VidhanParishad Information in Marathi
• कलम-१७१ नुसार विधानपरिषदेच्या रचनेची तरतूद करण्यात आलेली आहे.
• भारतात सध्या ७ घटकराज्यात विधानपरिषद अस्तित्वात आहे. (महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक, जम्मू काश्मिर, तेलंगणा, उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश.)
• महाराष्ट्राच्या विधान परिषदेची सदस्य संख्या ७८ इतकी आहे.
• विधानपरिषद हे राज्य विधिमंडळाचे द्वितीय व वरिष्ठ सभागृह आहे.
• कलम-१६९ नुसार घटकराज्यात विधानपरिषद असावी किंवा नसावी हे ठरविण्याचा अधिकार संबंधित घटकराज्याच्या विधानसभेचा आहे.
• विधानपरिषद अस्तित्वात आणण्यासाठी किंवा नष्ट करण्यासाठी संबंधित राज्याच्या विधानसभेने २/३ बहुमताने ठराव पारित करावा लागतो, व हा ठराव संसदेने साध्या बहुमताने मंजूर करावा लागतो.
• १९५६ च्या ७ व्या घटनादुरुस्तीनुसार विधानपरिषदेची सदस्यसंख्या संबंधित घटकराज्याच्या विधानसभा सदस्यसंख्येच्या १/३ पेक्षा जास्त नसावी व ४० पेक्षा कमी नसावी असे ठरविण्यात आले आहे.
अपवाद :जम्मू काश्मिरच्या विधानपरिषदेची सदस्यसंख्या ३६ इतकी आहे. सर्वात जास्त सदस्यसंख्या उत्तरप्रदेशच्या विधानपरिषदेची 100 इतकी आहे.
विधानपरिषद (Legislative Council) माहिती
निवडणूक पद्धत :
- १/१२ (७) सदस्यांची निवड पद्वीधर मतदारसंघातून केली जाते.
- १/३ (२६) सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांकडून निवडून दिले जातात.
- १/१२ (७) सदस्यांची निवड शिक्षक मतदार संघातून केली जाते.
- कलम १७१ (३) नुसार विधान परिषदेच्या सदस्यांच्या निवडणुकीची पद्धत देण्यात आलेली आहे.
- ३ वर्षे शिक्षक म्हणून काम करणाऱ्या उमेदवाराकडून हे प्रतिनिधी प्रत्यक्ष मतदान पद्धतीने निवडले जातात.
- १/३ (२६) सदस्य राज्याच्या विधानसभेच्या सदस्यांकडून त्या सभेचे सदस्य नसलेल्या व्यक्तिमधून निवडुन दिले जातात.
- विधानपरिषदेच्या एकुण सदस्यापैकी ५/६ सदस्य एकलसंक्रमणीय मतांद्वारे प्रमाणशील प्रतिनिधित्व पद्धतीनुसार निवडुन दिले जातात.
- नामनिर्देशित सदस्य – १/६ (१२) कलम १७१ (५) नुसार सदस्यांची नियुक्ती राज्यपाल साहित्य, कला, विज्ञान, समाजसेवा अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींची निवड करतात.
पात्रता :
१) भारतीय नागरिकत्त्व असावे.
२) वयाची ३० वर्ष पूर्ण केलेली असावीत.
३) संसदेने केलेल्या कायद्यांच्या अटीची वेळोवेळी पूर्तता करावी.
कार्यकाळ :
• विधान परिषद हे स्थायी सभागृह आहे.
• दर दोन वर्षांनी विधान परिषदेतील १/३ सदस्य निवृत्त होतात व त्यांच्या जागी पुन्हा तितकेच नवीन सदस्य निवडले जातात.
• विधान परिषदेच्या सदस्यांची मुदत सहा वर्ष असते.
• सभागृहाच्या परवानगीविना सतत व सलग ६० दिवस विधान परिषदेच्या सभांना गैरहजर राहणाऱ्या सदस्यांचे सदस्यत्व आपोआप रद्द होते.
सभापती व उपसभापती :
• भारतीय घटनेमध्ये सभापती व उपसभापती यांच्या कार्यकाळ संदर्भात तरतूद नाही.
• विधानपरिषदेचे सदस्य आपल्यापैकी एका सदस्याची सभापती म्हणून तर एकाची उपसभापती म्हणून निवड करतात.
• विधानपरिषदेच्या सभापतींना लेखी स्वरूपात आपला राजीनामा उपसभापतींना द्यावा लागतो.
• उपसभापती व इतर सदस्य आपला राजीनामा सभापतीकडे देतात.
• विधानपरिषदेच्या सभापतींना विधानपरिषदेमध्ये बहुमताने ठराव समंत करुन पदावरुन दूर केले जाऊ शकते परंतु असा ठराव १४ दिवस आधी पुर्वसूचना दिल्यानंतरच मांडता येतो.
महत्त्वाचे :– राष्ट्रपतींची निवडणुक, घटनादुरुस्ती विधेयक यांमध्ये विधान परिषदेस स्थान नसते.
गणपूर्ती :- सभागृहाच्या एकुण सदस्य संख्येच्या एक दशांश (१/ किंवा १० यापैकी अधिक असेल ती झाल्यास सभापती सभागृह तहकूब करतात.