Adjectives in Marathi – English Grammar notes in Marathi
● १) साधारणपणे विशेषण नामापूर्वी वापरले जाते. जसे,
This car, my house, some books, either method, a brave man, a good book, the main point, an unhappy woman.
● २) पण बरीच गुणविशेषणे ( गुणदर्शक विशेषणे) be, become, seem, appear, वगैरे सारख्या क्रियापदानंतर सुद्धा वापरली जाऊ शकतात. जसे, He became rich. He looked unhappy. You seem happy.
● ३) विशेषण नामाआधी वापरले किंवा क्रियापदानंतर वापरले तरी विशेषणाचा अर्थ साधारणपणे सारखाच असतो. जसे,
नामापूर्वी वापर :- He is a rich man. (rich = श्रीमंत)
क्रियापदानंतर वापर :- He became rich. (rich = श्रीमंत)
● ४) पण एखाद्या वेळेस विशेषणाची जागा बदलली तर विशेषणाचा अर्थ बदलू शकतो. जसे,
He is my old friend (old = जुना).
My friend is old (old = वृद्ध).
He is a small farmer (small = छोटा).
The farmer is small (small = शारीरिकदृष्ट्या लहान).
● ५) काही विशेषणे फक्त क्रियापदानंतर येतात (म्हणजे नामाआधी येत नाहीत). अशी काही विशेषणे:-upset (अस्वस्थ, चितित),alive (जिवंत), alone (एक्य),asleep (झोपलेला), ashamed (खजील), afraid (भ्यालेला, भीती वाटत असलेला), afloat
(तरंगत असलेला), alike (सारखा), awake (जागा असलेला), sorry (दीलगीर).
• उदा. Guests are asleep. पाहुणे झोपलेले आहेत.
The man was alone. तो माणूस एकटा होता.
You are still alive. तू अद्याप जिवंत आहेस.
● ६) काही विशेषणे फक्त नामाआधीच येतात.
जसे, chief (प्रमुख), main (प्रमुख), principal (प्रमुख), utter (पूर्ण, पक्का), former (माजी), annual (वार्षिक),
initial (प्रारंभिक).
• उदा:- chief / principal characteristic, annual income, utter fool, former employer, initial information.
● क्रियापदाला -ing आणि -ed लावून तयार होणारा शब्द विशेषणाचे कार्य करू शकतो. खालील शब्दांच्या आधारे हा फरक स्पष्ट होईल :
१) confusing = गोंधळ उत्पन्न करणारा
confused = गोंधळलेला
२) annoying = चीड आणणारा
annoyed = चिडलेला
३) disappointing निराशाजनक
disappointed = निराश
४) amazing = आश्चर्यकारक
amazed = आश्चर्यचकित
५) boring = कंटाळवाणा
bored = कंटाळलेला
६) discouraging =हिम्मत खचविणारा
discouraged = हिम्मत खचलेला
७) encouraging = प्रेरणा देणारा
encouraged = प्रेरित
८) exhausting = पूर्ण दमवून टाकणारे
exhausted = पूर्ण दमलेला
९) frightening = भीतीदायक
frightened = भयभीत
● वरील उदाहरणांवरून -ing चा सर्वसाधारण अर्थ उत्पन्न करणारा/आणणारा व ed चा सर्वसाधारण अर्थ-लेला असा निघतो हे लक्षात येते.