Good Manners information – शिष्टाचाराशी संबंधित माहिती

आभार मानण्याच्या पद्धती

आभार मानण्यासाठी साधारणपणे thanks किंवा thank you म्हणतात.
Thanks चा उपयोग थोडा अनौपचारिक समजला जातो. Thanks आणि Thank you सोबत आणखी शब्द वाढवले जाऊ शकतात. जसे,
• Thanks a lot /Thanks a million / Many thanks. Thank you very much / Thank you very much indeed.
Thank you so much.
किंवा आभार मानण्याचे कारण सोबत जोडले जाऊ शकते. जसे,
• Thank you (very much) for your help / for your guidance / for
the present.

• Thankyou/Thanks चे उत्तर खालीलप्रमाणे दिले जाऊ शकते :(You are) welcome / That’s okay/That’s all right/ (Oh) not at all / Don’t mention it/ (That’s / It’s) my pleasure.

दीलगिरी व्यक्त करण्याच्या पद्धती

● आपल्याकडून एखादी चूक झाली, एखाद्याला (चुकून) आपला धक्का लागला, किंवा आपल्याकडून एखाद्याला काही त्रास झाला तर आपण त्याला Sorry/lam (very/extremely/really/awfuily) sorry/Excuse me/Pardon (me) असे म्हणू शकतो.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

• Sorry, Excuse me, Pardon me यांच्यासोबत माफी मागण्याचं कारणही आपण जोडू शकतो. जसे, (I am) sorry I am late / Excuse me for being late.
• दीलगिरी व्यक्त करणाऱ्या वाक्याला किंवा शब्दाला खालीलप्रमाणे प्रतिसाद देता येईल :
(That’s / It’s) All right /No problem /No matter / Never mind.

शुभेच्छा व्यक्त करण्याच्या पद्धती

खालीलप्रमाणे प्रसंगानुसार तुम्ही शुभेच्छा देऊ शकता :

एखाद्याच्या वाढदिवशी :(Wish you a) happy birthday / Many happy returns of the dayतुला असेच भरपूर आणि सुखाचे वाढदिवस लाभो!

नवीन वर्ष, दिवाळी, वगैरे सारख्या प्रसंगी :(Wish you a) Happy Diwali! Happy New Year!

परीक्षा, स्पर्धा, मुलाखत वगैरे पूर्वी :All the best / Good luck / Best of luck.
(एखाद्याला निरोप देताना तो पुन्हा लवकर भेटणार नसेल तर त्यालाही All the best
म्हणता येईल.)

कोणी परीक्षेत पास झाला, कोणाला मूल झालं, वगैरे सारख्या परिस्थितीत :Congrats! / Congratulations! अभिनंदन !

एखाद्याला सुट्टीपूर्वी
Have a good holiday / Enjoy your holiday.

लांब प्रवासापूर्वी (प्रवासावर चाललेल्या व्यक्तीला तुम्ही असे म्हणू शकता) :Have a happy / safe / good journey!
तुझा प्रवास सुखाचा/सुरक्षित/चांगला होवो!

आता शुभेच्छेला उत्तर :- शुभेच्छा देणाऱ्या व्यक्तीला तीच शुभेच्छा (परत) दिली जात असेल तर तेव्हा आपण त्याला same to you असे म्हणू शकतो.
जसे, “Happy New Year
“Same to you’.

पण आपला वाढदिवस आहे, किंवा आपण प्रवासाला निघालो तेव्हा कोणी आपल्याला शुभेच्छा दिली तर तशा परिस्थितीत आपण शुभेच्छेला प्रतिसाद आभार मानून देतो, जसे.
Best of luck with your exams
Thank you (very much).

प्रकृतीबद्दल विचारपूस

● एखाद्याची तब्येत बरी दिसत नसल्यास आपण त्याला Are you all right? ( तू ठीक आहेस ना?) असे विचारू शकतो. एखाद्याच्या आजारपणाबद्दल आधीपासून कल्पना असल्यास त्याला Are you better? किंवा How are you feeling now? असे आपण विचारू शकतो.
एखाद्याने स्वत: आजारी असल्याबद्दल माहिती दिल्यास त्याला अशा प्रकारचे एखादे वाक्य सांगता येईल :- I hope you get better soon.

● एखाद्याच्या मृत्यूबद्दल ऐकल्यावर ही माहिती देणाऱ्याला असे म्हणू शकता:I am very sorry to hear about your father / brother वगैरे.

ओळख करून देताना

स्वत:ची ओळख करून देताना तुम्ही असे म्हणू शकता :Hello, I am Pravin, I work here. किंवा I am Pravin, your new neighbour.

दुसऱ्याची ओळख करून देताना असे म्हणता येईल :I would like you to meet my friend Pravin Patil
This is Mr. Patil from Mumbai.
This is my friend Pravin.

ओळख झालेल्या व्यक्तीला तुम्ही असे म्हणू शकता :Nice to meet you.
Pleased to meet you.
I am very pleased to meet you.

चहा वगैरे विचारण्याची पद्धत

● कधी कोणी आपल्या घरी आलं तर आपण त्याला चहा वैगरे विचारतो इंग्रजीत असाच चहा ,वगैरे पुढीलप्रमाणे विचारतात .

Would you like some tea?
चहा घ्याल का थोडा?/थोडा चहा घ्याल का आपण?

Will you have a glass of water?
Good night नाही. रात्रीची वेळ समजून तुम्ही Good night म्हणाल तर तो निघून लागायचं तर याच उत्तर हेच. म्हणजे Good morning च उत्तर Good morning, किंवा पाणी पाहिजे का आपल्याला?/पाणी घ्याल का आपण?
अशा प्रकारच्या प्रश्नाला पुढीलप्रमाणे उत्तर देता येईल :

होकारार्थी उत्तर :- Yes, please.
नकारार्थी उत्तर :- No, thanks/ thank you.

Would you like a coffee or tea?
आपण चहा घ्याल की कॉफी?
अशा प्रश्नाला खालीलप्रमाणे उत्तर देता येईल :होकारार्थी उत्तर :- I would like a coffee, please.
नकारार्थी उत्तर :- No nothing / Nothing for me, thank you.

भेटल्यावर

Good morning / Good evening / Good afternoon.
मराठीतील ‘नमस्कार’ प्रमाणे हे शब्द एखाद्याला भेटल्याबरोबर बोलले जाऊ शकतात.
अर्थात वेळेप्रमाणे. पहा :Good morning (रात्री १२ ते दुपारी १२ पर्यंत)
Good afternoon (दुपारी १२ पासून सायंकाळ सुरू होण्याच्या आधीपर्यंत),
Good evening (दुपार संपल्यापासून (= सायंकाळपासून) मध्यरात्रीपर्यंत)
● टीप :- रात्री ११ वाजता तुम्ही कोणाला भेटले तरी त्याला Good evening म्हणायचं. Good night नाही .

आणि Good morning/ afternoon / evening यांचं उत्तर देण्याच्या बाबतीत सांगायचं तर याच उत्तर हेच .म्हणजे good morning चं उत्तर good morning .किंवा फक्त morning इतकीही म्हणता येईल.

निरोप घेताना

● निरोप घेताना सरळ goodbye म्हणण्यापूर्वी सभयतेचा भाग म्हणून पुढील प्रकारचे

• एखादे वाक्य बोलतात :I think I had better be going now.
Well, I must leave now.
Nice to have met you.
अशा वाक्यासोबत त्या व्यक्तीने केलेल्या आदरतिथ्यासाठी आभार मानले जाऊ शकते .
Thanks very much / Thank you for the tea / Thank you for dinner
(आभार व्यक्त करणाऱ्या वाक्याला कसं उत्तर द्यायचं ते आपण शिकलोच.)
यानंतर शेवटी अगदी निघताना असे म्हणता येईल :Bye /Good bye/Good day/Good night/so long/See you/See you tomorrow / Be seeing you / Have a good day.

आणखी काही शब्द आणि वाक्ये

Excuse me.
सभ्यपणे लक्ष वेधण्यासाठी अगर असहमती दर्शवण्यापूर्वी Excuse me म्हणतात. जसे,
Excuse me (Sir/Madam/Mr. Patil), but I think you are wrong.
Excuse me, is this seat empty?
Excuse me, is this your umbrella?
Excuse me, where is the post office?

थोडं जाऊ द्या / थोडं सरका/ थोडी जागा द्या अशा अर्थाने सुद्धा Excuse me म्हणता येईल, परिस्थितीनुसार ऐकणाऱ्याला अर्थ समजतोच.
चार लोकात शिकल्यास Excuse me म्हणता येईल.
(या Excuse me ला Bless you! असा प्रतिसाद दिला जाऊ शकतो.)
• सूचना :- एकटेच असताना मात्र Excuse me म्हणण्याची गरज नाही.

Hello
हा शब्द फोनवर किंवा लक्ष वेधण्यासाठी किंवा एखाद्याला भेटताना अगर एखाद्याचे स्वागत करताना वापरला जातो : Hello, I am Pravin speaking.
Hello, is there anyone inside?
Hello, (Rahul, how are you?)
Hello sir, can I help you?

● Hi
(बहुधा) ओळखीच्या लोकांना भेटल्यावर बोलायचा अनौपचारिक शब्द
Hi, how are you doing? Hi, Rahul! – Hi Pravin.
Hi, how are you?

How do you do?
एखाद्याने आपली ओळख दुसऱ्याशी करून दिल्यावर ओळख झालेल्या नवीन व्यक्तीला आपण How do you do? म्हणू शकतो. आणि ती व्यक्ती उत्तर म्हणून परत How do you do हेच वाक्य आपल्याला सांगू शकते.
• दुसऱ्या शब्दात:- ओळख करून दिली गेल्यानंतर ओळख झालेल्या दोन व्यक्ती एक दुसऱ्याला How do you do? म्हणू शकतात.

Pardon (me) / I beg your pardon.
१) माफी मागण्यासाठी माफ करा या अर्थाने Pardon (me) किंवा I beg your
pardon असे म्हणता येईल.
२) तुम्हाला एखाद्याचं बोलणं बरोबर ऐकू आलं नाही किंवा समजलं नाही तर तुम्ही त्याला कृपया पुन्हा सांगा या अर्थाने Pardon वगैरे म्हणू शकता.
३) तुमच्या मनाला लागणारी एखादी गोष्ट कोणी म्हटली तर तुम्ही पुढीलप्रमाणे त्याला Pardon वगैरे म्हणू शकता :

उदा :-Women usually are not expert drivers.
(स्त्रिया सहसा निष्णात वाहनचालक नसतात.)
हे वाक्य म्हणणाऱ्याला तुम्ही Pardon (me) असं म्हटलं तर या Pardon मधून असा अर्थ व्यक्त होतो की तुम्ही तसे बोलणाऱ्याच्या विचाराशी सहमत नाही किंवा तुम्हाला ते बोलणं आवडलं नाही.
४) चार लोकांमधे असताना सभ्य न समजली जाणारी एखादी कृती झाल्यास जसे ‘टेकर’ आल्यास Pardon म्हणतात.

● (I am) Sorry
माफी मागण्यासाठी/दीलगिरी व्यक्त करण्यासाठी होणारा sorry चा उपयोग आपण आधी बगीतला आहे .याच sorry बद्दल आणखी थोडी माहिती

• नकार देताना सभ्यपणा दाखवण्यासाठी (I am) sorry चा उपयोग केला जाऊ शकतो
जसे, Sorry, you can’t go in.
• मला वाईट वाटतंय या अर्थाने Sorry चा उपयोग केला जाऊ शकतो. जसे,
I am sorry, I can’t help you.

Cheers
१) (बहुधा दारू) प्यायला सुरुवात करण्यापूर्वी शुभेच्छा अगर मैत्री दर्शवण्यासाठी एक दुसऱ्याला cheers म्हणतात.
२) Cheers चा दुसरा अर्थ goodbye.
जसे, I will see you on Monday then, bye.
~ Cheers, see you.

Please
हा शब्द वाक्याला अधिक सभ्य व नम्र बनवण्यासाठी खालीलप्रमाणे वापरतात.
• May I see your licence please?
मी तुमचा लायसन्स पाहू शकतो का जरा?
• Please could I have a clean plate?
मला जरा एक स्वच्छ प्लेट मिळू शकेल का?
• Would you please open the door? / Would you open the door please?
दार उघडाल का जरा?
Where is the post office, please?
पोस्ट ऑफीस कुठे आहे, साहेब?
आनंदाने अगर सभ्यपणे होकार दर्शवताना Please हा शब्द वापरता येतो. जसे,
• Would you like another piece of cake? – (Yes), please.
• Shall we go to the zoo? Oh, yes please.
•May I bring my children with me?Please do.

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा