ग्रामपंचायत बद्दल संपूर्ण माहिती : Gram Panchayat Mahiti Marathi Language

ग्रामपंचायत बद्दल संपूर्ण माहिती : Gram Panchayat Mahiti Marathi Language

ग्रामपंचायत बद्दल संपूर्ण माहिती : १) मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कायदा – 1958 कलम 5 मध्ये प्रत्येक गावासाठी एक ग्रामपंचायत स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे.ग्रामपंचायत ही ग्रामसभेची कार्यकारी समिती आहे. ग्रामपंचायत हा पचायत राज संस्थांचा पाया आहे.

२) मुबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ राज्यात १ जून १९५९ पासून लागू झाला.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ग्रामपंचायत बद्दल संपूर्ण माहिती

ग्रामपंचायतीची रचना : ग्रामपंचायत गावात स्थापन होण्यासाठी त्या संबंधित खेड्याची लोकसंख्या किमान ६०० असावी लागते. जर एखाद्या खेड्याची लोकसंख्या ६०० पेक्षा कमी असेल तर तेथे दोन-तीन खेड्यांची मिळून ‘ग्रुप ग्रामपंचायत’ बनते. डोंगरी भागात ग्रामपंचायत स्थापन होण्यासाठी गावची लोकसंख्या किमान ३०० असावी लागते.

ग्रामपंचायतीची कार्यकाल : ग्रामपंचायतीची कार्यकाल सर्वसाधारण स्थितीत ५ वर्षे (ग्रामपंचायतीच्या पहिल्या सभेपासून गणना) असतो.
राज्य शासन अपवादात्मक परिस्थितीत हा कार्यकाल एक किंवा सर्व ग्रामपंचायतींबाबतीत कमी-अधिक करू शकते. वाढीव कालावधी लक्षात घेता हा कार्यकाल साडेपाच वर्षांपेक्षा अधिक असू शकत नाही. ग्रामपंचायत सदस्य कार्यकाल 5 वर्ष इतका असतो परंतु त्यापूर्वी ते आपला राजीनामा देऊ शकतात. सरपंचाला राजीनामा द्यायचा असल्यास तो पंचायत समितीच्या सभापतीकडे देतो.उपसरपंच सरपंचाकडे देतो.

ग्रामपंचायतीच्या सभासदांची पात्रता : ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची पात्रता तो भारताचा नागरिक असावा.त्याच बरोबर त्याला 21 वर्ष पूर्ण झालेली असावीत. त्यानंतर त्याचे गावच्या मतदान यादीत नाव असावे.

ग्रामपंचायतीची सदस्यसंख्या : ग्रामपंचायतीची सदस्यसंख्या हि कमीत कमी (किमान) ७ व जास्तीत जास्त हि १७ असते.

गावची लोकसंख्यासदस्यसंख्या
६०० ते १५००
१५०१ ते ३०००
३००१ ते ४५००११
४५०१ ते ६०००१३
६००१ ते ७५०० १५
७५०१ हुन अधिक १७
ग्रामपंचायतीची सदस्यसंख्या

निवडणूक पद्धती : ग्रामपंचायतीची निवडणूक राज्य निवडणूक आयोग घेते.ग्रामपंचायत निवडणूक प्रत्यक्ष, प्रौढ व गुप्त मतदान पद्धतीने होते. ग्रापंपांचायतीच्या निवडणुकीत १८ वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तीस मतदार गणले जाते, व त्यास मतदानाचा अधिकार प्राप्त होतो.

आरक्षण : ग्रामपंचायतीची निवडणूक मध्ये काही जागा ह्या विशीष्ट प्रवर्गासाठी राखीव असतात.त्या खालीलप्रमाणे आहेत.

महिलांसाठी : एकूण सदस्यसंख्येच्या ५०% जागा ह्या महिलांसाठी राखीव असतात

अनुसूचित जाती-जमातींसाठी : संबंधित खेड्यातील एकूण लोकसंख्येशी असलेले अनुसूचित जाती-जमातींचे प्रमाण लक्षात घेऊन त्यांच्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून काही जागा राखीव ठेवल्या जातात.

नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी : एकूण सदस्य संख्येच्या २७% जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव असतात.
ग्रामपंचायतीचे वॉर्ड तहसिलदार घोषित करतात.
महत्त्वाचे : महिलांसाठी ५०% जागा राखीव असल्याने अनुसूचित जाती-जमाती व मागास प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागांमध्येदेखील संबंधित प्रवर्गातील महिलांसाठी ५०% जागा राखीव ठेवल्या जातात.

उमेदवारी : ग्रामपंचायत निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवाराने वयाची २१ वर्षे पूर्ण केलेली असावीत.
महत्त्वाचे : दोनपेक्षा अधिक अपत्ये असणाऱ्या उमेदवारांना आता ग्रामपंचायत (स्थानिक स्वराज्य संस्था) निवडणूक लढविता येत नाही.

पदाधिकारी : सरपंच, उपसरपंच. • ग्रामपंचायतीच्या निवडून आलेल्या सदस्यांना पंच असे म्हणतात.

• पूर्वी पंच आपल्यापैकी एका सदस्याची सरपंच म्हणून व दुसऱ्याची उपसरपंच म्हणून निवड करत असत ३ जुलै २०१७ च्या निर्णयानुसार सरपंचांची निवड आता प्रत्यक्षरित्या थेट जनतेतून केली जाते. म्हणजेच सरपंचांची निवड प्रत्यक्षरित्या जनतेतून, तर उपसरपंचांची निवड अप्रत्यक्षरित्या पंचांकडून होते.

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा