● राजपूत राज्ये (Rajput States)
• राजपूत राज्ये (Rajput States) : बरेच राजपूत घराणे विशेषतः अम्बर (Amber) आणि जोधपूरचे घराणे मुघलांच्या सेवेत होते. त्यामुळे त्यांना त्यांच्या वतन जागिरीवर मोठ्या प्रमाणात स्वायत्तता प्राप्त होती. पुढे १८ व्या शतकात मुघल सत्तेच्या वाढत्या दुर्बळतेचा फायदाराजपुतान्यातील मुख्य राजपूत राज्यांनी घेतला. त्यांनी मुघलांचे नियंत्रण झुगारून दिले आणि आजुबाजुच्या प्रदेशात आपले
वर्चस्व वाढविण्याचा प्रयत्न केला. जोधपूरचा राजा अजित सिंह मुघल दरबारातील गटबाजीच्या राजकारणातही सामील होता.
• या प्रभावशाली राजपूत घराण्यांनी गुजरात व माळवा या सुभ्यांच्या सुभेदारीवर दावा केला. जोधपूरचा राजा अजित सिंह याला गुजराथची सुभेदारी, तर अम्बरच्या सवाई राजा जयसिंह याला
माळव्याची सुभेदारी प्राप्त झाली. फारूक सियार व मुहम्मद शाहाच्या काळातही त्यांची सुभेदारी कायम राहिली.
• मात्र राजपुतान्यातील राज्ये पूर्वीप्रमाणेच विभागलेली राहिली. त्यांच्यापैकी मोठ्या राज्यांनी आजुबाजुच्या दुर्बळ राजपूत व गैर-राजपूत राज्यांवर कब्जा करून आपला विस्तार करण्याचा प्रशत्न केला. उदा. जोधपूरने नागौर जिंकून घेतले, तर अम्बरने
बुंदी राज्याचा मोठा प्रदेश काबिज केला. मोठ्या राजपूत राज्यांमध्ये लहानसहान भांडणे होती. तसेच त्यांचे अंतर्गतराजकारणही मुघलांच्या दरबाराप्रमाणे छलकपट व विश्वासघाताने भरलेले होते. उदा. जोधपूरचा राजा अजित सिंह याला त्याच्या स्वतःच्या मुलानेच ठार केले.
● राजा सवाई जयसिंह, दुसरा
• १८ व्या शतकातील सर्वात ठळक राजपूत शासक म्हणजे अम्बरचा राजा सवाई जयसिंह दुसरा (१६९९-१७४३) होय. सवाई जयसिंह हा एक मुत्सद्दी राजा होता. त्याने प्रयत्नपूर्वक आपल्या राज्याचा विस्तार घडवून आणला.
• त्याने १७२८ मध्ये स्वतःच्या नावाने जयपूर हे शहर वसविले. त्यानंतर अम्बर या जुन्या राजधानीचे महत्व कमी झाले व जयपूरचे महत्व वाढत गेले. जयपूरला एक प्रमुख राजपूत राज्य म्हणून महत्व प्राप्त झाले. (दलाराम हा जयसिंहाचा प्रमुख आर्किटेक्ट होता, ज्याने जयपूर शहराचा आराखडा तयार केला.)
• मात्र सवाई जयसिंह एक विज्ञान-पुरूष म्हणून अधिक प्रसिद्ध आहे, ते सुद्धा अशा काळात ज्यावेळी भारतीयांना वैज्ञानिक प्रगतीचा जवळजवळ विसर पडला होता.
• जयसिंहाचे सर्वात महत्वाचे कार्य खगोलशास्त्राच्या (astronomy) क्षेत्रात होते. त्याने दिल्ली, जयपूर, उज्जैन, वाराणसी आणि मथुरा येथे वेधशाळा (observatories) बांधल्या. त्यांमध्ये अचूक व प्रगत उपकरणे बसविली. त्यांपैकी काही त्याने स्वतः तयार केलेली होती. त्याची खगोलीय निरीक्षणे अत्यंत अचूक होती. त्याने लोकांनाही खगोलीय निरीक्षणे तयार करता यावी यासाठी झिच मुहम्मदशाही या नावाने एक कॅलेंडर किंवा सारणींचा संच (aset of tables) तयार केला. त्याने युक्लिडच्या ‘Elements of Geomerty’ या पुस्तकाबरोबरच
भूमितीशास्त्रावरील अनेक पुस्तके, आणि नेपियरचे बांधकाम व लॉगरिथमच्या वापरावरील पुस्तक संस्कृतमध्ये भाषतरित करून घेतले. जगन्नाथ भट हा एक मराठी खगोलशास्त्राचा तज्ज्ञ व्यक्ती जयसिंहाचा साथिदार होता.
• सवाई जयसिंह हा सुधारकही होता. त्याने मुलींच्या विवाहावर केला जाणारा प्रचंड खर्च कमी करण्यासाठी कायदा लागू करण्याचा प्रयत्न केला.
● जाट राज्य
• जाट ही एक शेतकऱ्यांची जात असून ते दिल्ली, आग्रा व मथुराच्या परिसरात राहात होते. औरंगजेबाच्या काळात १६६९ आणि १६८८ मध्ये जाट शेतकऱ्यांनी त्यांच्या जाट जमीनदारांच्या विरूद्ध उठाव केले. हे उठाव चिरडून टाकण्यात आले मात्र प्रदेश अशांत राहिला. त्यांचा नेता चुडामणच्या नेतृत्वाखाली त्यांनी दिल्लीच्या पश्चिमेकडील प्रदेशावर नियंत्रण मिळविले. १७ व्या शतकाच्या अखेरीपर्यंत त्यांनी दिल्ली व आग्रा या दोन मुघल राजधानी शहरांदरम्यानच्या प्रदेशावर आपले वर्चस्व निर्माण
केले.
• औरंगजेबाच्या मृत्यूनंतरही त्यांची कृत्ये चालूच राहिली. त्याला जमीनदारांच्या नेतृत्वाखालील जाट बंडाचे स्वरूप प्राप्त झाले. दिल्लीच्या दरबारी कटकारस्थानांमध्येही त्यांनी स्वतःला अनुकूल
होईल अशा रीतीने भाग घेतला.
• अशा रीतीने चुडामण आणि बदान सिंह यांनी भारतपूरच्या जाट राज्याचा पाया घातला. पानिपत आणि वल्लभगड ही जाट राज्याची प्रमुख व्यापारी केंद्रे बनली.
● सुरजमल जाट (१७५६-१७६३)
• सुरजमल जाट (१७५६-१७६३): सुरजमल जाट याच्या नेतृत्वाखाली जाट राज्य वैभवतेच्या शिखरावर पोहोचले. त्याने १७५६ ते १७६३ दरम्यान राज्य केले. तो एक अत्यंत सक्षम प्रशासक आणि लढवय्या
असण्याबरोबरच अत्यंत हुशार मुत्सद्दीही होता. त्याने आपल्या राज्याचा विस्तार घडवून आणला. त्याच्या राज्यात आग्रा, मथुरा, मेरठ, अलिगड यांबरोबरच इतरही आजुबाजुचा प्रदेश होता. त्याने मुघलांच्या महसुली पद्धतीचे अनुसरण करून एका सक्षम राज्याचा पाया घातला. त्याला समकालिन इतिहासकाराने ‘जाटांचा प्लेटो’ (Plato of the Jat tribe) म्हणून गौरवले होते.
• मात्र सुरजमलच्या मुत्यूनंतर जाट राज्यास उतरती कळा लागली.राज्याचे विभाजन छोट्याछोट्या जमीनदारांमध्ये झाले. लूट हे त्यांचे प्रमुख माध्यम बनले.
Rajpu ghranacha rhasachi karne