संधी मराठी व्याकरण – Sandhi in Marathi

Marathi Sandhi: संधी व संधीचे प्रकार :आज आपण बघणार आहोत व्याकरण मधील महत्वाचा विषय म्हणजे मराठी संधी व प्रकार सोबतच स्वरसंधी, व्यंजनसंधी व विसर्गसंधी म्हणजे काय व त्यांचे प्रत्येक संधीचे विविध प्रकार व उदाहरण.

संधी म्हणजे काय

जोडशब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुस-या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकांमध्ये मिसळतात व त्या दोहोंबद्दल एक वर्ण तयार होतो. वर्णाच्या अशा एकत्र होण्याच्या प्रकारास संधी असे म्हणतात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

दोन शब्द एकत्र केल्यास त्यास ‘ संधी ‘ असे म्हणतात. अर्थात, ‘संधी’ होताना एकमेकांशेजारी येणारे वर्ण उच्चारशास्त्राच्या नियमानुसार एकत्र येतात व जोडशब्द तयार होतो. जवळ जवळ आलेले दोन ध्वनी जोडण्याला संधी म्हणतात. संधी खालील तीन प्रकारच्या असतात.

संधी म्हणजे सांधणे, जोडणे.

संधीचे प्रकार -Sandhi Types in Marathi

  • स्वरसंधी
  • व्यंजनसंधी
  • विसर्गसंधी

तुम्हाला आवडेल : संपूर्ण मराठी व्याकरण नोट्स

स्वर संधी

स्वर संधी म्हणजे काय एकत्र येणारे दोन्ही वर्ण स्वर असल्यास त्यास ‘स्वर संधी’ असे म्हणतात.किंवा एक पाठोपाठ एक येणारे दोन स्वर एकत्र होण्याच्या क्रियेला ‘स्वर संधी’ असे म्हणतात. थोडक्यात, स्वर + स्वर=स्वरसंधी होय. स्वरसंधीचे नियम पुढीलप्रमाणे आहे.

स्वर संधीचे प्रकार व उदाहरणे

१. सजातीय स्वरसंधी / दिर्घत्वसंधी :

दोन सजातीय स्वर एकमेकांशेजारी आले असता त्या दोहोंबद्दल त्याच जातीतील एकच दीर्घ स्वर येतो.

पोटशब्द एकत्र येणारे स्वर संधी
मुख्य + आलयअ + आ=मुख्यालय
अरुण + अचल अ+ आ=अरुणाचल
वनिता + आश्रमआ + आ= आ वनिताश्रम
मुनि + इच्छाइ+इ= ईमुनीच्छा
गीता + अर्णव आ + अ=आगीतार्णव
गुरु + उपदेशउ+उ = ऊगुरूपदेश
भू + उद्धारऊ +उ= ऊ भूदधार
गिरि + ईशइ + ई = ईगिरीश
जानकी + ईशई + ई= ईजानकीश

२. गुणादेश स्वरसंधी:

‘अ’ किंवा ‘आ’ पुढे ‘इ’ किंवा ‘ई’ आल्यास त्या दोहोंएवजी ‘ए’ येतो.

पोटशब्दएकत्र येणारे स्वरसंधीपोटशब्दएकत्र येणारे स्वरसंधी
यथा + इष्टआ + इ = एयथेष्टईश्वर + इच्छा अ +इ=एईश्वरेच्छा
रमा +ईश आ + ई = एरमेश चंद्र + ईशअ + ई = एचंद्रेश

३. वृद्ध्यादेश स्वरसंधी :

‘अ’ किंवा ‘आ’ पुढे ‘ए’ किंवा ‘ऐ’ आल्यास त्या दोहोंबद्दल ‘ऐ’ येतो.

पोटशब्दएकत्र येणारे स्वरसंधी
एक+एकअ+ए= ऐएकैक
सदा+एवआ+ऐ= ऐसदैव

४. यणादेश स्वरसंधी :

‘इ’ किंवा ‘ई’, ‘उ’ किंवा ‘क’ आणि ‘ऋ’ किंवा ‘ना’ यांच्यापुढे कोणताही विजातीय स्वर आल्यास ‘इ’ किंवा ‘इ’ ऐवजी ‘य’ येतो, ‘उ’ किंवा ‘अ’ ऐवजी ‘ब’ येतो व ‘क’ किंवा ‘ऋ’ ऐवजी ‘र’ येतो आणि त्यात पुढील स्वर मिळतो.

