◆ अवध ,हैद्राबाद व कर्नाटक माहिती : सादत खान बुन्हान-उल-मुल्क (१७२२-१७३९)
● १)सादत खान बुन्हान-उल-मुल्क (१७२२-१७३९) : अवध या स्वायत्त राज्याचा संस्थापक सादत खान बुन्हान उलमुल्क हा होता १७२२ मध्ये बादशाह मुहम्मद शाह याने त्याची नेमणूक अवधचा गर्व्हनर म्हणून केली. तेव्हापासून तो जवळजवळ स्वतंत्रपणे राज्य करू लागला. त्याने अनेक महसुली व लष्करी सुधारणा करून अवध राज्याला आर्थिक व राजकीयदृष्ट्या मजबूत केले. बंडखोर जमीनदारांचा बिमोड केला.
● त्याने हिंदू व मुस्लिमांमध्ये भेदभाव केला नाही. त्याचे बरेच कमांडर्स व उच्च अधिकारी हिंदू होते. त्याने जागीर व्यवस्था चालू ठेवली.
● १७३९ मध्ये त्याने काही अज्ञात कारणामुळे आत्महत्या केली. मात्र तोपर्यंत तो मुघलांपासून पूर्णपणे स्वतंत्र झाला होता. तसेच त्याने अवध प्रांत आपल्या वंशपरंपरेखाली आणला.
◆ २)सफदर जंग (१७३९-१७५४)
● २)सफदर जंग (१७३९-१७५४) : सफदरजंग हा सादत खानचा पुतण्या होता. त्याला १७५४ मध्ये
मुघल साम्राज्याचा वझीरही बनविण्यात आले. तेव्हापासून अवधच्या नवाबांना ‘नवाब वझीर’ असे संबोधण्यात येऊ लागले, कारण अवधचा नवाब हा मुघल साम्राज्याचा वझीर म्हणूनही काम करीत असे.
● त्याने रोहीले, जाट व मराठ्यांच्या विरूद्ध युद्धे लढून आपल्या राज्याचा विस्तार घडवून आणला.
◆ ३)शुजा-उद-दौल्ला (१७५४-१७७५)
● ३)शुजा-उद-दौल्ला (१७५४-१७७५) : शुजा उद्दौल्ला (सफदरजंगचा मुलगा) १७५४ मध्ये बंगालचा नवाब आणि मुघल साम्राजाचा वझीर बनला.
● त्याने बक्सारच्या लढाईत ब्रिटिशांच्या विरुद्ध भाग घेतला. मात्र पराभवामुळे त्याला कारा व अलाहाबाद ब्रिटिशांना सुपूर्द करावे लागले तसेच मोठी नुकसान भरपाई द्यावी लागली.
● १७७३ मध्ये त्याला वॉरन हेस्टिंगसोबत ‘बनारसचा तह करावा लागला. ही एक ‘संरक्षणात्मक युती’ (Defensive Alliance) होती. बनारसच्या तहाच्या महत्वाच्या अटी पुढीलप्रमाणे होत्याः
• i)अलाहाबाद व कोरा हे प्रदेश नवाबाला ५० लाख रूपयांना विकण्यात आले.
• ii)नवाबाने कंपनीचे सैन्य वापरण्यासाठी द्यावयाचे अनुदान ३०,००० रूपयांहून २,१०,००० रूपये प्रति माह इतके वाढवून देण्याचे मान्य केले.
• ii)नवाबाने कंपनीचे सैन्य रोहिल्यांच्या विरूद्ध वापरले तर ४० लाख रूपये अतिरिक्त द्यावे लागतील.
● १७७४ मध्ये त्याने ब्रिटिशांच्या मदतीने रोहिलखंड जिंकून घेतले.
◆ ४)असफ-उद-दौल्ला (१७७५-१७९७)
● ४)असफ-उद-दौल्ला (१७७५-१७९७) : त्याने गादीवर येताच १७७५ मध्ये ब्रिटिशांसोबत ‘फैजाबादचा तह केला. या तहाद्वारे:
• i)दोन्ही पक्षांनी शेतकऱ्यांना बंडखोरीसाठी चिथवू नये.
• ii)नवाबाने मीर कासिमला(बंगालचा भूतपूर्व नवाब) मदत न करण्याचे वचन दिले.
• iii)कारा व अलाहाबाद जिल्हे नवाबाच्या ताब्यात राहतील.
• iv)नवाबाच्या संरक्षणासाठी राजा चैत सिंहच्या ताब्यातील सर्व जिल्ह्यांचे (बनारस, गाझीपूर आणि जौनपूर) सार्वभौमत्व ब्रिटिशांना कायमस्वरूपी प्रदान करण्यात आले.
• v)ब्रिटिश लष्कर नवाबाबरोबरच ठेवल्यास त्याला रू.२.६ लाख प्रति माह ब्रिटिशांना द्यावे लागतील.
● नवीन नवाबासाठी हा तह महागात पडला. त्यामुळे राज्याचा खर्च वाढला मात्र महसूल कमी झाला.
● असफ उद्दोल्लाने १७७५ मध्ये आपली राजधानी फैजाबादहून लखनौला हलविली. १७८२ मध्ये वॉरन हेस्टिंगने असफ उद्दौल्लावर दबाव टाकून अवधच्या बेगमांकडून (असफची आई व आजी) पैसे उकळण्याचा प्रयत्न केला.
● ५)पुढे वझीर अली (१७९७-९८), सादत अली (१७९८१८१४), हैदर (१८१४-२७), अली शाह (१८३७-४१), नासिर उद्दिन हैदर (१८२७-३७), अमजद अली शाह (१८४२४७) आणि वाजिद अली शाह (१८४७-५६) यांनी अवधचे नवाब म्हणून राज्य कारभार केला. मात्र त्यांच्या हातात विशेष सत्ता राहिली नव्हती. सादत अलीने १८०१ मध्ये लॉर्ड वेलस्लीबरोबर ‘तैनाती फौजे’ चा तह केला, ज्यामुळे नवाबाच्या ताब्यातील निम्मा प्रदेश तैनाती फौजेच्या खर्चासाठी काढून घेण्यात आला.
◆ ६)वाजिद अली शाह (१८४७-५६)
● ६)वाजिद अली शाह (१८४७-५६)
रूपयांना वाजिद अलीच्या शाहाच्या काळात फेब्रुवारी १८५६ मध्ये लॉर्ड डलहौसीने गैरव्यवस्थापनाची सबब सांगून अवध राज्य खालसा केले. वाजिद अली शाहाला पेन्शन देऊन कलकत्त्याला धाडण्यात आले.
◆ हैद्राबाद (१७२४-१९४९)
● १)निझाम-उल-मुल्क असफ जाह (१७२४-१७४८) : हैद्राबाद राज्याची स्थापना निझाम-उल-मुल्क असफ जाह याने१७२४ मध्ये केली. त्याचे मूळ नाव चिनकिलिच खान असे होते. बादशाह फारूक सियारने त्याला निझाम-उल-मुल्क ही
पदवी बहाल केली. सय्यद बंधूंचा पाडव करण्यासाठी मदत केल्यामुळे फारूक सियारने त्याला दख्खनचा व्हॉईसरॉय बनविले होते. १७२० ते १७२२ दरम्यान त्याने दख्खनच्या प्रशासनात कार्यक्षमता आणून दख्खनवर आपले वर्चस्व निर्माण केले होते.
१७२२ ते १७२४ दरम्यान त्याला बादशाहा मुहम्मद शाहाने मोगल साम्राज्याचा वझीर बनविले. मात्र तेथिल दरबारी कटकारस्थानांना कंटाळून १७२४ मध्ये बादशाहाची संमती न घेताच तो दख्खनला परतला.
● दख्खनमध्ये त्याने हैद्राबाद राज्याची स्थापना केली. त्याने कधीही खुलेपणाने आपले स्वातंत्र्य घोषित केले नाही, मात्र प्रत्यक्षात त्याने स्वतंत्रपणेच राज्यकारभार केला. त्याला दंडित करण्यात अपयशी ठरल्याने मुहम्मद शाहाने त्याला दख्खनचा व्हाईसरॉय म्हणून कायम केले व ‘असफ जाह’ ही पदवी दिली.
● त्याने आपल्या राज्यात शांतता प्रस्थापित केली, मोगलांच्या जागीरदारी पद्धतीच्या धर्तीवर कार्यक्षम प्रशासन प्रस्थापित केले, शेती-उद्योगांचा विकास करण्याचा प्रयत्न केला, तसेच शक्तीशाली मराठ्यांना मर्यादेत ठेवले. त्याने हिंदूंप्रती सहिष्णुतेचे धोरण अनुसरले, उदा. त्याने पुरन चंद नावाच्या व्यक्तीला दिवाण बनविले. मात्र १७४८ मध्ये त्याच्या मृत्यूनंतर हैद्राबाद राज्य फुटीरतेच्या शक्तींना बळी पडले.
२)नासीर जंग (१७४८-५०), मुझफ्फर जंग (१७५०-५१) आणि सालाबत जंग (१७५१-६०)
नासीर जंगचा पराभव व खून मुझफ्फर जंगने घडवून आणला व तो फ्रेंचांच्या मदतीने निझाम बनला. मुझफ्फर जंग हा निझाम उल-मुल्कचा नातू व नासीरच्या बहिणीचा मुलगा होता. त्याचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर फ्रेंचांच्या मदतीने सालाबत जंग
सत्तेवर आला.
● मात्र निझामाच्या घराण्याचे अधिकृत इतिहासकार या तिघांना कर्नाटक स्वतंत्र शासक मानत नाही. त्यांच्या मते निझाम-उल-मुल्कचा कायदेशीर वारस पुढील शासक निझाम अली हा होता. तेव्हापासून १९४९ पर्यंत पुढील निझामांनी राज्य केले. निझाम
अली (१७६०-१८०३), सिकंदर जाह (१८०३-१८२९),
नासीर उद्दौल्ला (१८२९-५७), अफजल उद्दौल्ला (१८५७-६९),महाबत अली खान (१८६९-१९११), आणि उस्मान अली खान (१९११-१९४९).
