◆ Passive Voice ची रूपे | Simple, Perfect Infinitive – English grammer
◆ Passive Voice ची रूपे
● Simple Infinitive (to be + क्रियापदाचे तिसरे रूप)
● Simple Infinitive (to be + क्रियापदाचे तिसरे रूप)
ज्याप्रमाणे infinitive च्या active voice च्या साध्या रूपाचा अर्थ करणे असा होतो (जसे, write = लिहिणे) त्याप्रमाणे Infinitive च्या passive voice च्या साध्या रूपाचा शब्दश: अर्थ केले जाणे असा होतो. (जसे, to be written = लिहिले जाणे).
• उदाहरणे पहा :
१) मुलांना शिष्टाचार शिकवणे (शिकवले जाणे) आवश्यक आहे.
It is necessary for children to be taught manners.
२) या गोळ्या जेवणानंतर घ्यायच्या आहेत.
These tablets are to be taken after a meal.
३) मला एकटं सोडलं जावं अशी माझी इच्छा आहे.
I desire to be left alone.
४) या खोलीला सजवण्याची गरज आहे.
The room needs to be decorated.
५) या घराला रंग देण्याची गरज आहे.
This house needs to be painted.
६) कित्येक गोष्टी करायच्या (=केल्या जायच्या) शिल्लक आहेत.
Several things remain to be done.
७) जेव्हाही काही काम करायचं असतं, तो नेहमी गायब होतो.
Whenever there is some work to be done, he always disappears.
◆ Perfect Infinitive (to have been + क्रियापदाचे तिसरे रूप)
● Perfect Infinitive (to have been + क्रियापदाचे तिसरे रूप)
Infinitive च्या या passive voice च्या रूपाचा शब्दश: अर्थ केले गेलेले असणे असा होतो (जसे, to have been written = लिहिले गेले असणे, to have been told = सांगितले गेलेले असणे). या रूपाचा वाक्यात वापर पहा: १) He is likely to have been killed in the riot.
तो दंगलीत मारला गेला असण्याची शक्यता आहे.
२) He seems to have been deceived.
त्याला फसवलं गेलं आहे असं दिसतं.
३) He seemed to have been deceived.
त्याला फसवलं गेलं होतं असं दिसलं.
● Only नंतर to + क्रियापदाचे पहिले रूप वापरून only नंतरची क्रिया नको असलेली किंवा निराशाजनक असल्याचे दर्शवले जाऊ शकते. जसे,
१) He got a job only to lose it the next day.
त्याला नोकरी मिळाली पण दुसऱ्याच दिवशी त्याची नोकरी गेली. (या वाक्यातून असा अर्थ व्यक्त होतो की नोकरी मिळून त्याला काही फायदा झाला नाही.)
2) He survived the earthquake only to die in the volcano.
तो भूकंपात वाचला पण ज्वालामुखीत मृत्यू पावला. (म्हणजे भूकंपात वाचून काही फायदा झाला नाही. शेवटी निराशाजनक/नको असलेली क्रिया घडलीच).
● इथपर्यंत infinitive चा अभ्यास करताना तुम्ही पाहिलं की infinitive सोबत to हा
शब्द वापरला जातो. पण काही परिस्थितीत infinitive सोबत to वापरले जात नाही. त्याबद्दल
थोडी माहिती:
१) वाक्यातील क्रियापद make, let, watch, see, feel किंवा hear असल्यास infinitive सोबत to वापरले जात नाही.
पहा :- He told me to sit here या वाक्यात infinitive सोबत to आहे. इथे वाक्यातील क्रियापद tell आहे. पण पुढील उदाहरणांमधे वरची क्रियापदे असल्यामुळे infinitive सोबत to आलेले नाही. पहा:
१) He made me sit here. .
त्याने मला इथे बसायला लावलं.
२) He let me sit here.
त्याने मला इथे बसू दिलं.
३) First watch me do it and then do it yourself.
पहिल्यांदा मला ते करताना बघ आणि मग स्वत: कर.४) I saw him go in.
मी त्याला आत जाताना पाहिलं. ५) I heard her go out.
तिच्या बाहेर जाण्याचा आवाज मला आला.
६) I felt someone touch me.
मला कोणीतरी स्पर्श केलेला जाणवला.
२) वाक्यातील क्रियापद make किंवा see असताना passive voice च्या वाक्यात मात्र infinitive सोबत to येते. जसे,
• He is made to cook.
पण She makes him cook; इथे cook सोबत to आलं नाही, कारण हे active voice चं वाक्य आहे.
• He was seen to go out. (पण I saw him go out.)
३) Let या क्रियापदासोबत मात्र active voice आणि passive voice दोघांमधेही
to नसलेले infinitive येते. उदा: He let me go (active voice). I was let go (passive voice).
४) वाक्यातील क्रियापद help असल्यास infinitive सोबत to वापरले किंवा नाही वापरले तरी दोन्ही प्रकारे बरोबर होईल.
उदा. This book helps you learn English. किंवा This book helps you to learn English.
५) पुढील प्रकारच्या वाक्यात सुद्धा to असलेले किंवा नसलेले infinitive येऊ शकते: उदा. AllI can do is (to) wait now.
The only thing we can do is (to) change ourselves.
६) do + nothing / anything / everything + but नंतर to नसलेले
infinitive येते.
उदा. I can do nothing but wait. You do nothing but complain.
● आता शेवटी to be चा एक उपयोग लक्षात घेण्यासाठी खालील रचना आणि
उदाहरणे पहा:- कर्ता + क्रियापद + कर्म + to be + नाम / विशेषण…
उदाहरणे :
१) मी त्याला यशस्वी समजत नाही.
I don’t consider him to be successful.
२) मी त्याला या नोकरीसाठी योग्य समजतो.
I consider him to be suitable for this job.
३) मी हे खूप महत्त्वाचं समजतो.
I consider this to be very important.
४)काही लोक ‘तेरा ला अशुभ आकडा समजतात.
Some people think ‘thirteen’ to be an unlucky number
५) मी त्याला अमेरिकन समजलो.
I thought him to be an American
६) त्याचं वय ५५ वर्षे असेल असा माझा अंदाज आहे.
I guess his age to be 55.
७) आमचा प्रतिनिधी म्हणून आम्ही त्याची निवड केली.
We chose him to be our representative.
८) तू त्याला स्वार्थी समजतोस का?
Do you think him to be selfish?
Passive Voice ची रूपे | Simple, Perfect Infinitive – English grammer