मुस्लिम लीगच्या स्थापना ,१९०६

प्रास्ताविक

• राष्ट्रवादाच्या विकासाबरोबरच, १९ व्या शतकाच्या अखेरीस सांप्रदायिकतेचाही (communalism) विकास झाला. या सांप्रदायिकतेने भारतीय जनतेच्या एकतेला तसेच राष्ट्रीय चळवळीला सर्वात मोठा धोका निर्माण केला.

• सांप्रदायिकता म्हणजे काय?: सांप्रदायिकता ही मूलतः एक विचारसरणी (ideology) आहे. सांप्रदायिक दंगे हा त्या विचारसरणीच्या प्रसाराचा केवळ एक परिणाम आहे. सांप्रदायिकता म्हणजे असा विश्वास की, एकाच धर्माचे आचरण करणाऱ्या व्यक्तींचे सामाईक धर्मनिरपेक्ष (सामाजिक, राजकीय,आर्थिक) हितसंबंध असतात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सांप्रदायिक विचारसरणीचे भारतात तीन टप्पे आढळून आलेः

१) प्रथम असा विचार मांडण्यात येऊ लागला की, भारतातील हिंदू, मुस्लिम, शिख आणि ख्रिश्चन हे स्पष्टपणे विभिन्न समुदाय आहेत. एका धर्माच्या सर्व अनुयायिंचे केवळ धार्मिकच नव्हे, तर धर्मनिरपेक्ष हितसंबंधही सारखेच असतात. त्यामुळे भारत हा संपूर्ण राष्ट्र नाही व तसेच तो तसे होऊही शकत नाही. भारतात केवळ हिंदू राष्ट्र, मुस्लिम राष्ट्र इत्यादी असू शकतात. म्हणजेच,भारत हा केवळ विविध धार्मिक समुदायांचे एकत्रिकरण आहे.

२) सांप्रदायिक विचारसरणीचा दुसरा टप्पा म्हणजे असा विश्वास की, एका धर्माच्या अनुयायिंचे सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक व राजकीय हितसंबंध दुसऱ्या धर्माच्या अनुयायिंच्या या हितसंबंधापेक्षा वेगळे व विरोधी असतात.

३) सांप्रदायिकतेचा तिसरा टप्पा तेव्हा येतो जेव्हा वेगवेगळ्या धर्मांचे किंवा धार्मिक समुदायांचे हितसंबंध परस्परविरोधी व संघर्षमय आहेत असे समजले जाते. या वेळी सांप्रदायिक विचारसरणीचे व्यक्ती असे मानू लागले की, हिंदू व मुस्लिमांचे धर्मनिरपेक्ष सारखे असू शकत नाही, त्यामुळे त्या हितसंबंधांमध्ये परस्पर संघर्ष निश्चतपणे निर्माण होईलच

मुस्लिम लीगच्या स्थापनेची पार्श्वभूमी (Background)

मुस्लिम लीगच्या स्थापनेची पार्श्वभूमी (Background)
• १८५७ च्या उठावानंतर ब्रिटिशांनी मुस्लिमांप्रती अत्यंत कठोरता दर्शविली. त्यामुळे त्यांच्या मनात ब्रिटिशांविषयी जबरदस्त असंतोष होता. म्हणूनच त्यांनी इंग्रजी शिक्षणाकडेही दुर्लक्ष केले.मुस्लिमांची धार्मिक पुनरूज्जीवनाची ‘वहाबी चळवळ’ ही ब्रिटिशांनी दडपून टाकली.

• मात्र नंतर मुस्लिमांमध्ये जागृती होऊ लागली. काही मुस्लिम नेते पाश्चिमात्य शिक्षणाचा पुरस्कार करू लागले. खऱ्या अर्थाने या मुस्लिम समाजाला जागृत करण्याचे कार्य सर सय्यद अहमद राष्ट्रीय खान यांनी केले. मात्र प्रथम राष्ट्रवादी विचारांचे असलेले सय्यद अहमद खान हे थिओडोर बेक (अलिगढच्या मुस्लिम अँग्लोओरिएंटल कॉलेजचे प्राचार्य) यांच्या प्रभावाखाली येऊन इंग्रजांना धार्जिणे तसेच हिंदू व काँग्रेसविरोधी बनले.

• पुढे काँग्रेसच्या काही मागण्या पूर्ण करण्यासाठी ब्रिटिश सरकारने १८९२ चा कायदा पारित केला. या कायद्याद्वारे मुस्लिमांना काहीच मिळाले नाही, या भावनेने त्यांच्यात खळबळ उडाली. मुस्लिांसाठी स्वतंत्र संस्था असावी या कल्पनेचे बीज याच काळात पेरले गेले. १८९३ मध्ये सय्यद अहमदांच्या प्रयत्नाने ‘मोहम्मदन अँग्लो-ओरिएंटल डिफेन्स असोसिएशन’ नावाची संस्था स्थापन करण्यात आली. त्यासाठी ब्रिटिशांचेही पाठबळ होतेच. परिणामी, हिंदू व मुस्लिमांमधील अंतर वाढण्यास सुरूवात झाली. याचा सुमारास टिळकांनी सुरू केलेले गणेशोत्सव व शिवाजी उत्सव, तसेच आर्य समाजाच्या शुद्धिकरण आंदोलनानेही त्यात भर घातली.

• १८९६ च्या सुमारास मुस्लिमांच्या असोसिएशनने मागणी केली की, मुस्लिमांसाठी स्वतंत्र/विभक्त मतदारसंघ असावे. या मार्थिक मागणीच्या पूर्ततेसाठी मुस्लिमांची वेगळी राजकीय संस्था असावी, हा विचार जोर धरू लागला. पुढे लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी करून मुस्लिम बहुसंख्यांक पूर्व बंगाल प्रांत निर्माण केल्याने ब्रिटिश आपल्या पाठीशी आहेत, असे कळल्याने वरील विचार प्रत्यक्षात येण्यास अनुकूलता निर्माण झाली

सिमला शिष्टमंडळ (Simla Deputation)

सिमला शिष्टमंडळ (Simla Deputation)
• २० जुलै, १९०६ रोजी भारतमंत्री जॉन मोर्ले यांनी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये भारतीय अर्थसंकल्पावर बोलतांना असे सूचित केले की, ब्रिटिश सरकार कायदेमंडळातील जागांची संख्या व कायदेमंडळाचे अधिकार वाढविण्याच्या विचारात आहे. या घोषणेमुळे भारतीय मुस्लिमांच्या मनात हिंदू वर्चस्वाची शंका निर्माण झाली. त्यामुळे आपले हितसंबंध जपण्यासाठी मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ असावे, अशी खात्री त्यांना झाली.

• ही मागणी व्हाईसरॉय लॉर्ड मिंटो यांच्याकडे करण्यासाठी ऑगस्ट १९०६ मध्ये मोहसिन-उल-मुल्क (अलिगढच्या मोहम्मदन अँग्लो-ओरिएंटल कॉलेजचे सेक्रेटरी) यांनी कॉलेजचे प्राचार्य विल्यम आर्कबोल्ड (WilliamArchbold) यांच्या मध्यस्तीने प्रयत्न केले. लॉर्ड मिंटोने संमती दिल्यानुसार ३५ मुस्लिमांच्या शिष्टमंडळाने १ ऑक्टोबर, १९०६ रोजी लॉर्ड मिंटोची सिमला येथे भेट घेतली.

• या शिष्टमंडळाचे नेतृत्व सर आगाखान करीत होते. त्यात भारताच्या विविध भागातील मुस्लिमांचे प्रतिनिधी होते. शिष्टमंडळाने सय्यद हुसेन बिलग्रामी यांनी तयार केलेले विज्ञापन (memorial) लॉर्ड मिंटोस सादर केले. त्यामध्ये ब्रिटिश राजसत्तेप्रती एकनिष्ठा दर्शवून नवीन सुधारणा देऊ केल्याबद्दल आभार मानण्यात आले, मात्र कायदेमंडळातील जागांसाठी ‘निवडणुकीचे तत्व’ लागू केल्यास मुस्लिमांचे हितसंबंध धोक्यात येतील अशी भिती वर्तविण्यात आली. त्यामुळे त्यांनी स्वतंत्र मतदारसंघांची मागणी केली. त्यांची संख्या ठरवितांना मुस्लिमांच्या संख्याबठाचा विचार न करता त्यांचे राजकीय महत्व व त्यांनी ब्रिटिश साम्राज्याला दिलेल्या सेवांचा विचार करण्याची
मागणी करण्यात आली. त्याचबरोबर लोकसेवांमध्ये निश्चित कोटा, विद्यापीठांच्या सिनेटवर प्रतिनिधित्व, मुस्लि विद्यापीठाची स्थापना करण्यासाठी मदत इत्यादी मागण्याही
करण्यात आल्या.

• व्हाईसरॉय लॉर्ड मिंटाने मुस्लिमांच्या मागणीचे आनंदाने स्वागत केले व त्याबद्दल सहानुभूतीने विचार करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, मुस्लिम नेत्यांचा राजकीय संस्था स्थापन करण्याबाबत विचारविनिमय चालूच होता. त्यासाठी काही योजना तयार करण्यात आल्या. उदा. मुहम्मद शफी यांनी ‘मुस्लिम लीग’ या मुस्लिम
नावाने, तर नवाब सलीमउल्ला यांनी ‘ऑल इंडिया मुस्लिम कॉन्फेड्रसी’ या नावाने संस्था स्थापन करण्याची योजना जाहीर केली.

मस्लिम लीगची स्थापना (Establishment of Mali


मस्लिम लीगची स्थापना (Establishment of Mali

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा