५० समान अर्थाचे शब्द – मराठी व्याकरण
- अनल = निखारा, अग्नी, विस्तव, पावक, वन्ही, वैश्वानर, अंगार, कृशान, आगीन, आग्न, हुताशन, जातवेद, शिखी.
- अभिषेक = अभिशेष, अभिषव.
- अभिनय = हावभाव, अंगविक्षेप.
- अभ्यास = व्यासंग, सराव, परिपाठ.
- अमित = अगणित, अमर्याद, असंख्य,
- अयश = पराभव, दुलौकिक, अपमान.
- अर्जुन = पार्थ, धनंजय, फाल्गुन, भारत, किरीट.
- अश्व = घोडा, हय, तुरग, तुरंग, तुरंगम, वारू, बाजी, अस्प.
- अही = सर्प, साप, भुजंग, ब्याळ, उरग, पत्रग, फणी,
- अर्थ = अभिप्राय, भाव, तात्पर्य, हेतू, मतलब, आशय, उद्देश, भावार्थ,
- आई = माता, जननी, माय, जन्मदा, जन्मदात्री, आईस, आउस, आऊस, आवय, अंबा, माउली.
- आठवण = स्मृती, स्मरण.
- आनंद = मोद, तोष, प्रमोद, हर्ष, संतोष, आनंदन, उल्हास, उद्धव,
- आवाहन = विनंती, बोलाविणे.
- आश्चर्य = नवल, विस्मय, अचंबा, आचरय, आचीर, आचीज, आच्छरिय.
- आहार = भोजन, जेवण, जेमन.
- आळशी = कुचर, सुस्त, निरुद्योगी, मंद, कामचुकार, ऐदी, उठवळ, उठाळ, उंठोळ, उंडगळ, आळसट.
- इच्छा = आजू, आस, आकांक्षा, अपेक्षा, आशा, वासना, मनीषा, कांक्षा, कांक्षया, स्पृहा, लिप्सा.
- ईश्वर = अलख, अलक्ष, आनंदघन, परमेश्वर, देव, ईश, प्रभू.
- उत्कर्ष = भरभराट, चलती, वाढ, समृद्धी, संपन्नता, उवाय, उवाब.
- उंट = उष्टर, उष्ट्र.
- ऋणदार = देणेकरी, ऋणको, ऋणाईत, कर्जदार, ऋणिया.
- एकी = एकजती, एकमती, एकचार, एकोपा, एकता, एकजथा, एकत्व, ऐक्य, एकमेळ, एकलाधी, एकवळा, एकवाक्य
- एकचित्त = एकाग्र, एकतान, एकतानता, एकभाव
- चांदणे = कौमुदी, ज्योत्स्ना, चंद्रिका.
- चंद्र = शशी, विधू, सोम, हिमांश, सुधांशू, सुधाकर, निशानाथ, रजनीनाथ, शशांक, नक्षत्रेश, शशधर, कलानिधी, शुभ्रांशू
- घास = ग्रास, कवळ.
- घर = सदन, भवन, गृह, गेह, आलय, निवास, घाम, निकेतन, आगर, भुवन.
- गणपती = गजानन, वक्रतुंड, हेरंब, धरणीधर, लक्षपद, निधी, लंबोदर, गजमुख, विघ्नहर्ता, गणेश, विनायक, चिंतामणी, एकदंत.
- गर्दी = दाटी, खच.
- गरज = जरुरी, आवश्यकता, निकड.
- गरुड = वैनतेय, खगेंद्र, द्विजराज, खगेश्वर.
- खजिना = भांडार, तिजोरी, कोश, द्रव्यनिधी, भांडागार.
- खग = पक्षी, विहंग, द्विज, अंडज, शकुन्त, विहंगम.
- कृष्ण = देवकीपुत्र, वासुदेव, विष्णूचा आठवा अवतार, कन्हैया, मुरलीधर, मुरारी, कान्हा.
- कृपण = चिक्कू, कंजूष, कोमटा, हिमटा, खंख, खंक.
- कौशल्य = नैपुण्य, खुबी, चातुर्य, करामत, कसब, प्रावीण्य.
- कुरूप = बेढब, आकाररहित, अरूप, विरूप, विद्रुप.
- क्रीडा = क्रीडन, खेळ, मौज, विलास, लीला, मनोरंजन, बिहार.
- किरण = कर, अंशू, रश्मि, मयूख.
- कोता = आखूड, अपुरा, लहान, कमी, क्षुद्र.
- कार्यक्षम = कुशल, दक्ष, निपुण, हुशार, कर्नुमका.
- काळोख = अंधार, तिमिर, तम, अंधकार.
- काळजी = चिंता, फिकीर, आस्था, कळकळ.
- कासव = कमट, कमठ, कूर्म, कच्छप, कच्छ.
- कावळा = वायस, एकाक्ष, काक, काउळा.
- कस = दम, जोर, सामर्थ्य
- कर्तृत्व = पराक्रम, कर्तुकी, कर्तुक, कर्तुप.
- कमळ = अंबुज, पंकज, नीरज, राजीव, पदम, नलिनी, अब्ज.
- अंबर = आकाश, गगन, नभ, आभाळ, अवकाश, व्योम.