ब्रिटिशांचे निझामाशी संबंध (British Relations with the
Nizam)
ब्रिटिशांचे संबंध निझामाशी (British Relations with The Nizam
● भारताच्या स्वातंत्र्यापर्यंत हैद्राबाद हे एक स्वतंत्र संस्थान राहीले. यादरम्यान बिटिश-निझाम संबंधांबद्दल महत्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे होतेः
- ब्रिटिशांनी १७५० मध्ये (दुसऱ्या कर्नाटक युद्धादरम्यान) हैद्राबादच्या राजकारणात पहिल्यांदा हस्तक्षेप केला. त्यांनी मुझफ्फर जंगच्या विरुद्ध नासीर जंगला मदत केली. मात्र हैद्राबाद दरबारातील फ्रेंचांच्या प्रभावामुळे त्यांना यश मिळाले नाही.
- ब्रिटिशांच्या वतीने कर्नल फोर्ड व सालाबत जंग यांमध्ये मैत्रीचा करार करण्यात आला. या करारास ‘मसुलीपट्टणमचा तह, १७५९’ असे म्हणतात.
- १७६६ मध्ये निझामाबरोबर हैद्राबादचा तह’ करण्यात आला. हा एक आक्रमक-संरक्षक तह (offensive-cum-defensive treaty) होता. या कराराद्वारे निझामाला दिलेल्या लष्करी
साहाय्याच्या बदल्यात ब्रिटिशांना पाच नॉर्दर्न सिरकार्स (एल्लूर, सिक्कोकोल, राजमंड्री, मुस्तफूरनगर आणि मुर्तीझानगर) मिळाले. - पहिल्या व दुसऱ्या इंग्रज-म्हैसूर युद्धात निझाम तटस्थ राहिला. मात्र तिसऱ्या व चौथ्या म्हैसूर युद्धात त्याने ब्रिटिशांना मदत केली.
- १७९८ मध्ये लॉर्ड वेलस्लीने निझाम अली बरोबर ‘तैनाती फौजेचा तह केला. १८०० मध्ये निझामाने तिसऱ्या व चौथ्या युद्धात काबीज केलेला प्रदेश हैद्राबादमध्ये ठेवण्यात आलेल्या
तैनाती फौजेच्या खर्चासाठी ब्रिटिशांना बहाल केला. - १८५३ मध्ये लॉर्ड डलहौसीने निझामाला तैनाती फौजेच्या खर्चाच्या बदल्यात बेरारचा प्रदेश देण्यास भाग पाडले.
◆ कर्नाटक (१७२० ते १८०१)
● कर्नाटक (Carnatic) हा मुघलांचा दख्खनमधील एक सुभा होता. औरंगजेबाने हा सुभा निर्माण केला होता. अरकॉट ही त्याची राजधानी होती. पुढे कर्नाटक हैद्राबादच्या निझामाच्या सत्तेअंतर्गत आला. मात्र ज्याप्रमाणे निझाम दिल्लीच्या नियंत्रणापासून स्वतंत्र झालेला होता त्याप्रमाणेच कर्नाटकचा डेप्युटी गर्व्हनर, ज्याला कर्नाटकचा नवाब असे संबाधले जात असे, हैद्राबादच्या नियंत्रणापासून स्वतंत्र बनलेला होता. रीतीने नवाब सादुतुल्लाह खान (१७१०-३२) याने १७२० च्या दशकात स्वतंत्र कर्नाटक राज्याची स्थापना केली. त्याने आपल्या पुतण्या दोस्त अली(१७३२-४०) याला निझामाची संमती न घेता आपला वारस नेमले आणि नवाब हे पदवंशपरंपरागत बनविले.
● १७४० मध्ये मराठ्यांनी दोस्त अलीला ठार केल्यानंतर त्याचा मुलगा सफदर अली नवाब बनला. त्यालाही त्याच्या नातेवाईकाने ठार केले. त्यामुळे निझामाने कर्नाटकच्या कारभारात हस्तक्षेप करून १७४३ मध्ये अनवर-उद-दिन याला नवाब बनविले.
● दुसऱ्या कर्नाटक युद्धादरम्यान १७४९ मध्ये अनवर-उद-दिनला फ्रेंचाच्या मदतीने ठार करून चंदा साहिब नवाब बनला, मात्र त्याला ब्रिटिशांचा मित्र असलेल्या तंजावरच्या राजाने ठार केले. त्यामुळे ब्रिटिशांनी १७५२ मध्ये अनवरचा मुलगा मुहम्मद अली
याला गादीवर बसविले. पुढे लॉर्ड वेलस्लीने १८०१ मध्ये शेवटचा नवाब ओम्दुत-उलउमरा याला पेन्शन देऊन (pensioned off) त्याचे राज्य
हस्तगत केले.