प्रयोग व प्रयोगाचे प्रकार – मराठी व्याकरण – Voice in Marathi Grammar

Prayog in Marathi – मराठी व्याकरण समजण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे प्रयोग, या लेखात आपण मराठी व्याकरणातील प्रयोग (Voice in English )व त्याचे प्रकार बघणार आहोत. त्याचबरोबर परीक्षे मध्ये येणारे प्रश्न उदाहनारे बघणार आहोत.

मराठी व्याकरणातील प्रयोग समजण्यासाठी सर्व प्रथम आपण बघुया क्रियापद , कर्ता व कर्म म्हणजे काय बघा

प्रयोग म्हणजे काय – Prayog Meaning in Marathi

वाक्यात कर्त्याला किंवा कर्माला प्राधान्य दिल्यामुळे क्रियापदाचे रूप त्याच्याप्रमाणे बदलत असते. वाक्यातील कर्ता-कर्म-क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात.

प्रयोग हा शब्द संस्कृत ‘प्र-युज’ (= योग) यावरून तयार झाला असून त्याचा अर्थ ‘जुळणी’ किंवा ‘रचना’ असा आहे. प्रत्येक वाक्यात जे क्रियापद असते त्याच्या रूपाची ठेवण किंवा रचनाच अशी असते की, ते क्रियापद कधी कर्त्याचे किंवा कर्माचे लिंग, वचन किंवा पुरुष याप्रमाणे बदलते, तर कधी ते क्रियापद मुळीच बदलत नाही.

कर्त्यांची किंवा कर्माची क्रियापदाशी अशी जी जुळणी, ठेवण किंवा रचना असते, तिलाच व्याकरणात प्रयोग असे म्हणतात.

मराठी प्रयोगाचे प्रकार – Types

प्रयोगाचे मुख्य तीन प्रकार आहेत :

  • कर्तरी प्रयोग
  • कर्मणी प्रयोग
  • भावे प्रयोग

मराठी प्रयोग वरती सराव टेस्ट सोडवा

कर्तरी प्रयोग

पुढील वाक्ये पाहा.
(१) तो गाणे गातो.
(३) ते गाणे गातात.
(२) ती गाणे गाते.
(४) तू गाणे गातोस.

यातील पहिल्या वाक्यात ‘तो‘ हा कर्ता (Subject) आहे. ‘गाणे’ हे कर्म (Object) आहे आणि ‘गातो’ हे क्रियापद (Verb) आहे. या वाक्यातील प्रयोग ओळखण्यासाठी गातो हे क्रियापद कोणाप्रमाणे बदलते हे पाहणे आवश्यक आहे.

ते कर्त्याप्रमाणे बदलते की कर्माप्रमाणे बदलते, हे आपण शोधू या. त्यासाठी क्रमाने लिंग, वचन व पुरुष बदलून पाहू. असा बदल करताना एका वेळी एकच प्रकारचा बदल करणे आवश्यक आहे, हे लक्षात ठेवा.

वाक्य क्र. २ पाहा. ‘तो’ या पुल्लिंगी कर्त्याच्या ठिकाणी ‘ती’ हा स्त्रीलिंगी कर्ता ठेवला. त्याबरोबर ‘गातो’ हे क्रियापदाचे रूप बदलले व ते गाते’ असे झाले म्हणजे या वाक्यातील क्रियापद हे कर्त्यांच्या लिंगाप्रमाणे बदलते, असे ठरले.


वाक्य क्र. ३ पाहा. ‘तो’ या कर्त्याचे अनेकवचनी रूप ते ठेवले. त्याबरोबर क्रियापदाचे रूप ‘गातात’ असे झाले.


वाक्य क्र. ४ पाहा. कर्त्याचा पुरुष बदलून ‘तू’ हा द्वितीय पुरुषी कर्ता ठेवताच क्रियापदाचे रूप ‘गातोस’ असे झाले.

याचा अर्थ असा की, ‘तो गाणे गातो.’ या वाक्यातील ‘गातो’ हे क्रियापद कांचे लिंग, वचन व पुरुष यांप्रमाणे बदलले आहे म्हणजेच इथे क्रियापद हे कर्त्यांच्या तंत्राप्रमाणे चालते, म्हणून हा कर्तरी प्रयोग आहे.

कर्तरी प्रयोगात कर्ता हा आपली हुकमत चालवितो. कर्तरी प्रयोगात कर्ता हा धातुरूपेश (क्रियापदाच्या रूपावर अधिकार चालविणारा) असतो.

कर्तरी प्रयोगाचे प्रकार

  1. सकर्मक कर्तरी प्रयोग
  2. अकर्मक कर्तरी प्रयोग

सकर्मक कर्तरी प्रयोग : कर्तरी प्रयोगातील क्रियापद सकर्मक म्हणजे ज्यास कर्म आलेला असेल , तर त्यास सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणतात.

अकर्मक कर्तरी प्रयोग: कर्तरी प्रयोगातील क्रियापद हे अकर्मक म्हणजे कर्म नसेल त्यास अकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात.

उदा.
• ती गाणे गाते. (सकर्मक कर्तरी प्रयोग)
• ती घरी जाते. (अकर्मक कर्तरी प्रयोग)

कर्मणी प्रयोग

पुढील वाक्ये पाहा.

(१) मुलाने आंबा खाल्ला.
(२) मुलीने आंबा खाल्ला.
(३) मुलांनी आंबा खाल्ला.
(४) मुलाने चिंच खाल्ली.
(५) मुलाने आंबे खाल्ले.

वरील वाक्यात ‘मुलाने‘ हा कर्ता आहे. (वाक्य क्र. १) आता या वाक्यातील प्रयोग ओळखण्यासाठी कर्त्याचे लिंग व वचन बदलून पाहा. ‘मुलाने’ याच्याऐवजी ‘मुलीने‘ किंवा ‘मुलांनी‘ असा कर्ता बदलला, तरी क्रियापदाचे रूप ‘खाल्ला‘ असेच राहते. (वाक्य क्र. २ व ३ पाहा) कर्त्याच्या लिंगवचनाप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलत नाही, म्हणून हा कर्तरी प्रयोग नव्हे.


आता कर्माचे लिंग बदलून पाहा. ‘आंबा‘ ऐवजी ‘चिंच‘ हे स्त्रीलिंगी कर्म ठेवले, तर क्रियापदाचे रूप ‘खाल्ली‘ असे होईल. आता वचन (वाक्य ४ व ५) बदलून पाहा. ‘आंबे‘ हे कर्म झाले, तर ‘मुलाने आंबे खाल्ले.’ असे वाक्य होईल व त्यात क्रियापद ‘खाल्ले’ असे होईल म्हणजे या वाक्यात कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलते, म्हणून हा कर्मणी प्रयोग आहे.

कर्मणी प्रयोगात क्रियापद कर्माच्या तंत्राप्रमाणे चालते, म्हणजेच कर्म हा धातुरूपेश आहे.


कर्मणी प्रयोगात सकर्मक व अकर्मक असे दोन प्रकार असणार नाहीत. कारण कर्म असल्याशिवाय कर्मणी प्रयोग होणार नाही. या प्रयोगातील क्रियापद सकर्मक हवे.

कर्मणी प्रयोगाची खूण – कर्मणी प्रयोगात कर्म प्रथमान्त असते. कर्ता प्रथमान्त कधीच नसतो. कर्ता तृतीयान्त, चतुर्थ्यन्त,सविकरणी तृतीयान्त किंवा शब्दयोगी अव्ययान्त असतो..

कर्मणी प्रयोगाचे प्रकार

  1. प्रधानकर्तृक कर्मणी प्रयोग
  2. शक्य कर्मणी प्रयोग
  3. पुराण कर्मणी
  4. समापन कर्मणी
  5. नवीन कर्मणी / कर्मकर्तरी

(१) प्रधानकर्तृक कर्मणी प्रयोग :–  जेव्हा कर्ता प्रथम मानला जातो, या प्रयोगात क्रियापद हे लिंगवचनानुसार बदलत असले, तरी बहुतेक कर्ताच प्रधान असतो. त्यास प्रधानकर्तृक कर्मणी प्रयोग असे म्हणतात. वरील वाक्ये क्र.१ व २ ही याची उदाहरणे आहेत.

(२) शक्य कर्मणी प्रयोग :- जेव्हा कर्मणी प्रयोगतील वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ कर्त्यामध्ये ती क्रिया करण्याची शक्यता असल्यासारखा असतो, वाक्य क्र. ३ मध्ये शक्यता सुचविलेली आहे. यातील क्रियापद ‘शक्य क्रियापद’ आहे. त्यास शक्य कर्मणी प्रयोग असे म्हणतात.

(३) प्राचीन / पुराण कर्मणी : प्राचीन मराठी काव्यात सकर्मक धातूला ‘ज’ हा प्रत्यय लावून ‘करिजे, बोलिजे, कीजे, देईजे,’ अशी कर्मणी प्रयोगाची उदाहरणे पाहावयास मिळतात.

उदाहरण .

(१) त्वां काय कर्म करिजे लघू लेकराने ।
(२) नळे इंद्रासी असे बोलिजेलें
(३) जो-जो कीजे परमार्थ लाहो.
(४) द्विजी निषिधापासाव म्हणीजेलो.
या प्रकाराच्या प्रयोगास प्राचीन किंवा पुराण कर्मणी असे म्हणतात.

(४) समापन कर्मणी: कृती पूर्ण झाल्याचे सूचित केले जाते. क्रियापद शक्यतो ऊन/हून झाला/झाली,
त्याची गोष्ट लिहून झाली. या प्रकारच्या वाक्यात त्याची’ हा कर्ता षष्ठी विभक्तीत आहे. ‘लिहून झाली.’ या संयुक्त क्रियापदाने क्रियापदाच्या समाप्तीचा अर्थ सूचित केलेला असतो. अशा प्रकारच्या प्रयोगाला समापन कर्मणी असे म्हणतात.

(५) नवीन कर्मणी : कर्मणी प्रयोगातील कर्त्याला ‘कडून’ हे शब्दयोगी अव्यय लावून इंग्रजी भाषेतील पद्धतीप्रमाणे रचना करण्याचा जो नवीन प्रकार आहे, त्यास नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी असे म्हणतात. प्रयोगात इंग्लिश मधील Passive Voice प्रमाणे वाक्याची रचना आढळते

उदा. ‘शिपायाकडून चोर पकडला गेला.’

कर्मकर्तरी प्रयोगनवीन कर्मणी

पुढील वाक्ये पाहा.
(१) राम रावणास मारतो.

(२) रावण रामाकडून मारला जातो.

दोन्ही वाक्यांचा अर्थ जवळजवळ एकच आहे. पहिल्या वाक्यात ‘मारतो या क्रियापदाचा कर्ता ‘राम’हा असून ‘रावण’ हे कर्म आहे. दुसऱ्या वाक्यात’रावण’ हा कर्ता आहे म्हणजे पहिल्या वाक्यातील कर्म हे दुसऱ्या वाक्यात कर्ता बनले आहे व मूळच्या वाक्यातील कर्त्याला ‘कडून’ हे शब्दयोगी अव्यय जोडले असून मूळ धातूच्या भूतकाळी रूपापुढे ‘जा’ या धातूचे मूळच्या काळातील रूप ठेवले आहे.

पहिल्या वाक्यात ‘राम’ या शब्दास प्राधान्य आहे व त्याचा प्रयोग ‘कर्तरी’ आहे, तर दुसऱ्या वाक्यात ‘रावण’ या शब्दाला म्हणजे मूळच्या वाक्यातील कर्माला प्राधान्य दिल्यामुळे जो प्रयोग बनता आहे, त्यास कर्मकर्तरी प्रयोग असे म्हणतात.

अशी वाक्यरचना इंग्रजीत करीत असल्याने इंग्रजीतील पॅसिव्ह व्हॉइसला मराठीत कर्मकर्तरी Passive Voice in Marathi असे म्हणतात. सकर्मक धातूच्या भूतकालवाचक कृदन्ताला ‘जा’ या सहाय धातूची मदत देऊन हा प्रयोग करतात.

कर्म कर्तरीला काही जण नवीन कर्मणी असे म्हणतात. जेव्हा वाक्यातील कर्माला प्राधान्य देऊन विधान करावयाचे असते किंवा कर्ता स्पष्ट नसतो, किंवा काचा उल्लेख टाळावयाचा असतो, त्या वेळी हा कर्मकर्तरी प्रयोग विशेष सोयीचा वाटतो.

कर्मकर्तरी प्रयोगाची काही उदाहरणे

(१) गाय गुराख्याकडून बांधली जाते.
(२) न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला.
(३) सभेत पत्रके वाटली गेली.
(४) सर्वांना समज दिली जाईल.

भावे प्रयोग

जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीयपुरुषी, नपुंसकलिंगी, एकवचनी असून स्वतंत्र असते, तेव्हा अशा प्रकारच्या वाक्यरचनेस भावे प्रयोग असे म्हणतात.

भावे प्रयोगात क्रियापदाचा जो भाव किंवा आशय त्याला प्राधान्य असते व त्या मानाने कर्ता किंवा कर्म हि दोन्ही गौण असतात.

या प्रयोगाची आणखी काही उदाहरणे पाहा.

(१) रामाने रावणास मारले.
(२) शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे.
(३) त्याने आता घरी जावे.
(४) त्याला घरी जाववते.

यांतील पहिली दोन वाक्ये सकर्मक आहेत व पुढील दोन वाक्ये अकर्मक आहेत.

भावे प्रयोगाचे प्रकार

  1. सकर्मक भावे प्रयोग – ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले असल्यास त्यास सकर्मक भावे प्रयोग म्हणतात. .
  2. अकर्मक भावे प्रयोग – ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले नसल्यास त्यास अकर्मक भावे प्रयोग 

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा