ह (/) Vikalp Chinh

एखाधा शब्दासाठी असलेला पर्याय दाखविण्यासाठी दोन शब्दांमध्ये हे विकल्प चिन्ह (/) वापरतात.

विकल्पचिन्ह उदाहरणार्थ :

  • इथे वडील/पालक यांची सही पाहिजे

आज आपण बघितले आहेत सर्व मराठी विराम चिन्ह उधाहरणासह ( All Viram chinh in Marathi with Examples ) तुम्हाला आवडले असल्यास comment करून नकी कळवा .

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा