१) विरुद्धार्थी शब्द ओळखा – अग्रज
1) अनुज
2) पोरमा
3) लहान
4) धाकटा
२) विशेषणाचा प्रकार ओळखा. ‘काळा घोडा’
1) संख्या आवृत्तीवाचक विशेषण
2) गुणवाचक विशेषण
3) संबंधी विशेषण
4) संख्यावाचक विशेषण
३) उपसर्गघटित शब्द म्हणजे काय?
1) धातूला प्रत्यय लागल्याने बनलेले शब्द
2) प्रत्यय लागून बनलेले शब्द
3) शब्दांच्या पूर्वी उपसर्ग लागून तयार होणारे शब्द
4) उपसर्ग निघून गेलेले शब्द
४) ‘आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून, आम्ही योगासने करतो.’ हे विधान कोणत्या वाक्याच्या प्रकारात येते?
1) केवल वाक्य
2) संयुक्त वाक्य
3) मिश्र वाक्य
4) विकल्पबोधक
५) ठरावीक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला काय म्हणतात?
1) वाक्य
2) स्वरादी
3) वर्ण
4) शब्द
६) ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे, म्हणजे दुसऱ्या वर्णांच्या मदतीशिवाय होतो त्यास काय म्हणतात?
1) व्यजन
2) स्वर
3) वर्ण
4) शब्द
७) ‘विद्वान’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.
1) श्रीमंती
2) राशी
3) विदुषी
4) भगवती
८) दिलेल्या शब्दाचा समान अर्थी शब्द ओळखा: रिपू
1) सर्प
2) सखा
3) मित्र
4) अरी
९) ‘सुधाने निबंध लिहिला असेल.’ या वाक्याचा काळ ओळखा.
1) अपूर्ण भविष्यकाळ
2) पूर्ण भविष्यकाळ
3) साधा भविष्यकाळ
4) रीती भविष्यकाळ
१०) नैसर्गिक व शासकीय संकट या अर्थाचा वाक्प्रचार कोणता?
1) अस्मानी – सुलतानी
2) दुष्काळात तेरवा महिना
3) दैवाचा कोप
4) आकाशाची कु-हाड
११) योग्य संबंध शोधा. वाल्मीकी : रामायण :: ज्ञानेश्वर : ?
1) भावार्थदीपिका
2) गीता
3) भागवत
4) दासबोध
१२) पुढील वाक्याकरिता योग्य म्हण निवडा – भपका मोठा पण त्याची प्रत्यक्ष वागणूक ढोंगीपणाची.
1) नाव मोठं लक्षण खोटं
2) उथळ पाण्याला खळखळाट फार
3) ओठात एक पोटात एक
4) भपका भारी खिसा खाली
१३) ‘गायरान’ या शब्दाचे लिंग ओळखा.
1) नपुसकलिंग
2) यापैकी नाही
3) स्त्रीलिंग
4) पुल्लिंग
१४) ‘पृथक’ या शब्दास समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता?
1) पृथ्वी
2) पृच्छा
3) निराळा
4) पार्थिव
१५) एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला काय म्हणतात?
1) सर्वनाम
2) विशेषनाम
3) सामान्यनाम
4) भाववाचक नाम
१६) नी, शी, ई, ही, हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत?
1) चतुर्थी
2) सप्तमी
3) षष्ठी
4) तृतीया
१७) पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समास ओळखा.’पार्वतीने नीलकंठास वरले.’
1) बहुव्रीही समास
2) अव्ययीभाव समास
3) तत्पुरुष समास
4) द्वव
१८) क्रियापद म्हणजे …..?
1) वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द
2) क्रिया करणारा
3) क्रिया वस्तूवर घडते
4) ज्याच्यात कर्म असते.
१९) पुढीलपैकी सामान्य नाम कोणते?
1) नर्मदा
2) गंगा
3) सिंधू
4) नदी
२०) बायकोचा नवऱ्यावर विश्वास हवा. अधोरेखित शब्दाची उपयोजित जात ओळखा.
1) धर्मवाचक नाम
2) भाववाचक नाम
3) विशेषनाम
4) भरवसा
२१) जो विकारी शब्द नामाची व्याप्ती मर्यादित करतो. त्यास……..म्हणतात.
1) सर्वनाम
2) क्रियापद
3) विशेषण
4) यापैकी नाही
२२) एकवचनात व अनेकवचनात सारखीच राहणारी नामांची रूपे कोणती?
1) पुस्तक, पाटी, वही, खड्डा
2) धर्म, शाळा, दगड, देव
3) धोंडा, इमारत, अंगठा, बोट
4) सायकल, मोटार, विमान, गाडी
२३) पुढील दिलेल्या शब्दापुढे त्या शब्दाच्या विरूद्ध अर्थाचा पर्याय दिला आहे. त्यापैकी योग्य पर्याय निवडा : ऐहिक
1) प्राकृतिक
2) विदेही
3) पारलौकिक
4) लौकिक
२४) सामान्यरूप असलेली शब्दजोडी ओळखा.
1) नदी – नदीला
2) भरभर-भाराभर
4) देखील – देखलेपण
3) साठा-साठ्ये
२५) खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.
1) नदी – नदीला
2) भरभर-भाराभर
4) देखील – देखलेपण
3) साठा-साठ्ये
अतिसुंदर मराठी व्याकरण सरावासाठी मुलांना फार उपयोगी