Major Ports in India : भारतातील प्रमुख बंदरे त्यांचे राज्ये व वैशिष्ट्ये : भारतातील प्रमुख बंदरांचे प्रामुख्याने दोन भागांमध्ये विभाजन होते .ते खालीलप्रमाणे आहे.
- पूर्व किनाऱ्यावरील बंदरे
- पश्चिम किनाऱ्यावरील बंदरे
अ) पूर्व किनाऱ्यावरील बंदरे (तुतीकोरीन, एनोर, चेन्नई, विशाखापट्टणम्, परद्वीप, हल्दिया, कोलकाता.)
१) राज्य | प्रमुख बंदरे | वैशिष्ट्ये |
२) तमिळनाडू | तुतिकोरीन, चेन्नई, एन्नोर | एन्नोर भारतातील पहिले कॉर्पोरेटाइज्ड बंदर चेन्नई हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे बंदर आहे . |
३) आंध्र प्रदेश | विशाखापट्टणम् | भारताचे सर्वांत खोल, भूबंदिस्त व उत्तम नैसर्गिक बंदर येथून जपानला कच्चे लोखंड निर्यात |
४) ओडिशा | परद्वीप | कच्चे लोखंड निर्यात |
५) प. बंगाल ६) अंदमान-निकोबार | कोलकाता हल्दिया (पहिले हरित बंदर) पोर्ट ब्लेयर | हुगळी नदीवर, गाळामुळे व्यवस्थापनावर मर्यादा, व्यापारी महत्त्व कोलकत्ता बंदरावरील ताण कमी करण्यासाठी विकसित ,व्यापारी महत्त्व. सौदी अरेबिया-सिंगापूर,US-सिंगापूर जलमार्गाशी संलग्न |
• पहिले हरित बंदर : २५ जून २०१५ रोजी पश्चिम बंगालमधील हल्दिया हे भारताचे पहिले हरित बंदर (Green Port) बनले आहे. येथे बायोडिझेलची निर्मिती केली जात असून बंदराशी संबंधित रेल्वे, ट्रक इत्यादी वाहनांमध्ये ते इंधन म्हणून वापरले जाते. येथील ईमामी ॲग्रोटेक प्लान्टमध्ये पामतेलापासून बायोडिझेल निर्मिती केली जाते.
ब) पश्चिम किनाऱ्यावरील बंदरे (कांडला, न्हावाशेवा, मुंबई, मार्गागोवा, मंगळूर, कोची)
राज्ये | प्रमुख बंदरे | वैशिष्ट्ये |
केरळ | कोची ,अलेप्पी ,कालिकत | कोची हे उत्कृष्ट नैसर्गिक बंदर, पेट्रोलियमच्या आयातीसाठी वापर कालिकत कोची बंदरास ‘अरबी समुद्राची राणी’ म्हणतात. |
महाराष्ट्र | मुंबई JNPT- न्हावाशेवा | भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर,भारतातील सर्वात मोठे बंदर देशाच्या तुलनेत ८% मालवाहतूक, युरोपला सर्वात जवळचे बंदर, भारताचे प्रवेशद्वार. संगणकीकृत बंदर (मुंबई बंदरावरील ताण कमी करण्यासाठी) |
गोवा | मार्मागोवा | लोह खनिज व बॉक्साईटची निर्यात |
कर्नाटक | नवे मंगरूळ | येथून कुद्रेमुख प्रकल्पातील कच्चे लोखंड इराणला निर्यात होते. |
गुजरात | कांडला, ओखा | खनिज तेल, मीठ, सिमेंट, खते, धान्य यांची ने-आण. कांडला हे मुक्त बंदर (Free Port) म्हणून ओळखले जाते. (१७% व्यापार) |
• गुजरातमधील ‘पिपावाव’ येथे भारतातील सर्वात मोठे जहाजबांधणी केंद्र (शिपयार्ड) विकसित केले आहे.
• ‘शिपिंग कार्पोरेशन ऑफ इंडिया लि.’ (स्थापना : १९६१) या सार्वजनिक निगमामार्फत जहाजवाहतुकीचे नियंत्रण केले जाते.
• एन्नोर हे देशातील १२ वे व सहकारी (कार्पोरेट) क्षेत्रातील पहिले भारतीय बंदर २००३ मध्ये राष्ट्रास अर्पण.
• १ जून २०१० : अंदमान-निकोबारमधील पोर्ट ब्लेअर हे देशातील १३ वे मोठे बंदर सुरू झाले.
• १० जानेवारी २०१९ : कांडला (गुजरात) ते तुतीकोरिन (तामिळनाडू) दरम्यान कंटेनर जलप्रवास सुरु.
Nice
Good