केवलप्रयोगी अव्यये – The Interjection | English Grammar in marathi
● केवलप्रयोगी अव्यये : The Interjection
● खाली काही प्रचलित केवलप्रयोगी अव्यये आहेत. सोबत त्यांचा अर्थ किंवा स्पष्टीकरण आहे. काही ठिकाणी ही केवलप्रयोगी अव्यये वाक्यात वापरून दाखवलेली आहेत.
१) Ah! = आश्चर्य, आनंद, दुःख, आवड, नावड दर्शवणारा उद्गार.
२) Aha! = आश्चर्य, व्यंग, विजय दर्शवणारा उद्गार.
३) Alas! (अलॅस) = दुःख, कीव व्यक्त करणारा उद्गार (= अरेरे/अरे अरे!)
४) (God) Bless me! / Bless my soul! / Well, I am blest! =आश्चर्य किंवा आनंद व्यक्त करणारा उद्गार.
५) (God) bless you! = सदिच्छा व्यक्त करणारा उद्गार.
६) Dear dear! / Dear me! / Oh dear! =
आश्चर्य, दुःख, सहानुभूती, निराशा, चीड दर्शवणारा उद्गार (उदा. Dear me, I have forgotten his phone number.)
७) Done! = ठीक आहे/ठरलं!
८) Eureka! (युरीका) = मला सापडलं! मला (जे पाहिजे होतं ते) मिळालं! मी (माझ्या प्रयत्नात) यशस्वी झालो! (या आशयाचा आनंददर्शक उद्गार).
९) God / Heaven forbid! = ते न घडो!
१०) Goodbye / Bye / Adieu! = येतो! (निरोप घेताना)
११) Gosh = आश्चर्य व्यक्त करणारा उद्गार (उदा. Gosh, Ihad never thought sol)
१२) Hell = राग, चीड व्यक्त करणारा उद्गार (उदा. Oh hell, I have lost my pursel)
१३) Hi (हाइ) = बहुधा ओळखीच्या लोकांना बोलायचा अभिवादनपर शब्द.
उदा. You have got 95 out of 100 marks – well done!
उदा. Hi, Rahul! / Hi, how are you? / Hi, Rahul, how are you?
१४) Hurrah/Hurray (हुरा/हुरे)
आनंद, आवड, पसंती व्यक्त करणारा उद्गार/
आरोळी उदा. “It is Sunday tomorrow”. ~ “Hurray!”
१५) Hush (हश) गप्प!/चूप!/शांत! (उदा. Hush, the baby is sleeping.)
१६) Gee (जी) = आश्चर्य किंवा उत्साह व्यक्त करणारा उद्गार.
१७) O(ओ) = अरे/हे (उदा. O God!)
१८) Oh (ओ) = आनंद, आश्चर्य, दुःख, निराशा, वगैरे व्यक्त करणारा उद्गार.
१९) Ooh (ऊ) = आश्चर्य, आनंद, पसंती, नापसंती, वगैरे व्यक्त करणारा उद्गार.
उदा. Ooh, I had never thought I would win this prize!
२०) Ouch (आउच) = अचानक आलेली कळ किंवा वेदना व्यक्त करणारा उद्गार.
उदा. Ouch, you are standing on my foot!
२१) Thank God / Thank goodness / Thank heaven(s) = एखादी
कठीण, त्रासदायक किंवा वाईट गोष्ट संपली किंवा टळली याचा आनंद व्यक्त करणारा उद्गार.
उदा. Thank God, he did not ask about it.Thank goodness, it is over at last.
२२) Wow (वाउ) = आश्चर्य किंवा स्तुतिदर्शक उद्गार (= अरे वाह) ,उदा. Wow! Is this your own car?
२३) Well done= शाब्बास! उदा : you have got 95 out of 100 – well done!
केवलप्रयोगी अव्यये – The Interjection | English Grammar in marathi