पोटशब्दएकत्र येणारे स्वरसंधी
प्रति+अंतरइ+अ=य्+अ=यप्रत्यंतर
स्थिती+अंतरई+अ=य्+अ=यस्थित्यंतर
सु+अल्पउ+अ=व्+अ=वस्वल्प

५. उर्वरित स्वरसंधी ः

ए, ऐ, ओ, औ यांच्यापुढे कोणताही स्वर आल्यास ‘ए’ ऐवजी ‘अय’, ‘ऐ’ ऐवजी ‘आय’, ‘ओ’ ऐवजी ‘अ’ आणि ‘और ऐवजी ‘आ’ येतात व त्यांमध्ये पुढील स्वर मिळतो.

पोटशब्दएकत्र येणारे स्वरसंधी
नौ+इकऔ+इ=आव्+इ=आवि नाविक

व्यंजन संधी

व्यंजन संधी म्हणजे काय ?=एकत्र येणाऱ्या दोन वर्णांपैकी एक अथवा दोन्हीही वर्ण व्यंजन असल्यास ‘व्यंजनसंधी’ तयार होतो. थोडक्यात, स्वर + अथवा व्यंजन + व्यंजन = व्यंजनसंधी होय, व्यंजनसंधीचे नियम पुढीलप्रमाणे आहे.

व्यंजन संधी मराठी व्याकरण प्रकार खालीलप्रकारे

१. प्रथम व्यंजन संधी –

दोन शब्दाची संधी होत असतांना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण ग, ज, ड, द, ब (मृदु व्यंजन) यांच्यापैकी आल्यास तर संधी होत असतांना त्याचे जागी त्याच वर्गातील पहिले व्यंजन (क, च, ट, त, प) येऊन संधी होते त्याला प्रथम व्यंजन संधी असे म्हणतात.

प्रथम व्यंजन संधी उदाहरणे .

वाक्चातुर्य = वाग्+चातुर्य
षट्शास्त्र = षड्+शास्त्र
विपत्काल = विपद्+काल
वाक्पति = वाग्+पति
क्षुत्पिपासा = क्षुध्+पिपासा
शरत्काल = शरद्+काल
वाक्तांडव = वाग्+तांडव
आपत्काल = आपद्+काल

२. तृतीय व्यंजन संधी

दोन शब्दाची संधी होत असतांना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण क, च, ट, त, प यापैकी कोणताही वर्ण आल्यास त्यापासून संधी होत असतांना त्या वर्णाचे जागी त्याच वर्गातील तृतीय व्यंजन येते या संधीला तृतीय व्यंजन संधी असे म्हणतात.

तृतीय व्यंजन संधी उदाहरणे .

वागीश = वाक्+ईश
वाग्देवी = वाक्+देवी
अजंत = अच्+अंत
वडानन = वट्+आनन
सदिच्छा = सत्+इच्छा
अब्ज = अप्+ज
सदाचार = सत्+आचार
सदानंद = सत्+आनंद

३. अनुनासिक संधी :

पहिल्या पाच वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास त्याच वर्गातील अनुनासिकाशी व्यंजन संधी होतो त्यास अनुनासिक व्यंजन संधी असे म्हणतात.

अनुनासिक संधी उदाहरणे .

वाड्निश्चय = वाक्+निश्चय
षण्मास = षट्+मास
जगन्नाथ = जगत्+नाथ
संमती = सत्+मती
सन्मार्ग = सत्+मार्ग
तन्मय = तत्+मय

४. त ची विशेष व्यंजन संधी :

‘त्’ या व्यंजनापुढे ‘च’ किंवा ‘छ्’ आल्यास ‘त्’ बद्दल ‘च’ येतो.
च किंवा छ आल्यास तर त बद्दल च येतो.
ट किंवा ठ आल्यास ट बद्दल ट येतो.
ज किंवा झ आल्यास त बद्दल ज येतो.
ल् आल्यास त बद्दल ल् येतो.
श आल्यास त बद्दल च होतो व पुढील श बद्दल छ येतो.

