मुख्य कार्यकारी अधिकारी(CEO) संपूर्ण माहिती : Chief Executive Officer Information

मुख्य कार्यकारी अधिकारी(CEO) संपूर्ण माहिती : Chief Executive Officer Information

मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer Information) प्रशासन सेवेतील वरिष्ठ अधिकारी असतो.

• तरतूद : जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ च्या कलम (९४) नुसार प्रत्येक जिल्हा परिषदेसायक
मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) व एक किंवा अधिक उपमुख्य कार्यकारी अधिकारी (Dy. CEO)

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

• मुख्य कार्यकारी अधिकारी(CEO) ची निवड यु.पी.एस.सी.(Upsc) मार्फत होते. व नेमणूक संबंधित राज्य शासनाकडून होते.मुख्य कार्यकारी अधिकारीला (Chief Executive Officer Information) वेतन राज्याच्या निधीतून दिले जाते.

• जिल्ह्यातील गटविकास अधिकारी हे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली कार्यरत असतात.मुख्य कार्यकारी अधिकारी(CEO) वर नजीकचे नियंत्रण विभागीय आयुक्ताचे असते.

• मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) हे जिल्हा परिषदेचे कार्यालयीन व प्रशासकीय अधिकारी असतात.

• जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकार्‍यांवर नियंत्रण CEO चे असते.

• मुख्य कार्यकारी अधिकार्‍याचा राजीनामा मंजूर करण्याचा अधिकार राष्ट्रपतीस असतो.

• मुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषद व राज्यशासन तसेच जिल्हा परिषद व तज्ज्ञ प्रशासकीय अधिकारी वर्ग यामधील दुवा असतो.

• महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात वर्षातून दोन वेळा जिल्हा परिषदेच्या आमसभेचे नियोजन केले जाते.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO ) हि आमसभा बोलावितात.

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे(CEO ) अधिकार व कार्ये :

१) जिल्हा परिषद, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या समित्यांच्या बैठकांना उपस्थित राहणे.

२) जिल्हा परिषदेच्या वर्ग-१, वर्ग-२ च्या अधिकाऱ्यांच्या दोन महिन्यापर्यंतच्या रजा मंजूर करणे.

३) वर्ग -१, वर्ग -२ च्या अधिकाऱ्यांचे गोपनीय अहवाल लिहून शासनाकडे पाठविणे.

४) जिल्हा परिषदेच्या वर्ग -३ व वर्ग -४ च्या श्रेणीतील कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे.

५) अधिकारी वर्ग रजेवर असताना त्या जागी हंगामी नियुक्त्या करणे.

६) जिल्हा परिषदेच्या फंडातून (जिल्हा निधीतून) रकमा काढणे व त्यांचे वाटप करणे.

७) जिल्हा परिषदेच्या कोणत्याही अधिकाऱ्याकडून तो कोणत्याही कामाबद्दलची माहिती, अहवाल वा हिशेब मागवू शकते.

८) जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक तयार करून ते स्थायी समितीस सादर करणे.

९) जिल्हा परिषदेवर एकापेक्षा अधिक उपमुख्य कार्यकारी अधिकारी (Dy. CEO) असतात. त्यापैकी एकार
जिल्हा परिषदेचा सचिव म्हणून नियुक्ती करण्याचा अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांस आहे

१०) जिल्हा परीषदेतील महत्वाची कागदपत्रे मुख्य कार्यकारी अधिकार्‍याच्या ताब्यात असतात.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी (Dy. CEO) :

१) उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सचिव असतात.

२) जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिवदेखील उपमुख्य कार्यकारी अधिकारीच असतो.

३) उपमुख्य कार्यकरी अधिकार्‍याची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत होते व नेमणूक राज्यशासन करते.

४) उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍याचा राजीनामा मंजूर करण्याचा अधिकार राष्ट्रपतीस असतो.

५) जिल्हा परिषदेचा सचिव हा उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतो.

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा