भारतातील मृदासंपत्ती माहिती : गाळाची,काळी,पर्वतीय,तांबडी मृदा

भारतातील मृदासंपत्ती माहिती : भारतात वेगवेगळ्या भागात वेगळ्या प्रकारची मृदा आढळून येते. मृदासंपत्ती हा पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा विषय आहे.त्याच बरोबर भारतातील मृदासंपत्ती माहिती हा राज्यसेवा पूर्वपरीक्षा व महाराष्ट्र लोकसेवा आयोग(Mpsc) यांच्या परीक्षेत सुद्धा महत्त्वाचा घटक आहे.म्हणून आज आपण भारतात कुठल्या प्रकारची मृदा आढळून येते? या मृदेने देशातील किती क्षेत्र व्यापलेले आहे व कुठल्या मृदा प्रकारात कुठली पिके घेतली जातात याची सविस्तर माहिती बगणार आहोत.

 मृदा म्हणजे काय?

मृदा म्हणजे जमिनीचा असा भाग जो खडकापासून वेगळा आहे,पण ज्यामुळे वनस्पतींना आधार मिळतो पूरक प्रमाणात पोषक अन्नद्रव्ये भेटतात.मृदा हि खडक,माती,खडे यापासून तयार होते.

माती कशी बनते?

मृदा निर्मिती हि नैसर्गिक प्रकिया आहे.हि प्रकिया मंद गतीने होत असल्यामुळे मृदानिर्मितीचा कालावधी खूप मोठा असतो .खडकाची हळू हळू झीज होते व कालांतराने त्यांचे बारीक कणात रूपांतर होते आणि मग त्या बारीक कणांपासून माती तयार होते.खडकाची झीज व्हायला खूप वेळ जावा लागतो.वातावरणात सतत होणारे बदल,ऊन ,वारा,थंडी यांचा दगडावर तसेच खडकावर परिणाम होतो व त्याची झीज होते.झीज झाल्याने खडकाला भेगा पडतात व खडक फुटतात व त्याचे बारीक कणात रूपांतर होऊन माती बनते.

भारतातील मृदेचे प्रकार

१) गाळाची मृदा :

गाळाची मृदा हि उत्तर महाराष्ट्रातील तापी-पूर्णा खोऱ्यात अधिक प्रमाणात आहे. या मृदेने देशातील ४५.६% (१५ लाख चौकिमी) क्षेत्र व्यापलेले आहे. फिकट पिवळ्या व करड्या रंगाची ही मृदा नदीखोरे व किनारी मैदानी प्रदेशात आढळते.गाळाच्या मृदेत वाळू, चिकणमाती व सेंद्रीय पदार्थांचे प्रमाण अधिक असते. तशेच या मातीत पालाश व चुना यांचे प्रमाण अधिक असते. गाळाची मृदा हि अत्यंत सुपीक असते गहू, हरभरा, तांदूळ, ऊस, तंबाखू इत्यादी पिकांसाठी योग्य असते. उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल या राज्यांत ही मृदा जास्त आढळते. हि मृदा नदीच्या गाळापासून तशेच सागरी किनारी सागरी लाटांमुळे तयार झाली आहे. त्यामुळे नदीकिनारी,किनारपट्टी भागात हि मृदा जास्त आढळते . मृदेची ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता जास्त असल्यामुळे यामध्ये उन्हाळ्यात सुद्धा शेती केली जाते त्याला वायंगण शेती असे म्हणतात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

२) रेगूर मृदा :

रेगूर मृदेने देशातील १६.६% (५.४६ लाख चौकिमी) क्षेत्र व्यापलेले आहे. महाराष्ट्र तसेच मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश यांच्या काही भागांत ही मृदा आढळते. दख्खन पठारावर प्रामुख्याने आढळणारी ही ‘काळी कसदार मृदा’ बेसाल्ट या अग्नीजन्य खडकापासून तयार झालेली आहे.रेगूर मृदेत पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता सर्वाधिक असते या मृदेत चुनखडी(चुना), पोटॅश, लोह, Ca, Mg यांचे अधिक्य, तर नायट्रोजन, फॉस्फरस व सेंद्रीय द्रव्ये कमी प्रमाणात असतात.’टिटॅनिफेरस मॅग्नेटाईट’ या द्रव्यामुळे या रेगूर मृदेस काळा रंग प्राप्त होतो. चिकनमातीचे प्रमाण अधिक असलेल्या व अधिक पाणी (ओलावा) धरून ठेवण्याची क्षमता असलेल्या या मृदेत कापसाचे पीक चांगले येते, म्हणून तिला ‘कापसाची काळी कसदार मृदा’ (Black Cotton Soil) असे म्हणतात. रेगूर मृदा हि दिसायला काळी असली तरीही या मृदेत जैविक घटकांचे प्रमाण कमी असते.