उदाहरणे.

सच्चरित्र = सत्+चरित्र
उच्छेद = उत्+छेद
सज्जन = सत्+जन
सट्टिका = सत्+टीका
उल्लंघन = उत्+लंघन
सच्छिष्य = सत्+शिष्य
उज्ज्वल = उत्+ज्वल
तल्लीन = तत्+लीन

म चा संधी

म पुढे स्वर आल्यास तो स्वर मागील म मध्ये मिसळून जातो. जर व्यंजन आल्यास म बद्दल मागील अक्षरावर अनुस्वार येतो.

Examples

समाचार = सम्+आचार
संगती = सम्+गती
समाप्त = सम्+आप्त
संताप = सम्+ताप
संक्रमण = सम्+क्रमण
संचय = सम्+चय

विसर्ग संधी मराठी व्याकरण

विसर्ग संधी म्हणजे काय:

ज्या वेळी एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला वर्ण विसर्ग असतो तेव्हा ‘विसर्ग संधी’ तयार होतो. खाली काही विसर्गसंधी दिले आहेत.
विसर्गसंधीचे नियम पुढीलप्रमाणे आहे .

१. विसर्ग उकार संधी

विसर्गाच्या पुढे पाच गटापैकी कोणतेही मृदु व्यंजन आल्यास विसर्गाचा उ होतो व तो मागील अ मध्ये मिसळून त्याचा ओ होतो. याला विसर्ग उकार संधी असे म्हणतात.

उदाहरणे:

यशोधन = यशः+धन
मनोरथ = मन:+रथ
अधोवदन = अध:+वदन
तेजोनिधी = तेज:+निधी
मनोराज्य = मन:+राज्य
अधोमुख = अध:+मुख

२. विसर्ग-र-संधी –

विसर्गाच्या मागे अ किंवा आ खेरीज कोणताही स्वर असून पुढे मृदु वर्ण आल्यास विसर्गाचा र होऊन संधी होणे.

उदाहरणे.

निरंतर = नि:+अंतर
दुर्जन = दु:+जन
बहिरंग = बहि:+अंग
बहिद्वार = बहि:+द्वार

३. विसर्ग र संधी –

विसर्ग र संधी होत असतांना विसर्गाच्या मागे अ, आ खेरीज कोणताही स्वर आल्यास त्या विसर्गाचा र होतो जर दुसरा वर्ण असल्यास यावेळी पहिल्या र चा लोप होतो व त्याच्या मागील स्वर ऱ्हस्व असल्यास दीर्घ होतो.

उदाहरणे

नीरस = नि:+रस
नीरव = नि:+रव

४. विसर्ग घ संधी

विसर्गापुढे च, छ, ट, त, प, यापैकी कोणताही वर्ण आल्यास विसर्गाच्या जागी श, ष, व, स येऊन संधी होतो.

उदाहरणे

दुश्चिन्ह = दु:+चिन्ह
शनैश्वर = शनै:+चर
निश्चय = नि:+चय
दुष्टीका = दु:+टीका
निस्तेज = नि:+तेज
चक्षु: = चक्षु:+तेज
अधस्तल = अध:+तल
मनस्ताप = मन:+ताप
निष्फळ = नि:+फळ
निष्काम = नि:+काम

५. विसर्ग ड संधी

विसर्गापूर्वी अ असून पुढे क, ख, प, फ यापैकी कोणतेही व्यंजन आल्यास विसर्ग स्थिर राहतो.

उदाहरणे

रज:कण = रज:+कण
अध:पात = अध:+पात
अंत:पटल = अंत:+पटल
तेज:पुंज = तेज:+पुंज

तुम्ही वाचले आहे Marathi Sandhi तुम्हाला आवडले असल्यास कंमेंट करून नक्की कळवा .

4 thoughts on “संधी मराठी व्याकरण – Sandhi in Marathi”

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा