महाराष्ट्रावरील विशेष प्रश्न : सामान्य ज्ञान : police bharti
१. …. या दिवशी द्वैभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात आले होते. १ नोव्हेंबर, १९५६
२. सन १९६० मध्ये महाराष्ट्र राज्य स्थापन होत असतानाच मूळच्या द्वैभाषिक राज्यातून ….हेही स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले.
गुजरात
३. महाराष्ट्रातील दक्षिण-उत्तर पसरलेल्या…. पर्वतरांगेस ‘पश्चिम घाट’ असेही म्हणतात. सह्य
४. …. या महाराष्ट्राच्या उपराजधानीत विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन भरते.
नागपूर
५. नाशिक जिल्ह्यात गोदावरी नदीवर …. येथे बांधण्यात आलेल्या धरणातून नाशिक शहरास पाणीपुरवठा होतो. गंगापूर
६. अजिंठ्याचे डोंगर, हरिश्चंद्र डोंगररांगा, बालाघाट डोंगररांगा व महादेव डोंगररांगा या वास्तविक ….या पर्वताच्याच उपरांगा होत.
सह्य
७. राज्यात कोणत्या नदीच्या खोऱ्यात तंबाखूचे सर्वाधिक उत्पन्न काढले जाते?
कृष्णा
८.जलयुक्त शिवार अभियानाचा मुख्य उद्देश महाराष्ट्राला….पर्यंत पाणी टंचाई मुक्त करण्याचा आहे. सन २०१९
९. भारतातील एकूण साखर कारखान्यांपैकी सर्वाधिक कारखाने महाराष्ट्रात आहेत. किती टक्के? ३६ टक्के
१०.हे दोन महाराष्ट्राचे प्रमुख स्वाभाविक विभाग होत.
कोकण व पठार (देश)
११. कोकण किनारपट्टीत सापडणाऱ्या ‘जांभा’ या प्रकारच्या मातीत …. यांचे प्रमाण अधिक असते. लोह व जस्त
१२. महाराष्ट्राची सीमा खालील सहा राज्यांना भिडलेली आहे.
गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ,
तेलंगाणा, कर्नाटक व गोवा
१३. पूर्णा, वर्धा, पैनगंगा व वैनगंगा या…. भागातील प्रमुख नद्या होत.
विदर्भ
१४. ‘अहिराणी’ ही मराठीची उपभाषा किंवा बोलीभाषा प्रामुख्याने….या जिल्ह्यांत बोलली जाते. धुळे, नंदुरबार, जळगाव
१५. ‘रोशा’ जातीचे गवत राज्यात …. या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळते.
धुळे, नंदुरबार व जळगाव
१६. ‘कन्हान’, ‘वर्धा’ आणि ‘खोबरागडी’ या …. नदीच्या उपनद्या होत.
वैनगंगा
१७. एकूण लोकसंख्येशी असलेले नागरी लोकसंख्येचे प्रमाण लक्षात घेता महाराष्ट्राचा (४५.२२ टक्के) क्रमांक देशात तिसरा लागतो; तर या राज्याचा क्रमांक पहिला लागतो.
तमिळनाडू (४८.४० टक्के
१८. …. या नदीच्या खोऱ्यास ‘संतांची भूमी’ म्हणून संबोधले जाते.
गोदावरी
१९. राज्यातील….या जिल्ह्यांमध्ये बांबूची वने मोठ्या प्रमाणावर आढळून येतात.
चंद्रपूर व गडचिरोली
२०. विड्या तयार करण्यासाठी तेंदूची (टेंभुर्णीची) पाने वापरतात. तेंदूची झाडे…. या जिल्ह्यांतील वनांमध्ये विपुल प्रमाणावर आढळतात.
नागपूर, गोंदिया व भंडारा
२१. परकीय चलन मिळवून देणारा ‘हापूस’ जातीचा आंबा…. या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो.
रत्नागिरी व सिंधुदुर्ग
२२. राज्यातील हळदीच्या उत्पादनात अग्रेसर असलेले दोन जिल्हे, हे होत.
सातारा व सांगली
२३. ‘काटेपूर्णा’ व ‘नळगंगा’ या नदीच्या उपनद्या होत.
पूर्णा
२४. वैतरणा नदीवर बांधण्यात आलेल्या ….या धरणातूनही मुंबईला पाणीपुरवठा होतो. मोडकसागर
२५. तापी नदी महाराष्ट्रातील या जिल्ह्यांतून वाहत जाते. जळगाव, नंदुरबार व धुळे
२६. ….ही पर्वतरांग महाराष्ट्राच्या उत्तर सीमेस अनेक ठिकाणी छेदून वा स्पर्धेन गेलेली आहे. सातपुडा
२७….ही राज्यातील सर्वाधिक लांबीची नदी दक्षिणेची गंगा’ तसेच ‘वृद्धगंगा’ म्हणून ओळखली जाते. गोदावरी
२८. डिसेंबर, २०१८ अखेर राज्यात एकूण दूरध्वनी जोडण्यांची संख्या….इतकी होती. ४५.१० लाख
२९. महाराष्ट्राला प्रामुख्याने अरबी समुद्रावरून येणाऱ्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून पाऊस मिळतो. हा पाऊस साधारणतः….या कालखंडात पडत असतो. जून ते सप्टेंबर
३०. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आकर्षण वाटणारे पीक…. ऊस
३१. खनिज संपत्तीचा विचार करता महाराष्ट्रातील….
हा विभाग सर्वाधिक समृद्ध आहे.
विदर्भ
३२. महाराष्ट्र राज्याच्या पश्चिमेस…..पसरलेला आहे. अरबी समुद्र
३३. सह्य पर्वताची किंवा पश्चिम घाटाची निर्मिती….
मुळे झाली आहे.
प्रस्तरभंग
३४. राज्यातील किनारपट्टीच्या कोकण भागात…. प्रकारचा पाऊस पडतो.
प्रतिरोध
३५. सागाची झाडे…. प्रकारच्या अरण्यात आढळतात.
पानझडी वृक्षांची अरण्ये
३६. महाराष्ट्रात लाकूड-कटाईचे कारखाने (सॉ-मिल्स)….या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहेत.
चंद्रपूर, गडचिरोली व अमरावती
३७. महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील आदिवासी जमात…. माडिया-गोंड
३८. राज्यातील….या विभागात सर्वांत कमी वने आढळतात.
मराठवाडा
३९. महाराष्ट्र पठारावरील …. या सर्वांत मोठ्या डोंगररांगेने कृष्णा व भीमा या दोन नद्यांची खोरी वेगळी केली आहेत.
महादेव डोंगररांगा
४०. हरिश्चंद्र-बालाघाट’ या डोंगररांगेमुळे ….या नद्यांची खोरी एकमेकांपासून अलग झाली आहेत. गोदावरी व भीमा
४१. ‘गाविलगड’ व ‘नर्नाळा’ हे प्रसिद्ध किल्ले या पर्वतावर वसले आहेत.
सातपुडा
४२. अहमदनगर व नाशिक या जिल्ह्यांच्या सीमेवर, सह्य पर्वतावर वसलेले ‘कळसूबाई’ हे महाराष्ट्रातील सर्वोच्च पर्वत शिखर असून त्याची उंची….इतकी आहे.
१,६४६ मीटर
४३. अरुंद अशा कोकण किनारपट्टीची रुंदी….नदीच्या खोऱ्यात वाढलेली आहे.
उल्हास
४४……या जिल्ह्यांना पूर्वी ‘खानदेश’ म्हणून ओळखले जाई. धुळे, नंदुरबार व जळगाव
४५. बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान’….या नदीच्या काठी वसले आहे.
दहिसर
४६. नाशिकहून ठाणे जिल्ह्यात उतरताना……
हा घाट पार करावा लागतो.
कसारा
४७. ‘कस्तुरी’ मांजर राज्यात….जिल्ह्यांत आढळते.
रायगड व रत्नागिरी
४८. गांधीजींनी घालून दिलेले आदर्श व त्यांची तत्त्वे यांच्या माध्यमातून विकास साधण्याची उद्दिष्टे असलेली ‘वर्धा योजना’….या वर्षीच्या गांधी जयंतीपासून वर्धा जिल्ह्यात राबविली जात आहे.
१९८३
४९. एकोणिसाव्या पशुगणनेनुसार देशातील एकूण पशुधनात राज्याचा कितवा क्रमांक लागतो?
सहावा
५०, संजय गांधी निराधार अनुदान’ योजनेअन्वये पात्र व्यक्तीस दरमहा…. इतके आर्थिक साहाय्य देण्यात येते. रुपये ६००/५१.
५१.महाराष्ट्रातील…. या भागाचा उल्लेख यादवकालीन शिलालेखात ‘सेऊन देश’ असा केला गेला आहे.
खानदेश (धुळे, नंदुरबार, जळगाव)
५२. केंद्र शासनाने ‘अतिमागास’ म्हणून जाहीर केलेल्या महाराष्ट्रातील जमाती…. चंद्रपूर : माडिया-गोंड; यवतमाळ,
नांदेड : कोलाम; ठाणे, रायगड : कातकरी
५३. राज्यात या ….वर्षी कुटुंबकल्याण कार्यक्रमाची अंमलबजावणी जिल्हा परिषदांकडे सोपविण्यात आली. १९६६
५४….यांना राज्यातील ‘रोजगार हमी योजनेचे आद्यप्रवर्तक’ मानले जाते. वि.स.पागे
५५. हा रोजगार हमी योजनेचा जिल्हा स्तरावरील प्रमुख प्रशासक होय.
जिल्ह्याधिकारी
५६. ‘रोजगार हमी’ ही वैशिष्ट्यपूर्ण योजना राबविणारे महाराष्ट्र हे देशातील ….राज्य आहे.
पहिलेच
५७. महाराष्ट्रात रोजगार हमी कायदा’ संमत करण्यात आला २६ जानेवारी, १९७८
५८. रोजगार हमी योजनेखाली….वर्षे वयापुढील प्रौढ अकुशल मजुरांना रोजगाराची हमी देण्यात आली आहे. अठरा
५९. रोजगार हमी योजनेखाली मुख्यत्वे …. कामे उपलब्ध करून दिली जातात. श्रमप्रधान
६०. प्रौढ शिक्षण कार्यक्रम राज्यात कार्यान्वित केला गेला…. २ ऑक्टोबर, १९७८
६१. राज्यात सध्या बारावीपर्यंत सर्वांनाच मोफत शिक्षण देण्याचे उद्दिष्टित असले तरी, तत्पूर्वीपासून म्हणजे….पासूनच राज्यात मुलींना इयत्ता बारावीपर्यंत मोफत शिक्षण देण्याची योजना कार्यान्वित आहे.
१९८३-८४
६२. सावित्रीबाई फुले दत्तक-पालक योजनेचा लाभ इयत्ता ….पर्यंतचे शिक्षण पूर्ण होईतो मिळू शकतो.
आठवी
६३. सावित्रीबाई फुले दत्तक-पालक योजनेअंतर्गत मुलींना दत्तक घेऊन त्यांच्या शैक्षणिक गरजा भागविण्यासाठी त्यांना दरमहा रुपये…..दिले जातात ३०
६४. ….हा दिवस राज्यात ‘दृष्टिदान दिन’ म्हणून पाळण्यात येतो. १०जून
६५. ‘सावित्रीबाई फुले दत्तक-पालक योजना’ राज्यात सुरू करण्यात आली…. १९८३-८४
६६. सहकारविषयक पहिला कायदा देशात संमत केला गेला…. १९०४
६७. देशातील सहकारी चळवळीत आघाडीवर असलेले राज्य….
महाराष्ट्र
६८. देशातील एकूण औद्योगिक उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा सुमारे…….इतका आहे. २५ टक्के
६९…..या नव्या लोहमार्गाने मुंबई व नवी मुंबई रेल्वेद्वारा जोडली गेली आहे. मानखुर्द-बेलापूर
७०. राष्ट्रीय पोषण संस्थेने प्रतिवर्ष प्रतिव्यक्ती ….अंडी व….किलो मांस सेवनाची शिफारस केली आहे. १८०, ११
७१. महाराष्ट्रातील एकूण सिंचनक्षमतेपैकी ७० टक्के सिंचनक्षमता ….या पिकासाठी वापरली जाते
ऊस
७२. उद्योगधंद्यांच्या विकेंद्रीकरणाचे धोरण बऱ्याचशा कार्यक्षमतेने राबविले जात असले, तरी आजही….या पट्ट्यातच राज्यातील बहुसंख्य कारखानदारी एकवटलेली आहे.
मुंबई, ठाणे, बेलापूर, पुणे
७३…..हे महामंडळ राज्यात नवनवीन औद्योगिक क्षेत्रे विकसित करण्याच्या कार्याशी निगडित आहे. एमआयडीसी