◆ 50 Useful Sentences in English | लहान लहान उपयोगाची वाक्ये – English Grammar
● लहान लहान उपयोगाची वाक्ये
◆ १) Hey एखाद्याचे लक्ष वेधण्यासाठी हा शब्द वापरतात. साधारणपणे हा शब्द नम्र समजला जात नाही.
• Hey! What are you doing there?
अरे, तू तिथे काय करत आहेस?
• Hey you! / Hey! take your hands off my bike.
अरे, माझ्या सायकलवरून हात काढ,
• Hey, you with the hat – come here.
अरे, एऽ टोपीवाल्या – इकडे ये.
• Hey baldie – mind your language.
अरे टकल्या, तोंड सांभाळून बोल.
◆ २) The heck राग अगर आश्चर्य व्यक्त करण्यासाठी किंवा वाक्यावर जोर देण्यासाठी the heck चा उपयोग केला जातो. जसे,
• Where the heck have they gone – we ae already late?
कुठे गेले आहेत ते? आधीच उशीर झालेला आहे आपल्याला.
◆ ३) How/what about….
= कसं राहील?/बद्दल (तुझा) काय विचार आहे?
• How about tea?
चहा कसा राहील?
• What about going swimming?
पोहायला जाण्याबद्दल तुझा काय विचार आहे?
◆ ४) By the way एखादा नवीन विषय मधेच सुरू करताना किंवा एखादा नवीन प्रश्न मधेच विचारताना by the way वापरतात. जसे,
• I think we should take some rest now, by the way, what time is it?
मला वाटतं आता आपण थोडी विश्रांती घ्यायला पाहिजे, बरं, वाजले किती?
◆ ५) Talk / Speak of the devil एखाद्याचे नाव घेतल्याबरोबर अनपेक्षितपणे ती व्यक्ती हजर झाल्यास असे म्हणतात. जसे,
• I think Rahul will not come today. Oh, speak of the devil, here he is.
मला वाटतं राहूल आज येणार नाही. अरे, नाव घेतल्याबरोबर हजर झाला हा तर.
◆ ६) The devil चा उपयोग प्रश्नार्थी शब्दासोबत प्रश्नावर जोर देण्यासाठी केला जाऊ शकतो. जसे,
• What the devil are you doing in my room?
काय करत आहेस तू माझ्या खोलीत?
◆ ७) on earth प्रश्न विचारणाऱ्याला एखाद्या अनपेक्षित उत्तराची अपेक्षा आहे असे दर्शवण्यासाठी अगर आश्चर्य व्यक्त करण्यासाठी why, when, where, how आणि who या प्रश्नार्थी शब्दांसोबत on earth वापरतात. जसे,
• What on earth are you doing here in my room?
काय तरी करत आहेस तू इथे माझ्या खोलीत?
◆ ८) Hell राग व्यक्त करण्यासाठी अगर जोर देण्यासाठी खालीलप्रमाणे hell चा उपयोग
केला जातो.
• Oh, hell, I have broken my glasses.
…..माझा चश्मा फुटलाय.
• It’s a hell of a good book.
हे खूपच चांगलं पुस्तक या आहे.
• Where the hell are you going?
कुठे चाललास तू?
◆ ९) just a minute moment / second
एक मिनिट/एक सेकंद/एक मिनिट – एक मिनिट.
किंचित वाट पहायला सांगण्यासाठी किंवा दुसरा बोलत असताना आपल्याला मधेच काही बोलायचे असल्यास असे म्हणता येईल.
◆ १०) Kindly (बहुधा राग आलेला असला तरी) सभ्यता दर्शवण्यासाठी आज्ञार्थी वाक्यात वापरता येईल. जसे,
• Kindly give my book back.
कृपा करून माझं पुस्तक परत देऊन टाका.
◆ ११) You know विशेष अर्थपूर्ण नसलेला हा वाक्प्रचार बोलताना पुढे काय म्हणावं याचा विचार करताना किंवा एखाद्याला एखादी गोष्ट आठवायला मदत करताना वापरला जातो. जसे,
• You feel very bored, you know, when you have nothing to do.
माणसाला खूप कंटाळा येतो….जेव्हा करायला काहीच नसतं.
◆ १२) How do you like एखाद्याचे मत विचारताना कसं वाटलं? या अर्थाने याचा उपयोग केला जाऊ शकतो. जसे,
• How do you like our new house?
आमचं नवीन घर तुम्हाला कसं वाटलं?
◆ १३) There, there/Now, now सांत्वन करताना बोलतात. जसे,
• Now, now, don’t cry.
रडू नकोस, रडू नकोस.
◆ १४) What’sit called/what’s its, his, her, इ. name/what dyou call it
एखाद्या व्यक्ती अगर वस्तूचे नाव आठवत नसल्यास काय नाव त्याचं/ काय म्हणतात त्याला? अशा अर्थाने यांचा उपयोग होतो. जसे,
• Your friend, what’s his name, that tall one, had come here in the morning.
तुझा मित्र, काय नाव त्याचं, तो उंच बघ – सकाळी इथे आला होता.
• We have recently bought a machine, what’s it called – yes, a vacuum cleaner.
आम्ही आत्ताच एक मशीन विकत घेतली आहे, काय म्हणतात त्याला – हं, व्हॅक्यूम क्लीनर)
◆ १५) Pray आग्रहाची विनंती करताना वापरला जाणारा please या अर्थाचा औपचारिक शब्द
Pray let me go.
कृपया/कृपा करून मला जाऊ दे.
And when will you let me go, pray tell.
मला जाऊ केव्हा देशील – सांग जरा.
◆ १६) Same difference याचा वापर असे दर्शवण्यासाठी केला जाऊ शकतो की तुम्ही जे बोलले ते तंतोतंत बरोबर नव्हतं हे तुम्हाला मान्य आहे. पण फरक काही विशेष महत्त्वाचा नव्हता असंही तुम्हाला वाटतं. खालील संभाषण पहा :
•;He has bought a new car recently.
त्याने अलीकडे एक नवीन कार विकत घेतली आहे.
• Actually it is a van. व्हॅन आहे ती.
• Same difference. हो तेच,
◆ १७) well एखादे वाक्य सुरू करताना किंवा पुन्हा एखाद्या विषयाकडे परतताना पुढीलप्रमाणे
well चा उपयोग केला जातो. • उदा:Well, I must leave now.
बरं, मला आता निघायलाच पाहिजे.
• Well, let’s start now.
बरं, आपण आता सुरुवात करू या.
• Well then, let me leave now.
निघतो मी आता.
• Well now, what do you think should be done?
बरं आता, काय करायला पाहिजे असं तुला वाटतं?
• (Very) well, now that you insist so much, I will come.
बरं, ठीक आहे, तू आता एवढा आग्रह करत आहेस तर येईन मी.
◆ १८) In the world आश्चर्य व्यक्त करण्यासाठी किंवा वाक्यावर जोर देण्यासाठी खालीलप्रमाणे in the world चा उपयोग केला जाऊ शकतो :
• He doesn’t have a worry in the world.
कसलीच काळजी नाही त्या माणसाला.
• What in the world are you doing in the cupboard?
काय करत आहेस तू कपाटात?
◆ १९) Don’t be (so) silly.
मूर्खासारखं वागू नकोस.
◆ २०) Be your age / Act your age.
तुझ्या वयाला शोभेल असं वाग.
◆ २१) All right.
ठीक आहे/मला मान्य आहे.
◆ २२) Mind your own business, .
स्वत:चं काम बघ.
◆ २३) Hold your tongue.
तोंड सांभाळ.
◆ २४) I had a hunch that you would come today.
मला वाटलंच होतं तू आज येशील.
◆ २५) You are not fat at all – it’s all in the mind.
तू अजिबात लठ्ठ नाहीस – तसं वाटतंय तुला फक्त.
◆ २६) Mind your language.
तोंड सांभाळून बोल/नीट बोल.
◆ २७) Here, mind, you are standing on my foot!
अरे बघ, माझ्या पायावर उभा आहेस तू.
◆ २८) Wait a minute / Wait a moment …. I am just coming.
एक मिनिट – आलोच मी.
◆ २९) What’s all this nonsense?
काय आहे हा सगळा मूर्खपणा?
◆ ३०) You have spilt my tea… you nitwit!
माझा चहा सांडून टाकलास तू… मूर्खा!
◆ ३१) I will see you tomorrow morning, okay?
मी तुला उद्या भेटतो – ठीक आहे?
ठीक आहे मग, उद्या भेटू.
◆ ३३) Slow down! What is the rush?
जरा हळू घे/हळू हळू कर….. कसली घाई आहे?
◆ ३४) What is troubling you, dear?
काय त्रास आहे तुला बेटा?
◆ ३५) What’s your business here?
इथे तुझं काय काम आहे?
◆ ३६) It/This is not the case.
अशी गोष्ट नाही.
◆ ३७) Watch your language.
तोंड सांभाळून बोल.
◆ ३८) Are you going to help me – or what?
तू मला मदत करणार आहेस की काय म्हणतोस?/की काय विचार आहे तुझा?
◆ ३९) Okay, wise guy, if you are so damned smart, why don’t you do this yourself?
बरं, शहाण्या, तू इतका भलताच हुशार आहेस तर तू हे स्वत: का करत नाहीस?
◆ ४०) Get out of my sight.
तोंड काळं कर.
◆ ४१) Don’t get/act wise (with me).
(मला) शहाणपणा दाखवू नकोस.
◆ ४२) Idon’t care/who cares?
मला पर्वा नाही.
◆ ४३) Enough of this! / Enough is enough! I don’t want to hear this again.
आता पुरे/बस आता/खूप झालं… मला हे पुन्हा ऐकायचं नाही.
◆ ४४) That’s enough, Pravin, give that pen back to her.
आता पुरे / बस झालं, प्रवीण, तो पेन तिला परत दे.
◆ ४५) Welcome!
सुस्वागतम / (तुमचे) स्वागत आहे!
◆ ४६) Welcome to India.
भारतात तुमचे स्वागत आहे.
◆ ४७) Welcome on board.
विमानात तुमचे स्वागत आहे.
◆ ४८) Welcome aboard.
बोटीवर/जहाजात तुमचे स्वागत आहे.
◆ ४९) As you wish/prefer / like.
जशी तुझी इच्छा/मर्जी.
◆ ५०) (OK) see you around.
(बरं) भेटू पुन्हा.