३) वालुकामय मृदा :

वालुकामय मृदेने देशातील.४.३२% (१.४२ लाख चौकिमी) क्षेत्र व्यापलेले आहे. वालुकामय मृदा पश्चिम व मध्य राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशात ही मृदा आढळते.
यामध्ये क्षारांचे प्रमाण सर्वाधिक तर सेंद्रीयता कमी असते. पाण्याच्या उपलब्धतेनुसार यात कापूस, हरभरा, ज्वारी, मका, बाजरी ही पिके घेतली जातात.

४) तांबडी मृदा :

तांबडी मृदेने देशातील १०.६% (३.५ लाख चौकिमी) क्षेत्र व्यापलेले आहे.अतिरिक्त पावसाच्या प्रदेशात हि मृदा आढळते. तांबडी मृदा फारशी सुपीक नसते ,त्यामुळे शेतीसाठी या मृदेचा उपयोग कमी होतो .विध्यन, कडाप्पा व आर्कियन काळातील ग्रॅनाइट, नीस खडकांच्या अपक्षयाने निर्मिती झालेली आहे .तमिळनाडू, गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश (पूर्वभाग), ओडिशा व छोटा नागपूरचे पठार या भागात प्रामुख्याने ही मृदा आढळते.या मृदेत सेंद्रीय द्रव्यांचे प्रमाण कमी असते. महाराष्ट्रात नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात आढळते. लोह संयुगाचे प्रमाण अधिक असल्याने या मृदेस तांबडा रंग प्राप्त होतो. तांदूळ, ऊस, कापूस, भुईमूग ही पिके या मृदेत घेतली जातात.

५) जांभी मृदा :

जांभी मृदेने देशातील ७.५% (२.४८ लाख चौकिमी) क्षेत्र व्यापलेले आहे. अति पावसाच्या प्रदेशात खडकांचे झालेले विदारण मोठ्या प्रमाणात वाहून जाते .त्यामुळॆ मूळ खडक उघडा पडतो.खडकातील लोहाचे वातावरणातील प्राणवायूशी संयोग घडून रासायनिक क्रिया घडते .त्यातून हि मृदा निर्माण होते .यामध्ये चुना व सिलिकाचे प्रमाण कमी असते. २००० मिमीपेक्षा अति जास्त पावसाच्या प्रदेशात जांभी मृदा आढळते. (उदा. कोकण) लोह, जस्त व अॅल्यूमिनिअमचे प्रमाण अधिक असल्याने या मृदेचा रंग लाल असतो. द. महाराष्ट्र (कोकण), गोवा, कर्नाटक, केरळ, आसाम या राज्यांच्या डोंगराळ भागांत जांभी मृदा आढळते. शेतीच्या दृष्टीने निरुपयोगी अशा मृदेत काजू, कॉफी, रबर यांची लागवड केली जाते.

६) पर्वतीय मृदा :

पर्वतीय मृदेने देशातील ८.६७% (२.८५ लाख चौकिमी) क्षेत्र व्यापलेले आहे.हा मृदा प्रकार प्रामुख्याने हिमालय पर्वतात आढळतात .यातील जाड्याभरड्या खडकांच्या तुकड्यांमुळे या मृदेत पाणी टिकत नाही, म्हणून तिला अपरिपक्व मृदा असे म्हणतात. डोंगरऊतारावर सापडणाऱ्या या मृदेत चहाचे मळे फुलतात.

1 thought on “भारतातील मृदासंपत्ती माहिती : गाळाची,काळी,पर्वतीय,तांबडी मृदा”

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा