मराठी व्याकरण प्रश्नसंच ११ : Marathi Grammar Practice Test 11

1) खालीलपैकी कोणता शब्द भाववाचक नामाचा प्रकार आहे.
अ. भारत ब. चपळाई क. हिमालय ड. नम्रता

1) फक्त ब
2) फक्त का
3) फक्त अवब
4) फक्त ब वड

2) वडिलांना पाहताच मुलाचा आनंद द्विगुणित झाला, अधोरेखित शब्दप्रकार ओळखा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1) गुणविशेषण
2) पृथकत्ववाचक संख्याविशेषण
3) आवृत्तीवाचक संख्याविशेषण
4) क्रियापद

3) आई त्या मुलाला हसविते. अधोरेखित शब्दप्रकार ओळखा.

1) अनियमित क्रियापद
2) सयुक्त क्रियापद
3) शक्य क्रियापद
4) प्रयोजक क्रियापद

4) खालीलपैकी कालवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा?

  1. सर्वत्र 2. सावकाश 3. वारंवार 4. पूर्वी

1) फक्त 4
2) फक्त 3
3) फक्त 3 व 4
4) फक्त 2 व 4

5) एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होवून त्यातील नादामुळे जेंव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते. तेव्हा…….हा अलंकार होतो.

1) अनुप्रास
2) यमक
3) अर्थालंकार
4) उपमा

6) “चौदावे रत्न दाखविणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?

1) खूप श्रीमंत होणे
2) चौदावे रत्ने दुसऱ्यास दाखविणे
3) खूप रत्ने सापडणे
4) खूप मार देणे

7) “भिकेची हंडी शिक्याला चढत नाही.” म्हणीचा अर्थ शोधून पर्याय लिहा.

1) भिकेची हंडी शिंक्यावर ठेवू नये.
2) दुसऱ्यावर अवलंबून असणारे सदा दरिद्रीच असतात.
3) उपकार करायचे नसतील तर अपकार करु नयेत.
4) भिकेची झोळी शिंक्यावर बसत नाही.

8) तो रस्त्यावरुन चालत होता. त्याचा पाय घसरला. तो पडला या वाक्याचे एक केवल वाक्य बनवा.

1) तो रस्त्यावरुन चालत असताना पाय घसरुन पडला.
2) पाय घसरुन पडला कारण तो रस्त्यावरुन चालत होता.
3) तो रस्त्यावरुन चालत होता म्हणून पाय घसरुन पडला.
4) रस्त्यावरुन चालल्यामुळे तो पाय घसरुन पडला.

9) “राम भरपूर खात असे” या वाक्यातील काळ ओळखा?

1) रीती भूतकाळ
2) साधा भूतकाळ
3) रीति वर्तमानकाळ
4) पूर्ण भूतकाळ

10) खालीलपैकी कोणत्या गटातील वर्णांना अर्धस्वर म्हटले जाते.

1) अ, आ, ई, ऊ
2) य, र, ल, व्
3) श्, ष, स् , ह्
4) अ, आ, इ, उ

11) खालीलपैकी कोणत्या जोडया चुकलेल्या आहेत.

  1. चोराच्या मनात चांदणे – खाई त्याला खवखवे
  2. कामापुरता मामा – ताकापुरती आजीबाई
  3. शेरास सव्वाशेर – चोरावर मोर
  4. बाप तसा बेटा – खाण तशी माती

1) फक्त अवक
2) फक्त ब व ड
3) फक्त केवळ क
4) वरीलपैकी एकही नाही

12) क्रियाविशेषण अव्ययापुढे त्याच्या प्रकारचे चार पर्याय दिलेआहेत. योग्य पर्याय निवडा. बुद्धिपुरस्सर

1) विशेषणसाधित
2) धातुसाधित
3) अव्ययसाधित
4) प्रत्ययसाधित

13) खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे ?

1) अभंगगाथा-संत तुकाराम
2) यथार्थदीपिका – वामन पंडित
3) स्वेदगंगा – ग. दि. माडगूळकर
4) केकावली – मोरोपंत

14) खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे?

1) गीताई – विनोबा भावे
2) ययाती – वि. स. खांडेकर
3) कृष्णाकाठ – यशवंतराव चव्हाण
4) स्मृतीचित्रे – जयंत दळवी

15) ‘निलकंठ ‘ हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे ?

1) बहुव्रीही
2) कर्मधारय
3) द्वंद्व
4) तत्पुरुष

16) ‘ओनामा ‘ या शब्दासाठी खालीलपैकी योग्य शब्द ओळखा?

1) इतिश्री
2) ओंकार
3) प्रारंभ
4) समाप्ती

17) ‘माझ्या हातुन चूक झाली या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा ?

1) षष्ठी
2) द्वितीया
3) सप्तमी
4) पंचमी

18) देह जावो अथवा राहो । पांडुरंगी दृढ भावो’ या अवतरणातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता?

1) न्युनत्वबोधक
2) स्वरुपबोधक
3) विकल्पबोधक
4) परिणामबोधक

19) केवलप्रयोगी अव्यय असलेले वाक्य ओळखा.

1) आम्ही क्रिडांगणावर खेळलो.
2) काय हे सगुणाचे जेवण!
3) मी काय बोलणार?
4) शी! काय हे अक्षर तुझे!

20) “कर्तव्य पराड्:मुख म्हणजे काय?

1) मनापासून कर्तव्य करणारा
2) कर्तव्यात तत्पर नसणारा
3) कर्तव्याकडे पाठ फिरवणारा
4) कर्तव्यात तत्पर असणारा

21) ‘राव गेले रणी भगुबाईची पर्वणी याचा योग्य अर्थ ओळखा.

1) बड्या घरच्या सर्व लोकांना मान दिला जातो.
2) धनिक लोक आश्रिताला उगाचच महत्व देतात.
3) मोठ्या लोकांच्या गैरहजेरीत क्षुद्र माणसे आपले ज्ञान दाखवितात.
4) मोठ्यांच्या गैरहजेरीत छोट्यांनी शान दाखवू नये.

22) ‘तट्टीका या संधीचा विग्रह करा?

1) ततः + टीका
2)त् + ट् + ई + का
3) तत् + टीका
4) त्रा + टीका

23) ‘घागरगडाचा सुभेदार’ या वाक्प्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता?

1) ठणठण गोपाळ
2) अकलेचा खंदक
3) पाणक्या
4) सैन्यदलातील पदवी

24) वारा या शब्दाचा खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही?

1) अनिल
2) समिरण
3) समिर
4) सलिल

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा