Gopal Ganesh Agarkar Maharashtra Social Worker
महाराष्ट्रातील समाज सुधारक- गोपाळ गणेश आगरकर (१८५६-१८९५)
- जन्म : १४ जुलै १८५६
- मृत्यू : १७ जून १८९५
- पूर्ण नाव : गोपाळ गणेश आगरकर
- वडील :गणेश आगरकर
- आई : सरस्वती आगरकर
- पत्नी : यशोदाबाई गोपाळ आगरकर
- गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म १४ जुलै १८५६ रोजी सातारा जिल्ह्यातील “टेंभु” या गावी ब्राम्हण कुटुंबात झाला. आगरकरांच्या वडीलांचे नाव “गणेश” व आईचे नाव “सरस्वती” होते.
- आगरकरांनी आपले प्राथमिक शिक्षण हे त्यांच्या मामाच्या घरी कराड येथे घेतले.
- लहान पणापासुन बिकट आर्थिक परीस्थितीमुळे त्यांनी कोर्टात “कारकुनी” व
“कंपाऊंडर ची नोकरी केली. - १८७५ मध्ये अकोला येथुन ते मॅट्रीकची परीक्षा उर्तीर्ण झाले. अकोला येथे राहत असताना
“बहाङ समाचार” या वृत्तपत्रातुन आगरकरांनी लेखन केले. - १८७७ मध्ये उंब्रजच्या “आबुताई फडके यांच्यासोबत आगरकरांचा विवाह झाला. त्यांच्या मृत्युनंतर
आगरकरांनी “यशोदाबाई यांच्याशी पुर्नविवाह केला. - १८७८ मध्ये पुण्यातील डेक्कन कॉलेज मधून आगरकर बी. ए. उत्तीर्ण झाले.
- १८८१ मध्ये आगरकर एम. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले. इतीहास व तत्वज्ञान या विषयातुन त्यांनी एम. ए.
केले. - आगरकर यांच्यावर “जॉन स्टुअर्ट मिल’ यांच्या ऑन लिबर्टी व सबजेक्शन ऑफ वूमन या दोन ग्रंथाचा
तर “हर्बर्ट स्पेन्सर” यांच्या सोशलोजी व इधिक्स या ग्रंथाचा प्रभाव होतो. विष्णुशास्त्री चिपळुणकरांच्या
निबंधमालेच्या काही भागाचा प्रभाव होतो. - १८८१ मध्ये आगरकर व टिळक यांनी वृत्तपत्रे सुरु केली. ०२ जानेवारी १८८१ रोजी “मराठा” हे इंग्रजी भाषेतील वृत्तपत्र सुरु केले. या वृत्तपत्राचे संपादक लोकमान्य टिळक होते. ०४ जानेवारी १८८१ रोजी”केसरी” हे मराठी भाषेतील वृत्तपत्र सुरु करण्यात आले. या वृत्तपत्राचे संपादक गो. ग. आगरकर हे होते. केसरी वृत्तपत्राचे सुरुवातीचे ब्रिद वाक्य “ईष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणार” असे होते.
- लोकमान्य टिळक व आगरकर हे तुरुंगात असताना व्हि. एस. जोशी व एम. बी. नामजोशी यांनी हि वृत्तपत्रे चालविली.
- १८८१ मध्ये कोल्हापूर येथील बर्व प्रकरणामध्ये ब्रिटीशांनी कोल्हापूरचे चौथे शिवाजी यांना बेडा ठरवुन अहमदनगरच्या तुरुंगात ठेवले कोल्हापूर संस्थानाचा दिवाण महादेव बर्वे याच्यामुळेच ०४ थ्या शिवाजीस बेडा ठरविण्यात आले म्हणुन टिळक व आगरकर यानी आपल्या वृत्तपत्रातून त्यावर कठोर टिका केली. महादेव बर्वे या दिवाणाने मुंबई न्यायालयामध्ये दोघाविरुद्ध फौजदारी कार्यवाही केली. १३ जुले १८८२ रोजी या प्रकरणाचा निर्णय होवून टिळक व आगरकरांना १०१ दिवसांची कोठडी झाली. महात्मा फले यांनी त्यांना मदत म्हणुन १० हजार रु वर्गणी दिली. सदरचा तुरुंगवास भोगताना आगरकरांनी “डोंगरीच्या तुरुंगातील १०१ दिवस” हा महत्वपुर्ण ग्रंथ लिहीला.
- ०१ जानेवारी १८८० रोजी लोकमान्य टिळक व विष्णुशास्त्री चिपळणकर यांच्या मदतीने आगरकरांनी पुणे येथे “न्यु इंग्लिश स्कुल” ची स्थापना केली.
- २४ ऑक्टोंबर १८८४ रोजी टिळक, आगरकर व चिपळणकर यांनी संयुक्त रित्या पुणे येथे “डेक्कन एज्युकेशन सोसायटी” या संस्थेची स्थापना केली.
- ०२ जानेवारी १८८५ रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटी मार्फत पुण्यामध्ये “फर्ग्युसन कॉलेज” सुरु करण्यात आले. फर्ग्युसन कॉलेजचे पहीले प्राचार्य “वामन शिवराम आपटें” यांची नेमणुक झाली.
- २०१० मध्ये फग्यूसन कॉलेजला १२५ वर्षे पुर्ण झाली आहेत.
- १८८६ मध्ये लोकमान्य टिळक व आगरकर यांच्यामध्ये सामाजिक सुधारणा आगोदर किंवा राजकीय सुधारणा आगोदर करावे यावरुन मतभेद झाले.
- २५ ऑक्टोंबर १८८७ रोजी आगरकर यांनी केसरी वृत्तपत्राच्या संपादक पदाचा राजीनामा दिला तसेच डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे सदस्यत्व ही सोडले.
- १५ ऑक्टोंबर १८८८ रोजी दसन्याच्या दिवशी आगरकरांनी “सुधारक” हे नविन वृत्तपत्र सुरु केले. या वृत्तपत्राच्या मराठी आवृत्तीचे संपादक स्वतः आगरकर हे होते तर इंग्रजी आवृत्तीचे संपादक “गोपाळ कृष्ण गोखले होते. सुधारक या वृत्तपत्राच्या शीर्षक स्थानी “ईष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणार” असे ब्रीद वाक्य लिहीले होते. १९१४ ते १९१६ या कालावधीत सुधारक हे वृत्तपत्र रामचंद्र विष्णु फडतरे यांनी चालविले. आगरकरांच्या जिवंतपणी सुधारक वृत्तपत्राच्या आठवड्यातुन ३००० प्रतींचा खप होत असे.
- १८९१ मध्ये बेहरामजी मलबारी यांनी कायदेमंडळा संमतीवय विधेयक मांडले. या विधेयकास आगरकरांनी व रा. गो. भंडारकर यांनी समर्थन दर्शविले होते. तर टिळकांनी या विधेयकास विरोध दर्शविला होता.
- १८९३ मध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा पुर्नविवाहास आगरकारांनी पाठींबा दिला होता व ते या लग्न समारंभास स्वत: हजर होते. याच वर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा विवाह उत्तेजक मंडळी या नावाने संस्था सुरु केली.
- ३० जानेवारी १८९३ रोजी सुधारक या वृत्तपत्राच्या अंकात आगरकरांनी म्युनिसीपल व ब्राम्हणांवर टिका केली.
- १८९२ ते १८९५ दरम्यान गोपाळ गणेश आगरकर हे फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य होते.
०१७ जुन १८९५ रोजी वयाच्या ३९ वर्षी दम्याच्या विकाराने आगरकरांचा मृत्यु झाला. - इंदौरचे संस्थानिक शिवाजीराव होळकर यांनी आगरकरांना महीना ५०० रु बेतन देण्याचे ठरविले परंतु आगरकरांनी ते नाकारले. पुण्यातील बंड गार्डन भागात टिळक व आगरकरांनी आपले आयुष्य राष्ट्राला समर्पित करण्याची प्रतीज्ञा घेतली.
- महाराष्ट्राला तर्कशुद्ध समाज सुधारणेची शिकवण आगरकरांनी दिली. व्यक्ती स्वातंत्र, शुद्ध बुद्धीवाद, समता व मानवतावाद ही आगरकरांच्या स्वभावाची चतुसुत्री म्हणुन ओळखली जाते. बालविवाह, केशवपन या रुढीविरुद्ध त्यांनी विरोध केला.
- आगरकर हे पुरोगामी विचार सरणीचे होते. त्यांच्या विचार सरणीला विरोध दर्शविण्याकरीता पुण्यातील सनातनी लोकानी आगरकर जिवंत असताना त्यांची प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढली.
- आगरकर हे जिवंतपणी स्वतःची प्रेतयात्रा पाहणारे समाज सुधारक होत. आगरकरांनी त्यांच्या मृत्युनंतर अंत्यविधी करीता २०रु बांधुन ठेवले होते.
- आगरकरांना हिंदुस्थानमधील दारिद्रयाबद्दल विशेष दुखः होते. कामगारांनी आपल्या हक्कासाठी संघटीत होवुन संपाचे हत्यार उचलावे हे त्यांचे मत होते.आगरकरांनी जनरल रॅड च्या अत्याचाराविरोधात प्रखर लेख लिहीले होते. आगरकरांनी मुती पुजा,शिमगाहासन, प्राणी हत्या व प्रेत संस्कार यावर मोठ्या प्रमाणात टिका केली होती.
- शनी देव हा साडीसातीचा देव ही कल्पना खोटी आहे असे त्यांनी समाजास सांगीतले. तसेच धर्मातरास विरोध, बालिका विवाहा वर आगरकरांनी कठोर टिका केली. सतीची चाल, केशवपन, बालविवाह, इ. विषयी ब्रिटीश सरकारने कायदेकरावे असा आग्रह आगरकरांनी धरला होता
- विष्णुशास्त्री चिपळुणकर व आगरकर हे मराठीतील पहीले दोन श्रेष्ठ निबंधकर आहेत असे वि. स. खांडेकर यांनी म्हणटले आहे.
- समाजवादी सुधारणेमधील जहालवादी नेते म्हणुन आगरकर यांना ओळखले जाते. तर राजकीय क्षेत्रामधील जहालवादी नेते म्हणुन टिळकांना ओळखले जाते.
- आगरकरांनी आत्मचरित्रव्यतिरिक्त शेक्सपियरच्या हैमलेट या नाटकाचा मराठीत ‘विकारविलासित’ म्हणून अनुवाद केला. हा अनुवादाचा एक उत्कृष्ट नमुना समजला जातो.
- याशिवाय स्वातंत्र्याच्या दिशेने वाटचाल. डोंगरीच्या तुरुंगातील १०१ दिवस, गुलामांचे राष्ट्र,अलंकार मीमांसा व वाक्याचे पृथक्करण हे आगरकरांचे इतर प्रसिद्ध ग्रंथ आहेत.
- त्यांच्या ‘अनाथांचा कोणी वाली नाही’ या लेखात त्यांनी विद्यापीठाचा कला शाखेचा त्रैवार्षिक अभ्यासक्रम अत्यंत कठीण आहे असे सांगितले.
- पुणे महानगरपालिकेच्या पाण्याच्या हौदावर ब्राह्मणांसाठी व शुद्रांसाठी असे दोन फलक होते. यावर आगरकरांनी ‘म्युन्सिपल हौद व ब्राह्मणांवर गदा’ हा लेख लिहून अस्पृश्यता व सोवळ्या ओवळ्यावर टीका केली.
- ‘वाचाल तर चकित व्हाल’ या लेखात आगरकरांनी भारताच्या दारिद्र्याचे प्रमाण दाखविले.
- ‘शहाण्यांचा मूर्खपणा’ या लेखात सक्तीच्या वैधव्यावर टीका केली.
- पशु हत्यांवर प्रतिबंधासाठी त्यांनी सुधारक मध्ये ‘धर्माचा सकाळ व बक-यांचा बकाळ’ हा लेख लिहिला.
- ‘आमचे ग्रहण आणखी सुटलेच नाही’ या लेखात ग्रहणासंबंधींच्या गैरसमजुतीवर टीका केली.
- आगरकरांना ईश्वराचे अस्तित्व मान्य नव्हते.
- वि.स. खांडेकर यांनी त्यांचे वर्णन ‘देव न मानणारा दे माणूस‘ असे केले आहे. हीच त्यांची ओळख होती.
- गोपाळ गणेश आगरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आचार्य अत्रे यांनी पुण्यात इ.स. १९३४ साली आगरकर हायस्कूल ही मुलीची शाळा स्थापन केली.
- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे ‘सुधारक’कार गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार दिला जातो. इ.स. २०१० मध्ये हा पुरस्कार डॉ. श्रीराम लागू यांना, तर २०१२ साली मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते श्री. सय्यदभाई यांना देण्यात आला.
- महाराष्ट्र संपादक परिषद ही संस्था, आदर्श पत्रकारितेसाठी गो.ग. आगरकर पुरस्कार देते. २०१२ साली हा पुरस्कार महेश म्हात्रे यांना मिळाला होता.
आगरकरांची ग्रंथ संपदा :
१) आकोल्यातील “ब-हाड समाचार” या वृत्तपत्रातुन लेखन.
२) “डॉगरीच्या तुरुंगातील आमचे १०१ दिवस” हे पुस्तक (१८८२)
३) “स्त्रीयांनी जाकीटे घातली पाहीलेत” हा महत्वपुर्ण लेख.
४) शेक्सपिअरच्या “हॅम्लेट’ या कादंबरीचे “विकारविलसीत” असे मराठीमध्ये रुपांतर (१८८३)
५) “हिंदुस्थानचे राज्य कोणासाठी? ” हा महत्वपुर्ण लेख.
६) “गुलागिरीचे शस्त्र” हा महत्वपुर्ण ग्रंथ…
७) सेठ माधवदास, रधुनाथदास व बाई धनकुवरबाई यांचे पुर्नविवाह चरित्र्य.
८) वाक्य मिमांसा व वाक्याचे पृथ्थकरण हे व्याकरण विषक पुस्तक.
Reference: Wikipedia गोपाळ गणेश आगरकर: